आयुष्यातील यशाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी
प्रत्येकाने अथक परिश्रम,जिद्द व चिकाटीची तयारी ठेवावी. दिव्यांग व्यक्ती
सुध्दा प्रत्येक क्षेत्रात आपल्या बुध्दीमत्ता व कौशल्याने यशस्वी होवू शकतो.
स्वतःवर आत्मविश्वास ठेवा,स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. आपल्या ध्येयावर
लक्ष केंद्रीत करून तयारीला लागा यश तुमची वाट बघतेय. आकाशी झेप घेण्यासाठी
न्युनगडांचा त्याग करावा असे विचार
अमरावतीचे उपजिल्हाधिकारी आर.डी.काळे यांनी बोलतांना काढले.

जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून विवेकानंद
कर्णबधिर विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लांब उंडी,५०,१००
व २०० मीटर धावणे,उंच उडी या क्रीडा स्पर्धेत विवेकानंद कर्णबधिर
विद्यालयातील विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते
यावेळी बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी
लेक वाचवा लेक शिकवा ही नाटीका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर सुत्रसंचालन प्रमोद सावरकर तर आभार
विश्वभंर शेळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद कर्णबधिर
विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
अबोल भावनांनी जिंकली मने
विवेकानंद कर्णबधिर विद्यालयातील मुले मुलींनी
जागतिक कर्णबधिर दिनाच्या प्रसंगी आपल्या सकस व उत्कृष्ट अभिनयाव्दारे
स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी व स्त्री सशक्तीकरणावर आधारीत लेक वाचवा लेक शिकवा
ही सुंदर नाटिका यावेळी सादर केली. आपल्या अत्यंत बोलक्या अभिनयाव्दारे
उपस्थितांच्या डोळयांच्या कडा ओल्या करून लेकी वाचवा लेक शिकवा या नाटीकेतून
सामाजिक जाणिवांना बोलते केले.
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८