आधुनिक जीवनशैलीमुळे वाढतोय लठ्ठपणा !

fatness in child साठी इमेज परिणाम
आधुनिक जीवन शैली व आहारातील होणा-या बदलामुळे लहान मुलातील लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणामुळे लहानपणात मुलांना अनेक व्याधी जडण्याचा धोका सुध्दा नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना फास्ट फुडपासून दूर ठेवल्यास व काही दैनंदिन जीवनात थोडे फार बदल केल्यास लहान मुलातील लठ्ठपणावर नियंत्रण मिळविता येते. सद्या शहरी तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांमधील लठ्ठपणा हा पालकांमधील चिंतेचा विषय बनला आहे. लठ्ठपणामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होवूनत्यांच्यामध्ये निराशा निर्माण होते. लहान मुलांचे वजन वाढू नये म्हणून वेळोवेळी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही पालक आपल्या लहान मुलाचे वजन कमी करण्यासाठी त्याला मैदानी खेळाकडे पाठवितात. साधारणपणे ८ ते १० वर्षांची मुले असतांना शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी ती वाढत जाते परिणामी लहान मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. लहान मुलांचे वजन वाढीमागे अनेक कारणे असली तरी मैदानी खेळाचा अभाव, सतत एकाच ठिकाणी बसून राहणे,टि.व्ही.मोबाईल,कॉम्प्युटर वरती गेम खेळणे इत्यादी मुळे लहान मुलांचे वजन वाढते. काही मुलांमधील लठ्ठपणा हा अनुवांशिकतेमुळे असतो. तर काही मुलांच्या आहार व जीवनशैलीतील बदलामुळे त्यांचे वजन वाढून मुलांना लठ्ठपणा येतो. लहान मुलांना सकस व सात्वीक आहार द्यावा. लहान मुलांना जेवणात जास्त प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. मुलांमधील लठ्ठपणा कायम राहल्यास मुलांमध्ये हदयविकार,उच्च रक्तदाब,हाडांचे आजार व संधीवात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय मधुमेह होण्याची शक्यता सुध्दा वाढते.

मुलांच्या खाण्यावर ठेवा नियंत्रण
महान मुलांना जास्त चरबी असलेले पदार्थ खाण्यामध्ये देवू नये. याशिवाय कर्बोदके असलेल्या  पदार्थांपासून लहान मुलांना दुर ठेवावे. जास्त उष्मांक असलेले पदार्थ,समोसाबर्गर,वडापाव,आईस्क्रीम पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

लहान मुलांमधील स्थूलतेची कारणे
सोशल मिडीयाच्या काळात मुले मैदानी खेळ सोडून मुले मोबाईलकॉम्प्युटर आणि टी.व्ही.पाहण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे शरीराची  हालचाल न झाल्यामुळे चरबी वाढते.

आपल्या पाल्याचे वजन वाढून लठ्ठपणा येत असेल तर डॉक्टरांशी चर्चा करावी. मुलांच्या दिनचर्येत बदल करून त्यांना मैदानी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे.                                                                                                  डॉ.विशाल सुरूशे बालरोगतज्ञ,मेहकर



लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार मोफत माती परीक्षण


विवेकानंद आश्रम व इफकोचा संयुक्त उपक्रमदररोज ५० नमुन्याची होईल तपासणी

कर्मयोग संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद कृषी महाविघालय व इफको सारखी दर्जेदार संस्था यांच्या संयुक्त विघमाने २१ मे ते २७ मे पर्यंत मोफत माती तपासणी करून देणार आहे माती परीक्षण व्हॅन परिसरातील गावांमध्ये जाउन शेतक-यांच्या बांधावरच मातीचे नमुने घेवून तपासणी करून तिथेच रिपोर्ट देणार आहे. शेतक-यांना मातीचे नमुने घेवून प्रयोगशाळेचे हेलपाटे मारावे लागतात या उपक्रमामुळे शेतक-यांचा त्रास वाचणार असून जागेवरच त्याला रिपोर्ट मिळणार आहे. सोबतच तज्ञांचे मार्गदर्शनाने पिकांची निवड व पिक व्यवस्थापनाबद्दल महत्वाची शास्त्रीय माहीती मिळणार आहे.
शेतीचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. सुधारीत खात्रीशीर बियाणेउच्च तंत्रज्ञानाचा वापर त्यासोबतच मातीचे परिक्षण ही अत्ंयत महत्वाची बाब आहे. जमीनीचा प्रकार बघुनच योग्य पिकाची लागवड खताचे व पाण्याचे नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होउन शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे. कर्मयोगी शुकदास महाराजांचा शेती व शेतकरी हा अत्यंत जिव्हाळयाचा विषय होता. महाराजांनी गव्हाचे सुधारीत बियाणे, सिड बॅक,कमी पाण्यात येणा-या बियाण्यांची निवड पध्दतीने संशोधन करणे, दुर्मिळ वाणांचे जतन करणे, कृषि शिक्षणांची व्यवस्था करून कृषी पदवीधर तयार करणे व कृषी संबधी नानाविध उपक्रम राबवून परीसराच्या कृषी विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे.

मातीचा नमुना घेतांना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये. कंपोस्ट खत दिलेले असल्यास त्या भागातील माती नमुना घेवू नये. १५ ते ३० से.मी पर्यंत सोडून त्या खालील माती काढावी.
                                      डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय 

माती परिक्षणाचे फायदे
माती परीक्षणामुळे जमिनीतील  अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. जमीन आम्लधर्मी किंवा विम्लधर्मी याची माहिती होवून  त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते.
माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करता येतो त्यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढते. पिकांच्या वाढीस आवश्यक असणा-या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो.

असा घ्यावा मातीचा नमुना
मातीचा नमुना घेण्यासाठी प्रथम जमीनीवरील काडीकचरा बाजूला करावा.नमुना घेताना इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा करावा. खड्डयाच्या एका बाजूची २ ते ३ सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरबडून घ्यावी. अशा प्रकारे मातीपरिक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा. माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी.वाळलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.

हिवरा आश्रमचा जेष्ठ नागरीक बनला काष्ठशिल्पकार

                                                                                                                 आयुष्यातील निर्भेळ आनंदाची अनुभूती व शाश्वत सुखाची अभिलाषा असणा-यांनी कुठला ना कुठला तर छंदाची जोपासना करावी. छंद हा माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवितो. कुणी तरी असे म्हटले आहे की, वाढत्या वयाला जर हरावयाचे असेल तर आपले छंद जीवंत ठेवून त्याची जोपासना करायला शिका मग बघा आयुष्य किती आनंदी होतेयाचाच प्रत्यय येतो मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या छोटयाशा गावातील जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते यांच्याकडे पाहिल्यावर. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते आपल्या छंदाची जोपासना करीतटाकाऊ लाकडापासून आकर्षक, सुबक, रेखीव व मोहक विविध काष्ठशिल्प निर्माण करून लुप्त होणा-या कलाकृतींना पुन्हा संजीवनी देण्याचे काम केले आहे. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण थोरहाते यांची छंदातून निर्मित केलेली काष्ठशिल्प खरोखर इतर जेष्ठांसाठी निश्चितच प्रेरणा व उर्जा देणारी ठरत आहे. जेष्ठ नागरीकांनी उतारवयात आपल्या वेळेचा सदुपयोग करीत छंदाची जोपासना केल्यास विविध कलाकृती साकार होवू शकतात हे श्रीकृष्ण थोरहाते यांनी आपला छंदातून दाखविले आहे. जेष्ठ नागरीक श्रीकृष्ण थोरहाते यांनी टाकाऊ लाकडापासून बनविलेल्या काष्ठशिल्पाचे परिसरात कौतुक होत आहे. वाढत्या वयात जेष्ठांनी आपल्या छंदाची जोपासना केल्यास त्यापासून स्वतःला तर आनंद मिळतो व आपल्या छंदापासून इतरांना सुध्दा आनंद मिळतो हे काष्ठशिल्पकार श्रीकृष्ण प्रल्हाद थोरहाते यांनी समाजापुढे दाखवून दिले आहे.

जेष्ठ नागरीक असणा-या श्रीकृष्ण थोरहाते यांनी काष्ठशिल्प निर्मितीचे कुठल्याही प्रकारचे व्यावसासिक प्रशिक्षण घेतले नसून केवळ अभिजात सौंदर्यदृष्टी,सूक्ष्म निरीक्षण व कामातील सातत्य या कलागुणांच्या बळावर त्यांनी अनेक काष्ठ शिल्प साकारले आहे. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी श्रीकृष्ण थोरहाते यांच्या कलाकौशल्याचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला असल्याचे त्यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगितले.

टाकाऊ लाकडापासून काष्ठशिल्पे
श्रीकृष्ण थोरहाते यांनी टाकाऊ लाकडापासून भगवान शिव,बालाजी,भगवान बौध्द,श्रीकृष्ण,स्वामी विवेकानंद,गणपती,महावीर,हत्ती,गायी,घोडे,साप,बैलगाडीअशी विविध काष्ठशिल्पे तयार केली आहेत.

प्रत्येक जेष्ठ नागरीक सुद्धा आपल्यातील अंगभूत असलेल्या कला व छंदातून विविध आकर्षक वस्तुंची निर्मीती करू शकतोमला छंद जोपासनेतूनलुप्त कलाकृतीचे संवर्धन करीत असल्याचा आनंद आहे.
                                        श्रीकृष्ण थोरहाते जेष्ठ काष्ठशिल्पकार हिवरा आश्रम

आनंद साधना बाल संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विवेकानंद ज्ञानपीठाने  ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या होण्याच्या  दृष्टीने हिवरा आश्रम येथे ३० दिवसीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या बालसंस्कार शिबीराला परिसरातील १००  ते १५० मुले मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोवळया बालमनावर संस्काराचे बीज रूजविणे,विद्याथ्र्यांमधील सुप्त कलागुणांना शिबीरा दरम्यान चालना देणे, विद्यार्थ्यांतील कलासक्तपणाची जोपासणा करणे,त्यांच्या सृजनशक्तीला चालना देवून त्यांच्यातील अभिरूचीनुसार पंखाना बळ देणे हा शिबीराचा हेतू आहे.
विवेकानंद ज्ञानपीठात  दि.४ मे ते ४ जून दरम्यान सुरू असलेल्या हया शिबीरात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. बालमनावर नैतिकता,प्रामाणिकता,सचोटी,राष्ट्रप्रेम,निर्व्यसनी,निर्भीडपणा,सदाचार या सारख्या मूल्याचे संवर्धन या शिबीरात सातत्याने होत आहे. शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरणात तणावमुक्त शिक्षण पध्दतीने शिकविले जात आहे. या बालसंस्कार शिबीरात शिबरार्थीनी शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मिळून त्यांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. शिबीरार्थींना परिसर,पर्यावरण,समाज स्वावलंबन,या विषयाचे भान येवून बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या शिबीराचा  ४ मे रोजी प्रारंभ झाला असून आहे. शिबिरात ६ ते १६वर्ष वयाच्या बालकांना सहभाग घेतला आहे. शिबीरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषीकांने सन्मानित करण्यात येईल. सदर शिबीर यशस्वीतेसाठी विक्रांत राजपूत,रवि लोखंडे,समाधान वाघचौरे,योगशिक्षक नाना इंगळे,प्राचार्य मधुकर परिश्रम घेत आहे.

शिबीरार्थींसाठी विविध कार्यक्रम
बालसंस्कार शिबीरात शिबीरार्थीना योगासने,मंत्रोच्चार व श्लोक,इंग्रजी संभाषण,बौध्दीक क्षमता विकास,चर्चा सत्र,मंनोरंजनात्मक खेळे,स्टेज डेअरिंग,संगणक प्रोजेक्टर व्दारे शिक्षणमैदानी मनोरंजन खेळपरिसर क्षेत्र भेट व सहलप्रार्थनावन मिनीट अ‍ॅक्टीवीटी,हस्ताक्षर सुधारणा या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करत आहे.

उत्तम संस्कार हे बाल-वयातच केले तर पुढील पीढी ही  सदाचारीमोठयाचा आदर करणारीसमाजात उत्तम नाव कमावणारी होईल. तसेच लहान मुलांमध्ये लहापनापासून आध्यात्माची ओढ निर्माण झाली तर संस्कारक्षम पिढी तयार होण्यास चांगली मदत होईल या उदेशाने ही ३०  दिवशी बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
                                                 प्रा.मधुकर आढाव प्राचार्य विवेकानंद ज्ञानपीठ


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

रामच्या पाठीवर कौतुकाची थाप !