चिमुकल्यांनी उचलला जनजागृतीचा विडा !




प्लास्टिक पिशव्यांचा होणारा  अतिवापर टाळण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने  राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होवून मोठया प्रमाणात प्रदुषण होते. पिशव्यांच्या वापरावरती  बंदी जरी असली तरी काही ठिकाणी अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा पर्यावरणाचे रक्षण करा या हेतूने  हिवरा आश्रम येथे  विवेकानंद ज्ञानपीठात सुरू असलेल्या आनंद साधना संस्कार शिबीरातील चिमुकल्यांनी कागदापासून कागदी पिशव्या तयार करीत पर्यावरण रक्षणाचा समाजाला संदेश देवून जगजागृती केली आहे. प्लास्टिक पिशव्याच्या वापराने प्रदुषणात मोठया प्रमाणात वाढ होते. येथील आनंद साधना संस्कार शिबीरातील विद्यार्थ्यांनी कागदापासून विविध पिशव्यांची निर्मिती करून प्लास्टिक पिशव्या मुक्त अभियानाला आपल्या कृतीतून साकार करून या चिमुकल्यांनी जनजागृतीचा विडा उचलल्याने त्या चिमुकल्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीरात परिसरातील जळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  आहे. या शिबीरात विद्याथ्र्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अत्यावश्यक असणा-या विविध बाबी प्रामुख्याने शिकविल्या जात आहे. सकाळी ५ वाजता योग प्राणायामापासून विद्यार्थ्यांच्या दिनचर्येला सुरूवात होते. दिवसभर शिबीरात शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षणासोबत विविध सामाजिक जाणीवा वृध्दीगंत होणारे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दररोज विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील व्यक्तीचे नियमीतपणे मार्गदर्शन लाभत असून दररोज विविध सामाजिक उपक्रम या शिबीरात प्राचार्य मधुकर आढाव,विक्रांत राजपूत,रवि लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी यशस्वीपणे राबवितात.

पर्यावरण रक्षणाचा मंत्र
आनंद साधना संस्कार शिबीरात चिमुकल्यांच्या बालमनावर सुसंस्कारासोबत राष्ट्रप्रेम,सदाचार,नीतीमुल्यांची जोपासना,वडीलधा-यांचा आदर यासोबत पर्यावरण रक्षणार्थ प्रदुषण टाळा आरोग्य जपा,वृक्ष लागवड,पर्यावरण संवर्धनाचे धडे सुध्दा शिकविले जातात. या शिबीरात पर्यावरण रक्षणाची शपथ सुध्दा विद्यार्थ्यांना या शिबीरा दरम्यान देण्यात आली आहे.

प्लास्टिक पिशव्याच्या वापराने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.  आम्ही शिबीरात दरम्यान कागदी पिशवी निर्मितीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देवून जनजागृती करण्याचा छोटा प्रयत्न केला.                                                                                                                                      गौरव प्रकाश वानखेडे,शिबीरार्थी हिवरा आश्रम

आनंद साधना संस्कार शिबीराला परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. संस्कार शिबीरात विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना चालना मिळत आहे.
                                                    मधुकर आढाव,प्राचार्य विवेकानंद ज्ञानपीठ


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

संकटाच्या वेळी बुध्दी स्थिर ठेवा


मनुष्याच्या जीवनात संकटे येतात आणि जातात. जीवनातील येणा-या संकटांना न घाबरता धैर्याने,संयमाने सामोरे जावे. संकटामुळे  माणसाच्या क्षमतांचा विकास होतो. ज्याप्रमाणे अग्निमध्ये सोन सुलाखून त्याची किंमत वाढते, त्याचप्रमाणे संकटांचा सामना केल्यामुळे व्यक्तीच्या धैर्यात,संयमात वाढ होते. संकटाच्या प्रसंगी आत्मविश्वासासोबत विवेकाने संकटांना सामोरे जा. संकटाच्या वेळी बुध्दी स्थिर ठेवा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजित आनंद साधना बालसंस्कार शिबीरात शुक्रवारी शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी  ते बोलत होते.
पुढे बोलतांना थोरहाते म्हणाले कीबालमनावर संस्काराचे बीजारोपणासाठी आनंद साधना संस्कार शिबीर महत्वाची भूमीका बजावत आहे. संस्कार शिबीराच्या माध्यमातून संस्कारासोबत सामाजिक जाणीव वृध्दीगंत होण्यास मदत मिळते. भगवान बुध्दशिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातील प्रेरक प्रसंगांचे वर्णन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण करून जीवनात यश संपादीत करा असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार रवि लोखंडे यांनी मानले.

कला जीवनाच्या परिपूर्णतेचे माध्यम - संतोष गोरे


शिबीरातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहे. प्रत्येकाला आवडीप्रमाणे कला जोपासण्याची संधी दिली जात आहे. हस्तकला,शिल्पकला,गीत,संगीत यांची ओळख करून दिली जात आहे. या कला जीवनाच्या परिपूर्णतेचे माध्यम आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विवेकानंद ज्ञानपीठात आयोजीत संस्कार शिबीरात बोलतांना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिव संतोष गोरे उपस्थित होते.
 पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, सुगंध देणे हा फुलांचा गुणधर्म आहे काही काळ फुलणारे फुले हे वातावरणाला सुगंधी करून जातात. हसणा-या मुलाला जातधर्म,वर्णपंथ याचे ज्ञान नसते त्याचे हसणे  इतरांच्या दु:खाचा नाश करते. वाहणारी झरे माणसाची तहान भागवितात. तदवतच मानवी जीवन आहे. विद्यार्थी अवस्था ही जगण्यातील अत्यंत महत्वाची अवस्था झाली आहे. वाढती स्पर्धा पालकांच्या अपेक्षांचे ओझे,काळाच्या बरोबरीत स्वतःला सिध्द ठरविण्याचा खटाटोप यामुळे शिक्षणातून मिळणा-या आनंदाला आपण मुकत चाललेलो आहोत. ज्ञान हे केवळ पुस्तकातूनच मिळते असे नाही तर निसर्ग माणसाचा सर्वात मोठा गुरू असून फुलणारी फुले,हसणारी मुले,वाहणारे झरे हेच ज्ञानाचे व  आनंदाचे खरे  स्त्रोत आहेत आपण फुलासारखे फुलून इतरांना सुगंध देत राहावा आपल्या निरागस हास्याने इतरांच्या ह्रदयात घर करावे शिक्षणातून जगण्याचे भान निर्माण व्हावे व जगण्यावर प्रेम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी. कारण ज्ञान हे सदा सर्वकाळ मनुष्याला प्रकाशाच्या मार्गावरून पुढे नेत राहते. माहिती आणि ज्ञान यात प्रचंड फरक असून माहितीचा साठा सुख आणि आनंद निर्माण करेल असे नाही याउलट ज्ञानाने सत चित्त आनंद  स्वरूपाची प्राप्ती होवून मानवी जीवन सफल होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन प्राचार्य रवि लोखंडे यांनी मानले.

आधुनिक जीवनशैलीमुळे वाढतोय लठ्ठपणा !

fatness in child साठी इमेज परिणाम
आधुनिक जीवन शैली व आहारातील होणा-या बदलामुळे लहान मुलातील लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणामुळे लहानपणात मुलांना अनेक व्याधी जडण्याचा धोका सुध्दा नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना फास्ट फुडपासून दूर ठेवल्यास व काही दैनंदिन जीवनात थोडे फार बदल केल्यास लहान मुलातील लठ्ठपणावर नियंत्रण मिळविता येते. सद्या शहरी तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांमधील लठ्ठपणा हा पालकांमधील चिंतेचा विषय बनला आहे. लठ्ठपणामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होवूनत्यांच्यामध्ये निराशा निर्माण होते. लहान मुलांचे वजन वाढू नये म्हणून वेळोवेळी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही पालक आपल्या लहान मुलाचे वजन कमी करण्यासाठी त्याला मैदानी खेळाकडे पाठवितात. साधारणपणे ८ ते १० वर्षांची मुले असतांना शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी ती वाढत जाते परिणामी लहान मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. लहान मुलांचे वजन वाढीमागे अनेक कारणे असली तरी मैदानी खेळाचा अभाव, सतत एकाच ठिकाणी बसून राहणे,टि.व्ही.मोबाईल,कॉम्प्युटर वरती गेम खेळणे इत्यादी मुळे लहान मुलांचे वजन वाढते. काही मुलांमधील लठ्ठपणा हा अनुवांशिकतेमुळे असतो. तर काही मुलांच्या आहार व जीवनशैलीतील बदलामुळे त्यांचे वजन वाढून मुलांना लठ्ठपणा येतो. लहान मुलांना सकस व सात्वीक आहार द्यावा. लहान मुलांना जेवणात जास्त प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. मुलांमधील लठ्ठपणा कायम राहल्यास मुलांमध्ये हदयविकार,उच्च रक्तदाब,हाडांचे आजार व संधीवात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय मधुमेह होण्याची शक्यता सुध्दा वाढते.

मुलांच्या खाण्यावर ठेवा नियंत्रण
महान मुलांना जास्त चरबी असलेले पदार्थ खाण्यामध्ये देवू नये. याशिवाय कर्बोदके असलेल्या  पदार्थांपासून लहान मुलांना दुर ठेवावे. जास्त उष्मांक असलेले पदार्थ,समोसाबर्गर,वडापाव,आईस्क्रीम पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

लहान मुलांमधील स्थूलतेची कारणे
सोशल मिडीयाच्या काळात मुले मैदानी खेळ सोडून मुले मोबाईलकॉम्प्युटर आणि टी.व्ही.पाहण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे शरीराची  हालचाल न झाल्यामुळे चरबी वाढते.

आपल्या पाल्याचे वजन वाढून लठ्ठपणा येत असेल तर डॉक्टरांशी चर्चा करावी. मुलांच्या दिनचर्येत बदल करून त्यांना मैदानी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे.                                                                                                  डॉ.विशाल सुरूशे बालरोगतज्ञ,मेहकर



लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८