शब्दांच्या किमयागाराशी अविस्मरणीय भेट !


विनोदजी बोरे म्हटल्या बरोबर नजरेसमोर येतो काव्य व साहित्याचा उत्कट भावनाविष्कार करणारा शब्दांचा किमयागार... आपल्या साहित्यात रमवून ठेवणारा साहित्यिक ... त्यांच्या काव्यातील सहजता,नाविण्यपूर्णता वाचकांना मोहनी घातल्या शिवाय राहत नाही. त्यांच्या काव्यातील शब्दमाधुर्य व नादमाधुर्य नकळत काव्याला एक उदात्त रूप देवून जातो ..अनेक काव्यात अनुप्रास व यमकाचे सुंदर कोंदण केलेले दिसून येते. यामुळेच विनोदजी च्या काव्यात कृत्रिमतेचे कुठेही यत्कींचीत दर्शन होत नाही. सहज साधी,सोपी भाषाशैली काव्याला अमरत्व देवून जाते. काव्यातील सहजता व हृदयस्पर्शता काव्याला अधिक वाचणीय करते. आपला अधिकाधिक काळ साहित्य निर्मितीत रमणारा शब्दांचा किमयागार, एक मार्गदर्शक व कायम कौतुकाची थाप देणारे सकारात्मक साहित्यिक विनोदजी बोरे साहेब याच्याशी विवेकानंद आश्रम भेट प्रसंगी भेटीचा योग आला. यावेळी विविध विषयांवर चर्चेत रंगू गेल्यावर वेळ कसा गेला कळला सुद्धा नाही. त्यांच्या पुढील साहित्य निर्मितीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा...



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कष्टकरी भूमीपूत्राची उदयोगक्षेत्रात उत्तुंग भरारी !


हर सपने को अपने सांसो में रखों... हर मंजिल को अपने बाहो में रखों... हर जित आपकी है.. बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखों...या काव्याप्रमाणे कायम स्वप्नांचा पाठलाग करून त्यासाठी भूक,तहान हरवून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवितरपणे संघर्ष करण्याचे धैर्य फारच थोडया व्यक्तीजवळ असते. याचाच प्रत्यय विवेकानंद विद्या मंदिराचा माजी विद्यार्थी संदीप माणिकराव जाधव याच्या रूपाने दिसून येतो.  कुठल्याही प्रकारच्या उदयोग व्यवसायाची पार्श्वभूमी नसतांना केवळ जिद्द, चिकाटी व व्यवहारातील आव्हाने पेलण्याच्या बळावर संदीप जाधव याने पुणे येथे सोयाबीन पासून तयार होणा-या विविध खाद्य पदार्थ निर्मितीचा उदयोग यशस्वीपणे सुरू केला.
त्याचा हा  उद्योग कमी काळातच भरभराटीला आला. पाहता पाहता त्याच्या उत्पादनाने ग्राहकांच्या पसंतीला उतरले. स्वप्नांचा पाठलाग करण्याचे कसब व कौशल्य फारच थोडया लोकांना अवगत होते... आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास त्या ध्येयवेड्या लोकांना स्वस्थ बसू देत नाही... मग प्रवास सुरू होतो एका यशाची शिखरे एकटयाने पादाक्रांत करण्याचा...ह्रदयातील उर्मी,उर्जा व जिद्दीला कायम तेवत ठेवून अशी व्यक्ती  यशाच्या मार्गात येणा-या असंख्य अडचणी व संकटांचा सामाना करतात...आपल्यातील अतुलनीय बल व साहस याची अनुभूती व जाणीव होते. प्रत्येक ध्येयवेडयांची कदाचित स्वप्ने वेगवेगळी असतील मात्र ध्येयप्राप्तीसाठीची अभिलाषा मात्र एकच असते.
अशाच एका ध्येय वेडया नव उदयोन्मुख उदयोग सुरू करणा-या संदीप माणिकराव जाधव यांची...संदीप माणिकराव जाधव यांचे शालेय शिक्षण कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरात झाले. संदीप जाधव याने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथून  बी.एस.सी.अ‍ॅग्री चे शिक्षण घेतले आहे. मुळातच जिद्दी,चिकाटी व परिश्रमाची तयारी ठेणा-या संदीपने आपल्या कृषी शिक्षणाच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यासाठी करण्याचे ठरविले... खरतर मार्केटिंग  क्षेत्रातील अग्रगण्य आय.टी.सी. या कंपनीत १०  वर्ष काम केले. त्यामुळे साहाजिक लोकांची मानसिकता,आवड,उत्पादनाचे वितरणाचे हे कसब त्याने शिकले. 
खरतर मराठी माणूस हा स्पर्धेत टिकू शकत नाही. स्पर्धेतील आव्हाने पेलण्याची क्षमता नसल्यामुळे लवकरच तो कुठल्याही व्यवसायात  अपयशी होते हे त्याला मान्य नसल्यामुळे आपण एक नवीन उदयोग सुरू करून तो नावरूपाला आणावा असा ठाम निर्णय केला.


कुठलाही व्यवसायाचा प्रारंभ करतांना स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. आपण करीत असलेले काम जिद्दीने कायम सुरु ठेवा. आयुष्यात परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी आपली गुवत्तावाढीवर लक्ष केंद्रीत करा.

                                                                                       संदीप माणिकराव जाधव, उदयोजक

सोयाबीन पासून विविध पदार्थाची निर्मिती 
संदीप माणिकराव जाधव याने पुणे येथे सोयाबीन पासून निर्मित सोया दुध,सोया मँगो मिल्क,सोया कॉफी मिल्क,सोया चॉकलेट मिल्क,सोया पनीर,सोया बिस्कीट,सोया कुकीज,सोया आईस्क्रीम,सोया आटा,सोया सॉस अशी विविध उत्पादने निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्याचा हा  उद्योग अल्प काळातच भरभराटीला आला असून संदीप ग्रामीण भागातील युवकांसाठी यशस्वी उदयोजक बनला आहे.

सोयाबीन आरोग्यासाठी वरदान
सोयाबीनमध्ये मोठया प्रमाणात प्रोटीनची मात्र असते. सोयाबीनमध्ये प्रोटीन शिवाय व्हिटॅमिनखनिज आणि बी कॉम्प्लेक्स आहे. सोयाबीन दुध आरोग्यासाठी वरदान आहे. सोयाबीन दुधा मध्ये अंडे,मांस आणि मासेपेक्षा अधिक प्रमाणात प्रोटीन असते. सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. शरीराला सोयाबीनपासून अनेक फायदे होतात. आहारामध्ये नियमित  सोयाबीनचा वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते.

असे आहे सोयाबीनचे फायदे
ज्या व्यक्तीना मानसिक आजार आहे अशा व्यक्तींनी नियमीतपणे सोयाबीनचे सेवन केल्यास मानसिक आजारावर नियंत्रण मिळविता येते. ज्या व्यक्ती ह्रदयरोगापासून त्रस्त आहे अशा व्यक्तीनी सोयाबीन व त्यापासून बनविलेले पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास हदयाचा धोका दूर होतो. याशिवाय उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाब असणा-या व्यक्तीसाठी सोयाबीन रामबाण औषधी युक्त आहार आहे. तसेच सोयाबीनपासून लेसीथिन मिळते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते. याशिवाय सोयाबीनपासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटांचे विकार कमी होतात.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


हिवरा आश्रम येथे दहा दिवसांपासून नेट सेवा कोलमडली



गेल्या आठ  ते दहा दिवसापासून हिवरा आश्रम परिसरातील बीएसएनएल ची नेट सेवा विस्कळीत झाली आहे. सद्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचे कामकाज ऑनलाईन झाल्याने इंटरनेट अभावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी,पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीनविद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत विलंब होत आहे. नेट सेवा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना नैराशाचा सामना करावा लागत आहे.
हिवरा आश्रम हे जिल्हयातील  मोठे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. राज्य व राज्याबाहेरून मोठया प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थींनी येथे प्रवेशासाठी चढाओढ करीत असतात. याठिकाणी कृषी विद्या शाखेची दोन महाविद्यालये आहेत. सद्यस्थितीत कृषी महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रकीया सुरू  असल्याने इंटरनेट अभावी प्रवेश प्रकीयेत विद्यार्थ्यांना अनेक अडथळे येत आहेत. इंटरनेट अभावी  शैक्षणिक तथा  महत्वाच्या कामाकाजात आडकाठी येत आहे. नेट अभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे. ही नेट सुविधा कशामुळे बंद यासाठी सबंधित अधिका-यांशी दुरध्वनी द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. संबधीत अधिका-यांनी गांभीर्याने दखल घेवून विस्कळीत झालेली नेट सुविधा तातडीने सुरळीत करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.

शैक्षणिक प्रवेश प्रकीयेत अडचणी
मुक्त विद्यापीठाच्या विविध कृषी पदवीकेच्या प्रवेशसाठीची विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपडेड करावी लागत आहे. परंतु इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने त्याचा फटका अंदाजे ४० ते ५० विद्यार्थ्यांना होत आहे. इंटरनेट अभावी शैक्षणिक प्रवेश प्रकीयेत अडचणी येत आहे.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कृषी शिक्षण क्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. १ जून ते १५ जून पर्यंत आहे. परंतु या दरम्यान गत सात आठ दिवसापासून बीएसएनलचे इंटरनेटची सेवा विसकळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा मानसिक त्रास होवून अनेक प्रवेश प्रक्रीयेपासून वंचित राहण्याची संभावना आहे.
                               प्रा.मंगेश जकातेकेंद्र संयोजक विवेकानंद कृषी महाविद्यालय


नेट सुविधा विस्कळीत झाल्याने प्रवेश न झाल्यास शैक्षणिक सत्र वाया जाण्याची भिती वाटत आहे. प्रवेश प्रक्रीयेची अंतिम तारीख जवळ आली तरी सुध्दा नेट सुध्दा बंद असल्यामुळे मानसिक त्रास होत आहे.

                                    डॉ.सुभाष कालवे,केंद्र प्रमुख विवेकानंद कृषि महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८

दिपक दहावीच्या परिक्षेत चमकला !




हौसला कम न होगा तेरा तूफानों के सामने...मेहनत को इबादत में बदल कर तो देख...खुद ब खुद हल होंगी जिंदगी की मुश्किलें...बस खामोशी को सवालों में बदल कर तो देख...या कवीतेप्रमाणे आयुष्यातील खडतर प्रवासात सुध्दा आपले ध्येय व अथक परिश्रम  कायम ठेवीत दहावीच्या परीक्षेमध्ये दिपक भुंजगराव दिवठाणे या भूमीहीन व मोलमजूरी करणा-या आईच्या मुलाने इयत्ता दहावीच्या परिक्षेत कुठल्याही खाजगी शिकवणी वर्गाशिवाय ९६.२० टक्के गुण संपादन करून आपल्या स्वप्नांना कवेत घेतले आहे. भूमीहीन दिपकने आपल्या मिळवीलेल्या दहावीतीत उत्तुंग यशाच्या भरारीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव व त्याचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे. दिपक हा विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी आहे. दिपकला दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण  मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. दिपकला ५०० गुणापैकी ४८१ गुण मिळाले आहे. दिपक भुजंगराव दिवठाणे हा मेहकर तालुक्यातील मादनी या गावचा असून त्याला सुरूवातीपासूनअभ्यासाची आवड आहे. लहान असतांनाच वडीलाचे हरविलेले छत्र... कुटुंबातील घरातील कर्ताच्या जाणाने दिवठाणे कुटूंबाची झालेली परवड...घरी कुठलीही स्थावर मालमत्ता नाही की मदतीचा हात पुढे करणार कुणी नाही... भूमीहीन आईला कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी दुस-याच्या शेतात मोलमजूरी करण्याशिवाय पर्याय नाही...शिक्षण घेण्यासाठी कुठलं ही आर्थीक पाठबळाचा नाही....मात्र दीपकला डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याची लहानपणापासून इच्छा... दीपकने इयत्ता दहावीच्या परिक्षत ९६.२० टक्के गुण संपादन करून आपले एक पाउल आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकले आहे. ज्या शिक्षणामुळे मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते ते खरे शिक्षण... शिक्षण म्हणजे मानवी मूल्याची जोपासना करीत आदर्श जीवन जगण्याला मदत करणारी प्रणाली... प्रत्येक गोष्ट विवेकाच्या कसोटी तपासून पाहण्याची क्षमता विकसीत करण्याची कला म्हणजे शिक्षण... जे शिक्षण घेतल्याने माणसातील माणूसपण जागृत होते ते खरे शिक्षण.दिपक दिवठाणे या विद्याथ्र्याने दहावीच्या परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून वेगळी ओळख निर्माण केली आह. दिपकच्या घरची परिस्थीत अत्यंत जेमतेम असून तो भूमीहिन आहे. आई दुस-याच्या शेतात मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते मात्र मुलाच्या उज्वल भविष्यासाठी तीने आपल्या कष्टात कुठेही कमी केली नाही. आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासात कुठेही परिस्थिती आड येऊ नये म्हणूतन शेतात मोल मजूरीचे काम करून दिपकच्या वहया,पुस्तके,कपडयांसाठी पैसे उभे केले. दिपकने सुध्दा आईच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. रात्रदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेवून दहावी त्याला ९६.२० टक्के गुण मिळाले आहे. दिपकला कुठलीही खाजगी शिकवणी वर्गाशिवाय हे घवघवीत यश मिळाले आहे. दिपकला गणित विषयात १०० गुणापैकी १०० तर संस्कृत विषयात १०० गुण मिळाले आहे. अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम,चिकाटी हे आपल्या यशाचे गमक असल्याचे दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले.

विवेकानंद विद्या मंदिर विद्यार्थ्यांच्या यशाचा पथदर्शक
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींचे शिक्षणक्षेत्रावर विशेष लक्ष राहत असे. विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी तडजोड करू नका असा त्याचा कायम सल्ला असल्याकारणाने विवेकानंद विद्या मंदिराची उत्तुंग यशाची दीर्घ परंपरा पाहावयास मिळते. समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षण,अभ्यासास अनुकूल वातावरण,कडक शिस्त व शिक्षणासोबत संस्कार या सर्व बाबींमुळे विवेकानंद विद्या मंदिर शिक्षण घेणा-या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा कायम उंचावलेला दिसून येतो. विवेकानंद विद्या मंदिर हा विद्यार्थ्यांच्या यशाचा खरा पथदर्शक आहे.
                            अणाजी सिरसाट,मुख्याध्यापक विवेकानंद विद्या मंदिर

प्रवेशासाठी दिला सल्ला 
मेहकरचे प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.प्रशांत दिवठाणे हे दरवर्षी मादणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या  गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कायम विविध स्पर्धांचे आयोजन करीत असतात  व त्यामधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवित असत. त्यांनी दिपकची अभ्यासातील गुणवत्ता ओळखून त्याला मार्गदर्शन केले व पुढील शिक्षणासाठी दीपकचा हिवरा आश्रमच्या विवेकानंद विद्या मंदिरात प्रवेश निश्चित केला.


आपले ध्येय निश्चित करा,अभ्यासाचे नियोजन,सातत्य,अथक परिश्रम व आत्मविश्वास या पंचतंत्रीचा वापर केल्यास आयुष्यात कुठलेही यश सहजप्राप्त करता येते. आईच्या कष्टाची जाणीव स्वस्थ बसू देत नसल्याने अथक परिश्रम करून यश प्राप्त केले.

                      दिपक भुजंगराव दिवठाणे,हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८

उपहारगृहातील कामगाराच्या मुलाची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी

जिंदगी की असली उडान बाकी है... जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है...अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन हमने...अभी तो सारा आसमान बाकी है...वरील काव्य हे मनुष्याच्या जगण्याला केवळ उर्मीच देत नाही तर जीवनात यश मिळविण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडते. प्रतिकुल परीस्थितीशी दोन हात करण्याची हिॅमत देते. याचा प्रत्यय येतो हिवरा आश्रम येथील  अत्यंत प्रतिकूल परिस्थितील हिवरा आश्रम येथील सुमित संतोष लोळगे या विद्याथ्र्यांने दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के गुण मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे. सुमित चे वडील संतोष लोळगे हे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद उपहार गृहात मजूरीचे काम करतात तर आई अनिता हया माहेवारी मुलांचे डब्बे करून आपल्या पतीला कौटुंबीक उदरनिर्वाहासाठी मदत करतात.

शिक्षण हे मानवाच्या विकास प्रक्रीयेतील महत्वपूर्ण बिंदू आहे. शिक्षणाने मानवी जीवन समृध्द होत नाही तर त्याला गती देण्याचे काम सुध्दा करते. शिक्षाणाने मानसाच्या वैचारीक विचार धारेतसुध्दा आमूलाग्र बदल होवून माणूस विवेकसंपन्न होण्यास मदत मिळते.  सुमितने घराच्या प्रतिकूल परिस्थीतीचे कुठल्याही प्रकारचे भांडवल न करता दुर्दम्य इच्छाशक्तीने दहावीच्या परिक्षेत ९४ टक्के गुण संपादन करून उत्तुंग भरारी घेतली. शिक्षणाच्या माध्यमातून आपले दिवस बदलू शकतात.शिक्षण हे अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाते..परंतु हे शिक्षण घेण्यासाठी माणसाची साधारण आर्थिक परिस्थिती कधीच अडथळा ठरू शकत नाही असंच काहीतरी त्या हॉटेल कामगाराच्या मुलाने या निमित्ताने सिद्ध करून दाखवलं आहे.
सुमितच्या घरीची परिस्थित अत्यंत जेमतेम आहे. वडील हे अडाणी असल्यामुळे घरी शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी कुणाचा आधार नाही. सुमितने अशा परिस्थितीत न डगमगता मोठया परिश्रमाने अभ्यास करून ९४ टक्के पर्यंत मजल मारली आहे. आई वडीलांनी सुमितच्या शैक्षणिक मार्गात आपली परिस्थीतची आडकाडी येवून नये म्हणून खूप कष्ट केले तर सुमितने सुध्दा आपल्या अभ्यासात कुठलीही कसून न ठेवता ९४ टक्के गुण मिळवून आईवडीलांचे स्वप्न साकार केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने यशाची स्वप्ने पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमाची तयारी ठेवावी. मी सुरूवातीपासून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळेच दहावीच्या परिक्षेत यश मिळाले.
                                          सुमित संतोष लोळगे,विद्यार्थी हिवरा आश्रम

उच्च शिक्षण घेवून समाजसेवेचा मनोदय
सुमित हा विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी असून तो अभ्यासु व होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याला लहानपणापासून वाचन व अभ्यासाची आवड आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेवून समाजसेवा करण्याचा त्याचा मनोदय आहे.
                                          आत्मानंद थोरहाते,सहसचिव विवेकानंद आश्रम



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८