आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार मोफत माती परीक्षण


विवेकानंद आश्रम व इफकोचा संयुक्त उपक्रमदररोज ५० नमुन्याची होईल तपासणी

कर्मयोग संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद कृषी महाविघालय व इफको सारखी दर्जेदार संस्था यांच्या संयुक्त विघमाने २१ मे ते २७ मे पर्यंत मोफत माती तपासणी करून देणार आहे माती परीक्षण व्हॅन परिसरातील गावांमध्ये जाउन शेतक-यांच्या बांधावरच मातीचे नमुने घेवून तपासणी करून तिथेच रिपोर्ट देणार आहे. शेतक-यांना मातीचे नमुने घेवून प्रयोगशाळेचे हेलपाटे मारावे लागतात या उपक्रमामुळे शेतक-यांचा त्रास वाचणार असून जागेवरच त्याला रिपोर्ट मिळणार आहे. सोबतच तज्ञांचे मार्गदर्शनाने पिकांची निवड व पिक व्यवस्थापनाबद्दल महत्वाची शास्त्रीय माहीती मिळणार आहे.
शेतीचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. सुधारीत खात्रीशीर बियाणेउच्च तंत्रज्ञानाचा वापर त्यासोबतच मातीचे परिक्षण ही अत्ंयत महत्वाची बाब आहे. जमीनीचा प्रकार बघुनच योग्य पिकाची लागवड खताचे व पाण्याचे नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होउन शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे. कर्मयोगी शुकदास महाराजांचा शेती व शेतकरी हा अत्यंत जिव्हाळयाचा विषय होता. महाराजांनी गव्हाचे सुधारीत बियाणे, सिड बॅक,कमी पाण्यात येणा-या बियाण्यांची निवड पध्दतीने संशोधन करणे, दुर्मिळ वाणांचे जतन करणे, कृषि शिक्षणांची व्यवस्था करून कृषी पदवीधर तयार करणे व कृषी संबधी नानाविध उपक्रम राबवून परीसराच्या कृषी विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे.

मातीचा नमुना घेतांना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये. कंपोस्ट खत दिलेले असल्यास त्या भागातील माती नमुना घेवू नये. १५ ते ३० से.मी पर्यंत सोडून त्या खालील माती काढावी.
                                      डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय 

माती परिक्षणाचे फायदे
माती परीक्षणामुळे जमिनीतील  अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. जमीन आम्लधर्मी किंवा विम्लधर्मी याची माहिती होवून  त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते.
माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करता येतो त्यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढते. पिकांच्या वाढीस आवश्यक असणा-या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो.

असा घ्यावा मातीचा नमुना
मातीचा नमुना घेण्यासाठी प्रथम जमीनीवरील काडीकचरा बाजूला करावा.नमुना घेताना इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करावा. खड्डयाच्या एका बाजूची २ ते ३ सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरबडून घ्यावी. अशा प्रकारे मातीपरिक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी.वाळलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.

हिवरा आश्रमचा जेष्ठ नागरीक बनला काष्ठशिल्पकार

                                                                                                                 आयुष्यातील निर्भेळ आनंदाची अनुभूती व शाश्वत सुखाची अभिलाषा असणा-यांनी कुठला ना कुठला तर छंदाची जोपासना करावी. छंद हा माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवितो. कुणी तरी असे म्हटले आहे की, वाढत्या वयाला जर हरावयाचे असेल तर आपले छंद जीवंत ठेवून त्याची जोपासना करायला शिका मग बघा आयुष्य किती आनंदी होतेयाचाच प्रत्यय येतो मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या छोटयाशा गावातील जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते यांच्याकडे पाहिल्यावर. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते आपल्या छंदाची जोपासना करीतटाकाऊ लाकडापासून आकर्षक, सुबक, रेखीव व मोहक विविध काष्ठशिल्प निर्माण करून लुप्त होणा-या कलाकृतींना पुन्हा संजीवनी देण्याचे काम केले आहे. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण थोरहाते यांची छंदातून निर्मित केलेली काष्ठशिल्प खरोखर इतर जेष्ठांसाठी निश्चितच प्रेरणा व उर्जा देणारी ठरत आहे. जेष्ठ नागरीकांनी उतारवयात आपल्या वेळेचा सदुपयोग करीत छंदाची जोपासना केल्यास विविध कलाकृती साकार होवू शकतात हे श्रीकृष्ण थोरहाते यांनी आपला छंदातून दाखविले आहे. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण थोरहाते यांनी टाकाऊ लाकडापासून बनविलेल्या काष्ठशिल्पाचे परिसरात कौतुक होत आहे. वाढत्या वयात जेष्ठांनी आपल्या छंदाची जोपासना केल्यास त्यापासून स्वतःला तर आनंद मिळतो व आपल्या छंदापासून इतरांना सुध्दा आनंद मिळतो हे काष्ठशिल्पकार श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते यांनी समाजापुढे दाखवून दिले आहे.

जेष्ठ नागरीक असणा-या श्रीकृष्ण थोरहाते यांनी काष्ठशिल्प निर्मितीचे कुठल्याही प्रकारचे व्यावसासिक प्रशिक्षण घेतले नसून केवळ अभिजात सौंदर्यदृष्टी,सूक्ष्म निरीक्षण व कामातील सातत्य या कलागुणांच्या बळावर त्यांनी अनेक काष्ठ शिल्प साकारले आहे. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी श्रीकृष्ण थोरहाते यांच्या कलाकौशल्याचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला असल्याचे त्यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगितले.

टाकाऊ लाकडापासून काष्ठशिल्पे
श्रीकृष्ण थोरहाते यांनी टाकाऊ लाकडापासून भगवान शिव,बालाजी,भगवान बौध्द,श्रीकृष्ण,स्वामी विवेकानंद,गणपती,महावीर,हत्ती,गायी,घोडे,साप,बैलगाडीअशी विविध काष्ठशिल्पे तयार केली आहेत.

प्रत्येक जेष्ठ नागरीक सुद्धा आपल्यातील अंगभूत असलेल्या कला व छंदातून विविध आकर्षक वस्तुंची निर्मीती करू शकतोमला छंद जोपासनेतूनलुप्त कलाकृतीचे संवर्धन करीत असल्याचा आनंद आहे.
                                        श्रीकृष्ण थोरहाते जेष्ठ काष्ठशिल्पकार हिवरा आश्रम

आनंद साधना बाल संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विवेकानंद ज्ञानपीठाने  ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या होण्याच्या  दृष्टीने हिवरा आश्रम येथे ३० दिवसीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या बालसंस्कार शिबीराला परिसरातील १००  ते १५० मुले मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोवळया बालमनावर संस्काराचे बीज रूजविणे,विद्याथ्र्यांमधील सुप्त कलागुणांना शिबीरा दरम्यान चालना देणे, विद्यार्थ्यांतील कलासक्तपणाची जोपासणा करणे,त्यांच्या सृजनशक्तीला चालना देवून त्यांच्यातील अभिरूचीनुसार पंखाना बळ देणे हा शिबीराचा हेतू आहे.
विवेकानंद ज्ञानपीठात  दि.४ मे ते ४ जून दरम्यान सुरू असलेल्या हया शिबीरात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. बालमनावर नैतिकता,प्रामाणिकता,सचोटी,राष्ट्रप्रेम,निर्व्यसनी,निर्भीडपणा,सदाचार या सारख्या मूल्याचे संवर्धन या शिबीरात सातत्याने होत आहे. शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरणात तणावमुक्त शिक्षण पध्दतीने शिकविले जात आहे. या बालसंस्कार शिबीरात शिबरार्थीनी शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मिळून त्यांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. शिबीरार्थींना परिसर,पर्यावरण,समाज स्वावलंबन,या विषयाचे भान येवून बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या शिबीराचा  ४ मे रोजी प्रारंभ झाला असून आहे. शिबिरात ६ ते १६वर्ष वयाच्या बालकांना सहभाग घेतला आहे. शिबीरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषीकांने सन्मानित करण्यात येईल. सदर शिबीर यशस्वीतेसाठी विक्रांत राजपूत,रवि लोखंडे,समाधान वाघचौरे,योगशिक्षक नाना इंगळे,प्राचार्य मधुकर परिश्रम घेत आहे.

शिबीरार्थींसाठी विविध कार्यक्रम
बालसंस्कार शिबीरात शिबीरार्थीना योगासने,मंत्रोच्चार व श्लोक,इंग्रजी संभाषण,बौध्दीक क्षमता विकास,चर्चा सत्र,मंनोरंजनात्मक खेळे,स्टेज डेअरिंग,संगणक प्रोजेक्टर व्दारे शिक्षणमैदानी मनोरंजन खेळपरिसर क्षेत्र भेट व सहलप्रार्थनावन मिनीट अ‍ॅक्टीवीटी,हस्ताक्षर सुधारणा या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करत आहे.

उत्तम संस्कार हे बाल-वयातच केले तर पुढील पीढी ही  सदाचारीमोठयाचा आदर करणारीसमाजात उत्तम नाव कमावणारी होईल. तसेच लहान मुलांमध्ये लहापनापासून आध्यात्माची ओढ निर्माण झाली तर संस्कारक्षम पिढी तयार होण्यास चांगली मदत होईल या उदेशाने ही ३०  दिवशी बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
                                                 प्रा.मधुकर आढाव प्राचार्य विवेकानंद ज्ञानपीठ


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

रामच्या पाठीवर कौतुकाची थाप !

विविध फिचर्समुळे जीमेलचे बदलले रूपडे !

पुर्वीच्या काळात पत्र हेच संदेश वहनाचे मुख्य साधन हे होते. पत्रामुळे मुलगा आईवडीलाशीभाऊ बहीणीशी,प्रियकर प्रियसी संदेशवहनाच्या माध्यमातून आपल्या भावना कळवित असे. पत्र लिहून व्यक्ती आपले सुख दुखविवाहसमारंभपुत्रप्राप्तअभिनंदनआभारगौरवसांत्वन कळवित होता. अनेकदा पत्र पोहचण्यासाठी विलंब लागत होता. आधुनिक काळात ईमेल हे संदेशवहनाचे मुख्य साधन बनले आहे. जगात सर्वात जास्त जीमेल वापरकर्त्यांची संख्या आहे. नुकतीच जीमेलची आवृत्ती अद्यावत करीत उपयुक्त ठरणा-या फिचर्सचा समावेश केला. यामुळे अनेक दिवसापासून या नवीन फिचर्स विषयी शिगेला पोहचलेल्या उत्सुकतेला पुर्ण विराम मिळाला. आता आर्काईव्ह,मार्क अ‍ॅज रीड व डीलीट यांच्या सोबत स्नूझ हा नवीन फिचरचा समावेश केला आहे. स्नूझ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई मेल किती कालावधी नंतर बघायचा याचे विविध पर्याय सुध्दा उपलब्ध आहे. याशिवाय नवीन जीमेलमध्ये नज या नावाचे नविन वैशिष्टाचा समावेश करण्यात आला असून याच्या मदतीमुळे ईबॉक्स मेल किती दिवसांपूर्वी आला होता याची माहिती सुध्दा मिळेल. 

स्मार्ट रिप्लाय
जीमेल मध्ये स्मार्ट रिप्लाय या नवीन फिचरचा समावेश करण्यात आला असून  यामुळे इनबॉक्समध्ये आलेल्या ई मेलला तात्काळ उत्तर देता येईल. याशिवाय आर्टीफिशय इंटिलेजीयन्स तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे समोरच्या युजरला तात्काळ उत्तर देण्यासाठी सुचक वाक्यांचा सुविधा सुध्दा व्यवस्था प्रदान केली आहे. 

कॉन्फीडेशिन्शयल मोड
आता जीमेलमध्ये कॉन्डीडेशिन्शल मोडच्या माध्यमातून पाठविलेला ईमेल समोरील व्यक्ती तो मेल किती वेळापर्यंत पाहू शकेल हे सुध्दा ठरविता येणार आहे. अतिशय महत्वाचे कार्यालयीन कागदपत्रेफोटोडाटाबेस इत्यादी माहिती पाठविण्यासाठी हा मोड महत्वाचा ठरणार असून या मोडमुळे मेलची कॉपीपेस्टफॉरवर्ड किंवा डाऊनलोड किंवाकॉन्फीडेशिन्शयल मोडव्दारे पाठविलेली माहिती प्रिंट करता येणार नाही.  

ऑफलाईन मोडची सुविधा
ऑफलाईन मोडच्या मदतीने आता जीमेल वापरकर्ता इंटरनेट शिवाय सुध्दाआपल्या इनबॉक्समधील ईमेल पाहू  शकणार आहे. याशिवाय वापरकर्त्याच्या सुविधेसाठी इनबॉक्सच्या उजव्या बाजुला साईडबार मध्ये गुगल कॅलेंडरमुळे आपल्या कामाचे योग्य नियोजन  करण्यास मोठी मदत मिळणार आहे. संपूर्ण  जीमेलचे अपडेट काही महिन्यात वापरकर्त्यांनामिळणार आहे. 

असा करा  ट्राय न्यू जीमेल
जीमेल अकाउंटच्या सेटिंग आयकॉन वरती  क्लिक करावे. त्या ठिकाणी  ट्राय न्यू जीमेल  या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नविन अद्यावत फिचर्सयुक्त जीमेल सहज वापरणे शक्य होतो.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८