विवेकानंद कृषीचे विद्यार्थी कृषी प्रयोगशाळेवर गिरवितात प्रात्यक्षिकाचे धडे !





शेतीचे ज्ञान हे वातानुकूलीत खोलीमध्ये राहून शिकता येत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन राबावे लागते. त्यासाठी मातीचा स्पर्श अनुभवावा लागतो. यासाठी प.पू. शुकदास महाराजांनी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या सुरूवातीपासून कटाक्षाने लक्ष दिले. विद्यार्थ्यांना  फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिक्षण दिले तर ते अधिक परिणाम कारक ठरते. याचा प्रत्यय येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद कृषी शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींनी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रायोगीक तत्वावर करीत आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासाठी एक एकर क्षेत्रामध्ये सदर कृषी प्रयोगशाळा उभारली असून या कृषी प्रक्षेत्रावर विद्यार्थी प्रत्यक्ष अभुभवातून कृषीचे अद्यावत शिक्षण घेतांना दिसून येत आहे. कृषी शाखेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये कृषीशी निगडित सर्व अन्नधान्ये पिके,फळे,भाजीपाला,फुलशेती यांची लागवड, खते, पाणी, कीड रोग, पिकांची काढणी, मळणी, आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी अवजारे, साठवणूक आणि विक्री या बाबीचा सखोल अभ्यास विद्याथ्र्यांना असतो. सध्याची कृषी शिक्षण पध्दती ही अत्यंत जलद असून  ती सहामाही सत्रात विभागल्या गेली आहे. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना अभ्यासक्रम वेळात आटोपता घ्यावा लागतो. पुस्तकात वाचून परिक्षेची तयारी करता येते मात्र प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय त्या विषयाचे परिपूर्णपणे आकलन होत नाही. याच बाबींचा विचार करून विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या मार्गदर्शनात प्रा.समाधान जाधव,प्रा.पवन थोरहाते यांनी महाविद्यालयातील प्रक्षेत्रावर रब्बीशी निगडीत सर्व पिकांची पेरणी विद्यार्थ्यांनाकडून करून घेतली. 


शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्षेत्राचे नियोजन

कृषी शाखेत प्रवेश घेतल्यापासून ते अंतिम वर्षापर्यंत विद्यार्थी विद्यार्थींनींना प्रत्येक पातळीवर शेतीचे शास्त्रशुध्द पध्दतीने अनुभवातून ज्ञान दिले जाते. या विद्यार्थ्यांना रब्बी हंगामात हरभरा,सुर्यफूल,करडी,जवस,वाटाना,बटाटे,हे पिके लागवडीकरीता देण्यात आलेले आहे. सदर विद्यार्थी पीक लागवडीपासूत ते  काढणीपर्यंत या पिकांची लागवड,पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन,रोड नियंत्रण,किड नियंत्रण,पिकांची काढणी,मळणी या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करतात. 

विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात शेतीचे अद्यावत शिक्षण देण्याचा मानस आहे.
 प्रा.समाधान जाधव,विभाग प्रमुख कृषीविद्या विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


किमया बुधवाणी ठरली बालवैज्ञानीक




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी.शालेय विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व संशोधनवृत्तीला चालना मिळावी म्हणून येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठामध्ये दि.१८ डिसेंबर ते १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये कु.किमया कमलेश बुधवाणी हिच्या लाय फाय हे  उपकरण तालुकास्तरावर प्रथम आले. ग्रामीण भागातील या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये मेहकर तालुक्यातील २२८ बालवैज्ञानिकांनी आपली विज्ञान उपकरणे घेवून सहभाग नोंदविला होता. कु.किमया बुधवाणी ही विवेकानंद आश्रमाचे माजी सचिव तथा विवेकानंद विद्या मंदिरातील कार्यरत असलेले शिक्षक कलेश बुधवाणी यांची मुलगी आहे. किमया हीला लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड आहे. कमलेश बुधवाणी हीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
मेहकर तालुका विज्ञान संघटना व शिक्षण विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने हिवरा आश्रम येथील विवेकानंद ज्ञानपीठात दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील २२८ विद्यार्थ्यांनी आपली उपकरणासह सहभाग नोंदविला होता.या तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनीमध्ये उच्चप्राथमिक गटातून कु.किमया कमलेश बुधवाणीने प्रथम क्रमाक पटाकाविला आहे. कु.किमया बुधवाणी ही मेहकर येथील सेंट्रल पब्लीक स्कुलची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी आहे. कु.किमया हीने लाय फाय स्मार्ट सिटी हे उपकरण बनविले होते. तिच्या लाय फाय स्मार्ट सिटी उपकरण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम आले. 

कु.किमयाला हिला शिक्षका वर्षा लंबे व प्राचार्य गजानन निकस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे,मेहकर तालुका विज्ञान संघटनेचे अध्यक्ष भागवत दळवी,विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,प्राचार्य अणाजी सिरसाट,पंढरीनाथ शेळके तथा आqद मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कु.किमया बुधवाणी चा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कु.किमया बुधवाणीचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

असे आहे लाय फाय उपकरण
स्मार्ट फोनमधून एलईडी लाईटला ऑडिओ सिग्नल दिले.समोर असलेल्या सोलर पॅनलमध्ये सदर डाटा रिसिव्ह होतो. त्यानंतर सिग्नलचे आऊटपुट अ‍ॅम्पलीफायरच्या मदतीने स्पीकरला दिला. अशा प्रकारे डाटा ट्रान्सफर होतो. लाईट फिडेलीटी हे डाटा ट्रान्सफरचे इकोफ्रेन्डली माध्यम असून त्यांचा मानवी आरोग्यावर कुठलाही दुष्परीणाम होत नाही.


विज्ञानप्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा व संशोधक वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रदर्शनी सहभाग घेवून नवनवीन उपकणाची निर्मितीतून आपली क्षमता सिध्द करावी
             कु.किमया कमलेश बुधवाणी हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




विवेकानंद आश्रमाचे कार्य वृंध्दीगत होत राहणार -डॉ.रवींद्र कोल्हे




विवेकानंद आश्रम ही समाजोपयोगी काम करणारी मोठी संस्था आहे. संस्थेला भेट देण्याची अनेक वर्षापूर्वीची इच्छा आज पूर्ण झाली. संस्थेच्या सुंदर,स्वच्छ व भावपूर्ण परिसराचे दर्शन झाले. अत्यंत तळमळतेने सुरू केलेले कार्य मानव समाजासाठी निश्चितच उपयुक्त आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी सुरू केलेले हे कार्य वृंध्दीगत होत राहणार असल्याचे विचार सुप्रसिध्द समाजीक कार्यकर्ते डॉ. रवींद्र  कोल्हे यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेटी प्रसंगी बुधवारी ता.१९ रोजी काढले.  विवेकानंद आश्रमात  दुपारी एक वाजता त्यांचे आगमन झाले. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यांची विदर्भाच्या विकासासाठी संस्थेने शेतकèयासाठीचे काही संशोधनात्मक प्रकल्प सुरू करावेत त्यासाठी मी संस्थेच्या सोबत असेल असेही विचार त्यांनी त्यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विवेकानंद आश्रमाव्दारे सुरू असलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,अभिषेक आकोटकर तथा आदी हजर होते.


विवेकानंद कर्णबधीर विद्यालयास एल.ई. डी. टि.व्ही. भेट !



विवेकानंद कर्ण बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक जगातील चालू घडमोडी व अद्यावत माहिती टि.व्ही च्या माध्यमातून मिळावी या उदेशाने मेहकर येथील बालाजी संस्थान व काकडा आरती भक्त मंडळाने विवेकानंद कर्ण बधिर विद्यालयास सॅमसंग कंपनीचा ३२ इंच एल.ई.डी. टि व्ही रविवार ता.१६ रोजी भेट दिला. 
मेहकर येथे बालाजी प्रगट पवित्र पर्वाच्या कार्यक्रमामध्ये प.पू. महेश महाराज व्यास यांच्या हस्ते सदर एल ई डी टि. व्ही भेट दिला. यावेळी बालाजी संस्थानचे अध्यक्ष नारायण सावजी, सचिव दीपक पांडे, विस्वस्त उमेश जी मुंदडा,अ‍ॅड हेमंतराव देशमुख,डॉ नंदकुमार नहार,अ‍ॅड संजय सदावर्ते,डॉ. अरुण देशपांडे, विजय गिरी, व मॅनेजर हनुमंत देशमुख तसेच बालाजी आरती  भक्त मंडळाचे सतीश हेडा, राजुभाऊ जैस्वाल, कपिल अग्रवाल, सुनील मुंदडा, विनोद राऊत,गणेश गिरी, संजय सदावर्ते ,अवि कळसाईत,अजय कलगावकर ,लक्ष्मीकांत मोहरील.नवल मुंदडा,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,विवेक दळवी तथा आदि उपस्थित होते.
कानानी बहिरा मुका परी नाही...शिकविता भाषा बोले कसा पाही...शिक्षणाने बौध्दिक क्षमतेच्या विकासासोबतच संस्काराचे संवर्धन होते.बुलडाणा जिल्हयातील कर्णबधिर विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी २५ वर्षापूर्वी विवेकानंद कर्णबधिर विद्यालय सुरू केले. विवेकानंद कर्णबधिर विद्यालयात सात जिल्हयातून आलेले ७५ कर्णबधिर विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षणासोबत  विवेकानंद कर्णबधिर विद्यालयातील मिळावी कौशल्यप्रधान व्यवसायाचे ज्ञान सुध्दा दिल्या जाते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश हेडा यांच्या वतीने विवेकानंद कर्णबधिर विद्यालयातील विद्याथ्र्यांना पाण्याच्या बॉटल सुध्दा भेट दिल्या. विवेकनंद आश्रम परिवाराच्या वतीने विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी मनपूर्वक आभार मानले.


हिवरा आश्रम येथील विवेकानंद कर्णबधिर विद्यालयात शिक्षण घेणा-या विद्याथ्र्यांना टि.व्ही च्या माध्यमातून मनोरंजासोबत जगातील चालू घडामोडीच्या माहितीसाठी उपयुक्त ठरेल.               
                                                            नारायण व्यास अध्यक्ष बालाजी संस्थान मेहकर


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


हिवरा आश्रम येथे सकाळ चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद



ग्रामीण भागात बालचित्रकाराच्या प्रतिभेला कल्पनाशक्तीला उत्कृष्ठ दर्जाचे व्यासपीठ देणारी सकाळ चित्रकला स्पर्धा येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापीत विवेकानंद विद्या मंदिरात रविवार(१६) रोजी संपन्न झाली. या चित्रकला स्पर्धेसाठी विद्याथ्र्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला. या चित्रकला स्पर्धेत हिवरा आश्रम,हिवरा बुद्रक,शिवाजी नगर,पेनटाकळी,गजरखेड,दुधा,ब्रम्हपूरी,नांद्रा धांडे,बा-हई,नागझरी,देऊळगाव माळी, लव्हाळा या परिसरातील मुले मुलींनी मोठया संख्येने सहभागी झाले होते. या चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अणाजी सिरसाट,उपप्राचार्य प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक आत्माराम जामकर, विवेकानंद विद्या मंदिरातील शिक्षक वृंद राजेश रत्नपारखी,हनुमान वाळले,भाष्कर वायसे,मधुकर हतागळे,पत्रकार संतोष थोरहाते यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण विद्याथ्र्यांच्या सुप्तकलागुणांना नवे व्यासपीठ मिळाले. रंग,रेषा कल्पनाशक्ती च्या अदभूत किमयेतून चित्र साकारण्याची एक संधी मिळते.
                                                                  कार्तिक रत्नपारखी हिवरा आश्रम

सकाळ चित्रकला स्पर्धा ही आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आम्ही निश्चितच हया सुवर्ण संधीचे सोने करून आमच्यातील बालकलाकराला जागृत करू. सकाळने आयोजीत केलेल्या चित्रकलेमुळे आमच्यातील कलाकाराला नवे व्यासपीठ मिळाले आहे.
                                                                         समिक्षा देशमुख हिवरा आश्रम


विवेकानंद विद्या मंदिरातील जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थीनी सकाळ चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले. सकाळने आमच्या केंद्राची निवड केल्याबद्ल मी त्यांचा आभारी आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना चित्रकलेची आवड निर्माण होवून त्यांच्यातील कलागुणांना चालना मिळले.
                                                                  अणाजी सिरसाट, प्राचार्य विवेकानंद विद्या मंदिर


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८