मराठी सुविचार




























































आभासी दुनियेतून बाहेर या, आयुष्याकडे डोळे उघडून बघायला शिका!



माणसाच जगण अमूल्य आहे. जगण्यातल्या वास्तवापासून दूर गेल्याने आभासी जगाचे आकर्षण वाटू लागते. जगण्यात येणा-या समस्या सोडवतांना तोल न ढळू देता वास्तवाचे भान ठेवावे. कुठलाही चमत्कार आपल्या जगण्यातील गती कमी अधिक करू शकत नाही. शाश्वत मूल्यांचा अंगिकार केल्याने जगण्याला बळ मिळते. आभासी दुनियेतून बाहेर या, आयुष्याकडे डोळे उघडून बघायला शिका!असा मौलिक संदेश प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दैनिक सकाळशी मंगळवारी (ता.५) मुलाखती दरम्यान दिला. दरम्यान अंतरिक प्रेरणा चिरंतन प्रवाहीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, संघर्ष करण्याची शक्ती ही निसर्गदत्त देणगी परमेश्वरांने प्रत्येकाला दिलेली आहे. आपल्यात असलेल्या प्रचंड उर्जेपुढे आपण करीत असलेला संघर्ष क्षुल्लक आहे. सतपुरूष माणसाच्या या दिव्यत्वाच्या प्रगटीकरण्याच्या प्रक्रीयेला वाट मोकळी करून देतात. कधीकाळी समस्येचा डोंगर खाद्यावर घेवून उध्दवस्त अवस्थेत जगणारी सिंधुताई सपकाळ हे सर्व सहन करू शकते याचा अर्थ प्रत्येकात ती शक्ती आहे. सिंधुताई आज भावनिक झालेल्या दिसल्या. अनेक वर्षापूर्वी मी या आश्रमात आले होते. माझे दुःख पाहून महाराजांचे डोळे पाणावले होते. अनेक निराधारांचा आधार बनू शकणारी तू अनेकांच्या जगण्यात आनंद पेरण्याचे सामर्थ्य असलेली तू खचुन न जाता संकटाशी सामना कर हे शुकदास महाराजांचे प्रेरणादायी विचार जगण्याची दिशाच बदलून गेले. कधीकाळी नकोशा झालेले जीवन आज कृतार्थ वाटते. आश्रमाच्या वृध्दाश्रमाला भेट दिली. उच्चशिक्षीतांची आई वडील तिथे राहतात परंतू कमी शिकलेला,साधा भोळा शेतकरी मात्र आजही आईवडीलांना स्वतःपासून दूर करत नाही. कोणते शिक्षण दिले आपण या उच्चशिक्षीतांनाकाय दिले या उच्चशिक्षीतांना आपल्या शिक्षण पध्दतीनेमाणूसपण जागविणारे शिक्षण कधी मिळणार आहे असेही पुढे बोलतांना सांगितले.

विवेकानंद आश्रम समाजाचे शक्तीस्थळ
विवेकानंद आश्रमासारख्या याच अर्थाने समाजाचे शक्तीस्थळ आहे. या परिसरात आल्याने मानवी संवेदनांना पाझर फुटतो. आपल्यात असलेल्या अलौकीक सामर्थ्याची जाणिव निर्माण होते व लक्षात येते कीत्याच्यात आणि माझ्यात काहीच अंतर शिल्लक नाही.

तरुणांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत
तरूणांना मी हेच सांगेन मशाली पेटत्या ठेवा. अंधाराचे साम्राज्य केंव्हाही विस्तारू शकते. कणखरपणे उभे राहा. जीवनात संघर्ष करायला शिका. तुमच्यात सॉक्रेटीस,जिझस,बुध्द,विवेकानंद ,टागोर आहेत. विसरू नका तरुणांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे.                                                                                                                                                                                       
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८७

यशाचा मार्ग दाखविणारे विवेकानंद विद्या मंदिर !





स्वामी विवेकानंदांच्या दिव्य व ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी हिवरा आश्रम या छोट्या खेड्यामध्ये विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. ग्रामीण भागातील कष्टकरी,भोळ्याबाबड्या लोकांना स्वामी विवेकानंदांचे वैचारीक विचार  उमगण्यासाठी,कळण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य कर्मयोगी संत शुकदास महाराजश्रींनी केले. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज आयुष्यभर समाजाच्या उत्कर्षासाठी,समाजोन्नतीसाठी अविरतपणे कार्य कार्य केले.
ज्या मी देवाचा, आहे उपासकA करून ओळख, देतो त्याची AA
 या इकडे तुम्ही, पहा तो नयनीA  नटला रूपांनी, दुःखितांच्याAA
महाराजश्रीं रंजल्या गांजल्या मध्ये ईश्वर शोधून त्यांची शिव भावे सेवा केली. दीड कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. शिक्षणा शिवाय समाजाचा विकास अशक्य आहे हे ओळखून महाराजश्रींनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात प्रवाहित केली. शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची अत्यंत साधी,सरळ व सर्वसामान्याला कळेल अशी व्याख्या  कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री केली. ज्या शिक्षणामुळे मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते ते खरे शिक्षण... शिक्षण म्हणजे मानवी मूल्याची जोपासना करीत आदर्श जीवन जगण्याला मदत करणारी प्रणाली... प्रत्येक गोष्ट विवेकाच्या कसोटी तपासून पाहण्याची क्षमता विकसीत करण्याची कला म्हणजे शिक्षण... जे शिक्षण घेतल्याने माणसातील माणूसपण जागृत होते ते खरे शिक्षण...ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुरूकुल पध्दतीने हसत खेळत क्लिष्ट वाटणारे विषय अत्यंत साध्या व सोप्या पध्दतीने शिकविण्याची कला ज्या विद्या मंदिरात शिकविली जाते ते म्हणजे विवेकानंद विद्या मंदिर... आयुष्याला कडक शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही.विवेकानंद विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्काराचे मूल्य त्याच्या बालमनावर रुजविल्या जाते.या विद्या मंदिराची गेल्या अनेक वर्षांपासून यशाची उज्वल परंपरा कायम असून यावर्षी सुध्दा  ज्या शिक्षणामुळे समाजाच्याग्रामीण भागातील होतकरू,हुशार गरीब विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी विवेकानंद विद्या मंदिराची सुरूवात केली. विवेकानंद विद्या मंदिर म्हणजे कडक शिस्त,गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीचा ध्यास घेतलेली शैक्षणिक संस्था होय. विवेकानंद विद्या मंदिरातील सर्मपित भावनेने ज्ञान यज्ञाचे कार्य करणारे शिक्षकवृंद विद्याथ्र्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सदोदीत प्रयत्नशील असतात. यावर्षी सुध्दा दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा विवेकानंद विद्या मंदिराने कायम राखली आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिराचा इयत्ता दहावीचा  निकाला ८६.१४ टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. परिक्षेला २५९ विद्यार्थी बसले असून २२४ विद्याथ्र्यांनी परिक्षेत यश प्राप्त केले आहे. प्राविण्य श्रेणीत ५३,प्रथम श्रेणीत ६७ ,व्दितीय श्रेणीत ७७ तर पास श्रेणीत २७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दिपक भुजंगराव दिवठाणे याने गणित व संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून ९६.२० टक्के गुण संपादन केले आहे. सागर विजय अवचार ९६ टक्के,कु श्रध्दा रविंद्र नप्ते ९५ टक्के, उदय महादेव धोंडगे ९४.६०,कु.पुनम प्रभाकर अवचार ९४ टक्के,कु.वैष्णवी भाष्कर आटोळे ९३.८० टक्के, सुमित संतोष लोळगे ९३.८० टक्के,देवदत्त विकास खरात ९३.६० टक्के, साहिल श्रीराम काळे ९२.४० टक्के,अभिषेक विष्णु रहाटे ९२.४०,कु.अन्नपुर्णा अर्जुन थोरहाते ९१ टक्के,कु.समृध्दी सुनिल मवाळ ९०.४० टक्के,वैभव सुरेश बोरे ९०.४०, कु.राई प्रदीपकुमार लांडे ९०.२० टक्के,कु.प्रिती गणेश इंगळे ९०.२० टक्के तर गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळणा-या सागर विजय अवचार,उदय महादेव धोंडगे, कु.श्रध्दा नप्ते,अभिषेक विष्णु रहाटे या विद्याथ्र्यांनी गुण संपादन केले. हे सर्व गुणवंत विद्यार्थी कुठल्याही शहारातील महागडया शिकवणी वर्गाशिवाय त्यांनी हे यश संपादन केले आहे हे विशेष.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८७


विवेकानंद आश्रम म्हणजे जनकल्याणाचा वसा - प्रख्यात समाजसेविका सिंधुताई सपकाळ


माणसाचे जीवन अमूल्य आहे. जीवन जगतांना येणा-या 
दुःखाने,नैराशाने खचून न जाता जे आयुष्य वाटयाला आले त्याचे सोने करता आले पाहिजे. माझे जीवन घडतांना मला त्याचा प्रत्यय आला आहे. असेच माणसाला दुःखमुक्त करण्याचा ध्यास घेतलेल्या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज नावाच्या एका व्रतस्थ संन्यासाने निर्माण केलेला विवेकानंद आश्रम हा जनकल्याणाचा वसा घेतलेली संस्था आहे असे उदगार प्रख्यात समाजसेविका उर्फ माई यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेटी प्रसंगी मंगळवारी (दि.५) रोजी संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयातउपस्थित पत्रकारांशी संवाद साधतांना काढले. शुकदास महाराजांच्या पश्चात ते गेल्याने मोठी पोकळी निर्माण होणे साहाजिक आहे परंतु त्यांच्या सावलीत परिपक्व झालेली देवमाणसं अजूनही त्याच्या सेवेचा वसा तेवढयाच ताकतीने समर्थपणे चालवित आहेत ही अत्यंत समाधानाची बाब आहे. खुप वर्षा अगोदर मी आश्रमात आले होते. माझ्या जीवनाचा संघर्ष पाहून महाराजांचे डोळे भरून आले होते. त्यांनी मला जगण्याचे बळ दिले व इतरांसाठी जगण्याने माणूस खरा सुखी होतो हा मंत्र दिला. मी आज समाजासाठी जे कार्य करीत आहे. ही त्यांचीच प्रेरणा आहे. आज महाराज नसल्याने मन गलबलून आले आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व ग्रंथ यथोचित देवून सत्कार केला.
शुकदास महाराजांचे कार्य अलौकीककार्याला सलाम
लाखो व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करतांना या महापुरूषाने स्वतःच्या आरोग्याकडे व व्यक्तीगत जगण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे महाराजांना आपल्यातून लवकर जावे लागले. सर्वसामान्यांना सुखापर्यंत पोहचविण्यासाठी शुकदास महाराजांनी स्वतःचे जीवन समर्पित केले. मी त्यांच्या कार्याला सलाम करते.
मातीशी इमान राखणारा वर्ग दुर्लक्षित
साध्या भोळया लोकांनी हा देश जीवंत ठेवला आहे. श्रम करणारा,मातीशी इमान राखणारा वर्ग दुर्लक्षित राहता कामा नये. संस्कार आणि देशसेवेचे व्रत स्वीकारलेला हा मोठा वर्ग मुख्य प्रवाहात सामील होणे व त्याचा विकास होणे म्हणजेच ख-या अर्थाने देश भक्कम करणे होय.
हदयाशी संवाद साधणारा खरा शिक्षक
शिकणे म्हणजे निर्मिती, समंजसपणा,मनाचा मोठेपणा,इतरांच्या सुखात सुख शोधणे होय. जे शिक्षण दुर्बलांना आधार देते.त्यांना ताठ मानेने जगणे शिकविते तेच खरे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा डोंगर नाही. तर हदयाशी संवाद साधण्याची कला.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८