किमया बुधवाणीचा इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर विज्ञान प्रकल्प राज्यस्तरावर !


 येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिराची विद्यार्थीनी कु.किमया कमलेश बुधवाणी हिचा इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रथम येवून राज्यस्तरावर निवड झाली. आळी,किटकांमुळे दरवर्षी शेती मालाचे ३० ते ४० टक्के नुकसान होवून उत्पादन वाढीवर परिणाम होतोकिटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी मोठ्या रासायनिक किटनाशकांचा फवारणी करतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीमुळे प्रदुषणा सोबत मानवी आरोग्यावर दुष्परीणाम दिसून येतात. वाशिम जिल्हयातील कारंजा येथे दि. ३० जानेवारी ते फेबु्रवारी पर्यत ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट हायस्कुल कारंजा येथे संपन्न झालेल्या  इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत अवॉर्डी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये कु.किमया कमलेश बुधवाणी हिच्या इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर चा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक येवून तिची राज्यस्तरावर निवड झाली. या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीमध्ये बुलडाणा जिल्हयातून ४४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरासाठी निवड झाली. कु.किमया कमलेश बुधवाणी हि विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता वीची विद्यार्थीनी  आहे. किमयाला वडील कमेश बुधवाणी आई मधुमती बुधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रोजेक्ट बनविला होता. कु.किमया बुधवाणीच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, प्राचार्य कैलास भिसडे, उपप्राचार्य आत्मानंद थोरहाते, पर्यवेक्षक देवेंद्र मोरे, रमेश पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


बाल वैज्ञानिकाचे सर्वस्तरावर कौतुक
कु.किमया कमलेश बुधवाणी हि विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता वीची विद्यार्थीनी  आहे. किमयाला वडील कमेश बुधवाणी आई मधुमती बुधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रोजेक्ट बनविला होता. कु.किमया बुधवाणीच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वस्तरावर कौतुक होत आहे.

काय आहे इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर
शेतकरी बांधवांना अत्यंत कमी खर्चामध्ये इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर बनविता येते. यासाठी लाकडी फ्रेम,चाके,वेगळया आकाराची लोखंडी जाळी,मच्छरदाणी,बॅटरीसेल चार्चिंगसाठी चार्चर,एसी वायर इत्यादीची आवश्यकता असते. इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर किटकांपासून पिकांचे संरक्षण करता येते.

इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर मुळे शेतकरी बांधवांच्या फवारणीच्या खर्चात बचत होते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावून प्रदुषणाला आळा बसतो. इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलरचा विविध पिकांवरील कीटकांपासून बचावासाठी उपयोग करता येतो.
कु. किमया कमलेश बुधवाणी हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८







उज्वला जुनागडे सेट नेट उत्तीर्ण

जीतूगा मै यह खुद से वादा करो...जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो...तकदीर भी रूठे पर हिंमत न टुटे...मजबूत इतना अपना इरादा करो... या कवीतेतील ओळीचा प्रत्यय बुलडाणा येथील उज्वला भारतलाल जुनागडे यांच्या रूपाने येतो. लहानपणापासून हुशार व अभ्यासू असलेल्या उज्वला जुनागडे यांनी ग्रंथालय शास्त्र या विषयात सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण करीत आपले कर्तृत्व सिद्ध केले. या परीक्षांची तयारी करतांना त्यांनी कुठलीच कुचराई केली नाही. उज्वला जुनागडे यांनी दुर्दम्य इच्छा शक्ती,जिद्द  व प्रयत्नाची पराकाष्ठा करीत
ग्रंथालय शास्त्र या विषयात सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण केली.  युजीसी अंतर्गत घेणात आलेल्या नेट,सेट या परिक्षेत यश  त्यांनी यश संपादित केले. उज्वला जुनागडे या सध्या पुणे येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठात  कनिष्ठ ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. उज्वला जुनागडे यांनी संपादन केलेले यश खरोखर कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. त्यांच्या यशाचे श्रेय पती आनंद जाधव,आई वडील,सासू व सासरे यांना देतात.

संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

किमया बुधवाणीचे फोल्डेबल हेल्मेट तालुकास्तरावर


विवेकानंद विद्या मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये येथील किमया कमलेश बुधवाणी या विद्यार्थीनीचे फोल्डेबल हेल्मेट प्रथम आले असून याची तालुकास्तरावर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त असलेल्या जिज्ञासू संशोधक वृत्तीला चालना प्रोत्साहन देण्यासाठी विवेकानंद आश्रम दरवर्षी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन  करण्यात येते. विवेकानंद विद्या मंदिरात आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला जिल्हाभरातील बालवैज्ञानिकांना आपल्या प्रयोगाव्दारे अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध होते. यावर्षी  या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील १२६ बालवैज्ञानिकांनी आपला सहभाग नोंदविला होता. विवेकानंद विद्या मंदिरात इयत्ता मध्ये शिकणारी कु.किमया कमलेश बुधवाणी या विद्यार्थीनीच्या फोल्डेबल हेल्मेट चा प्रथम क्रमांत येवून तीच्या फोल्डेबल हेल्मटची तालुकास्तराव निवड झाली. दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यू पावणा-यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मृत्यू होते. किमया बुधवाणी हीने बनविलेले फोल्डेबल हेल्मेट हे अत्यंत कमी खर्चात घरी तयार करता येते. हे हेल्मेट अत्यंत कमी वजनाचे असल्यामुळे मान दुःखीच्या रूग्णांसाठी या फोल्डेबल हेल्मेट फायदेशीर ठरणार आहेया विज्ञानप्रदर्शनी मध्ये वर्ग ते मधून प्रथम क्रमांक फोल्डेबल हेल्मेट या कु.किमया बुधवाणी हीचा आला. तर व्दितीय सुरक्षा अलाराम आनंद खराटे,तृतीय जलविद्युत निर्मिती महेश देवकर यांने पटकाविला. वर्ग ते मधून प्रथम प्रथम डोंगराळ प्रदेशातील वाहतूक सुरज कंकाळ,अनिल धंदर,व्दितीय ईस्त्राईल शेती कु.पुजा काकडे,कु.पुजा डुकरे,कु.पुजा जाधव तर तृतीय स्मोक क्लिनर ओम पोफळे,नकुल देशमुख,मंगेश खिल्लारे यांनी पटकाविला.विज्ञान प्रदर्शनाचे मुल्यमापन प्रा.तायडे,प्रा.राठी,प्रा.दाभाडे ,मारोती ठाकरे,विजय गोसावी,मारोती घोरपडे,विष्णु सुरडकर,सदानंद शेळके यांनी केले.

असे बनविले फोल्डेबल हेल्मेट
मक्याचे पिठ आणि पाणी यांचे मिश्रण करून द्रावण तयार करावे हे द्रावण प्लास्टिक पिशवी मध्ये भरावे टोपी मध्ये ही पिशवी घालावी. मक्याचे पिठ आणि पाणी यांच्या मिश्रणाने नॉन न्युटेनियन फ्लूड  तयार होतो. जेव्हा या मिश्रणावर अचानक दाब पडता क्षणीच न्युटेनियम फ्लूड कडक बनतो त्यामुळे डोक्याला जबर मार बसण्यापासून वाचता येते.

रस्ता अपघातामध्ये डोक्याला जबर मार बसल्यामुळे मृृत्यू पावणाèयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फोल्डेबल हेल्मेट ही अत्यंत कमी खर्चात तयार होते.
किमया कमलेश बुधवाणी, विद्यार्थीनी हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८