घ्या कॅल्शियमयुक्त आहाराला, दूर ठेवा ऑस्टीयोपोरोसीसला !
साधारणपणे वयाच्या साठी नंतर जेष्ठांना हाडे ठिसूळ होण्याच्या आजाराला सामोरे जावे लागते. उतार वयात हात पायांची हाडे चावणे, दुखणे व थोडासा सुध्दा पाय घसरून पडल्यास शरीरातील हाडाला फ्रक्चर किंवा हाड मोडले नाही तर नवल. जणूकाही वृध्दापकाळ व हाडांचे दुखणे हे समीकरणच होवून गेले आहे. जेष्ठ वृध्दापकाळात हाडांचा ठिसूळपणा व सांध्याची झीज या आजाराने जर्जर होवू जातात. शरीरातील हाडांच्या होणा-या असहय वेदनांनी वृध्दापकाळ नकोसा वाटू लागतो. वृध्दापकाळात शरीरात नवीन पेशी तयार होण्याची प्रकिया थंडावते. जुन्या पेशी सतत नष्ट होण्याची प्रक्रिया सुद्धा शरीरात कायम सुरूच राहते, त्यामुळे वृध्दापकाळात हाडे ठिसूळ होण्याच प्रमाण वाढत जाते . ऑस्टियोपोरोसिस होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा किवां शारीरीक हालचालीचा अभाव होय. धुम्रपान करण्या-या व्यक्तींमध्ये हाडे पोकळ होण्याची क्रिया अधिक वेगाने होते. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी आहाराची सुध्दा महत्वपूर्ण भूमिका आहे. ज्यांच्या हांडाची झीज झाली आहे त्यांनी व्हिटॅमीन डी युक्त आहाराचे सेवन करावे. त्यासोबत दुध, पनीर, हिरव्या पालेभाज्या,प्रोटीन,मिनरल्स,कॅ ल्शियम आणि व्हिटॅमिन्सचं आहारात योग्य प्रमाणात घेतल्या हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होईल.जेष्ठांनी नियमीत योगा, शारीरीक व्यायाम, हातपायांच्या हालचालींचा थोडाफार व्यायाम केल्यास सुध्दा फायदा होतो. वृध्दापकाळात जेष्ठांच्या आवडीनिवडीत होणारा बदल व त्यातून होणारा शरीरातील काही हार्मोन्स कमी, शारीरीक हालचालींची कमतरता यामुळे वृध्दापकाळात हाडांचा ठिसूळपणा अधिक जाणवू लागतो. भारतात ३ कोटीपेक्षा अधिक नागरीक ऑस्टियोपोरोसिस या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे हाडांना ठिसूळ करणे होय. स्त्रीयांमध्ये चाळीसी नंतर ऑस्टियोपोरोसिसमुळे हात-पाय दुखण्याचे प्रमाण वाढते.
हाडांच्या ठिसूळतेची लक्षणे
सतत हाय, पाय दुखणे कधीकधी हाडावर सुज येणे. हाडे ठिसूळ झाल्यामुळे हात किंवा पायाला व्यंग येणे, हाडांची झिज झाल्यामुळे वेदना होणे, सूज आल्यामुळे वजन सहन न होणे ही जरी हाडांची ठिसूळपणाची लक्षणे असली तरी काही व्यक्तींमध्ये हाडांचे फ्रक्चर होईपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत.
उतारवयात शरीरात कॅल्शियम तयार होत नाही. वर्षातून एकदा डॉक्टरांची भेट घ्यावी घेवून बी.एम.डी व कॅल्शियमची तपासणी करावी. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आहे त्यांनी शक्यतो मांडी घालू खाली बसू नये. जास्त पाय-या चढणे किंवा उतरणे टाळावे. जास्त वेळ वाकून काम करू नये. वजन कमी करावे. वजनामुळे गुढघा आणि मणक्याचे आजार वाढतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा