संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
संतोष थोरहाते : आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्...
संतोष थोरहाते : आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्...: आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्धा एरवी संपूर्ण दिवस वैद्यकिय सेवेत मग्न असणारे... रूग्णसेवेमुळे कुटुंबासाठी सुध...
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्धा
आरोग्य दूतांनी पुर्ण केली दोनशे किमी ब्रेवेट स्पर्धा
एरवी संपूर्ण दिवस वैद्यकिय सेवेत मग्न असणारे... रूग्णसेवेमुळे कुटुंबासाठी सुध्दा फारसा वेळ देऊ न शकणारे... आपल्या रूग्णसेवेच्या माध्यमातून व्याधीग्रस्तांच्या व्याधीमुक्त करणा-या मेहकर येथील डॉक्टर्स ग्रुपने नुकत्याच वाशिम येथे पार पडलेल्या ब्रेवेट स्पर्धेत सहभाग नोंदवित २०० किमी स्पर्धा पहिल्याच तयारीत यशस्वी केली. प्रथमच वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तींनी ब्रेवेट स्पर्धा यशस्वी केल्याने त्यांचे परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहे.
वाशिम रॉदिनियर्स क्लबने रविवारी (दि.१८) रोजी आयोजित केलेल्या २०० किमी मीटरची ब्रेवेट स्पर्धा मेहकर येथील डॉक्टरांनी केवळ १३ तास ३० मिनीटामध्ये पूर्ण केले. वाशिम येथून सुरू झालेल्या या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धा मालेगांव,मेडशी,पातूर,अकोला मार्गे बाळापूर परत बाळापूर,अकोला,पातूर,मेडशी,माले गांव मार्गे वाशिम अशी एकून २०० किलोमीटरचा प्रवास या डॉक्टराच्या ग्रुपने केवळ १३ तास ३० मिनीटात यशस्वी पूर्ण केली. यामध्ये मेहकर येथील नेत्ररोगतज्ञ डॉ.प्रशांत दिवठाणे,स्त्रीरोगतज्ञ डॉ.प्रमोद जाधव,दंतरोग तज्ञ डॉ.अमित जोशी,हृदयरोगतज्ञ डॉ.गजानन कुळसुंदर,बालरोगतज्ञ डॉ.विनायक चांगाडे,जनरल सर्जन डॉ.अनिल राठोड,शिक्षक प्रमोद भालेराव,चेतन शर्मा असे एकून ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
वाशिम येथून सुरू झालेल्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी बालरोगतज्ञ डॉ.आशिष नरवाडे,फॅमिली फिजीशियन डॉ.सुनिल भराडे यांनी सहकार्य केले होते. तर ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून वाशिम येथील सौ.अलका गि-हे व पवन शर्मा यांनी सायकलिंगला पुढे नेण्यास सहकार्य केले. जनमानसात आरोग्याबाबत जागृती व व्यायामाचे जीवनातील महत्व पटविण्यासाठी आपण स्पर्धेत सहभागी झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी बोलतांना सांगीतले. मेहकर येथील वैद्यकिय क्षेत्रात असलेला हा डॉक्टर्सचा ग्रुप नियमीतपणे २५ ते ३० किलोमीटर सायकलिंग करत असल्याचे दै.सकाळशी बोलतांना सांगीतले.
असे आहेत सायकलिंग फायदे
सायकलिंग हा शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी सहज करता येणारा व्यायाम असून नियमीत सायकलिंग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. सायकलिंगच्या नियमीत व्यायामाने शरीरातील अतिरीक्त चरबी जळून लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते. मेंदूकडे रक्तपुरवठा सुरळीतपणे प्रवाहित झाल्याने मेंदूच्या कार्यक्षता वाढून रोगप्रतिकारक्षमता वाढते.
आरोग्य ही खरी संपत्ती आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाला नकळत अनेक व्याधी जडतात. प्रत्येकाने नियमीत स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम,संतुलीत आहार व व्यसनापासून दूर राहल्यास अनेक व्याधींना दूर राखता येईल.
डॉ.प्रशांत दिवठाणे नेत्ररोगतज्ञ ,मेहकर
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
घ्या कॅल्शियमयुक्त आहाराला, दूर ठेवा ऑस्टीयोपोरोसीसला !
घ्या कॅल्शियमयुक्त आहाराला, दूर ठेवा ऑस्टीयोपोरोसीसला !
साधारणपणे वयाच्या साठी नंतर जेष्ठांना हाडे ठिसूळ होण्याच्या आजाराला सामोरे जावे लागते. उतार वयात हात पायांची हाडे चावणे, दुखणे व थोडासा सुध्दा पाय घसरून पडल्यास शरीरातील हाडाला फ्रक्चर किंवा हाड मोडले नाही तर नवल. जणूकाही वृध्दापकाळ व हाडांचे दुखणे हे समीकरणच होवून गेले आहे. जेष्ठ वृध्दापकाळात हाडांचा ठिसूळपणा व सांध्याची झीज या आजाराने जर्जर होवू जातात. शरीरातील हाडांच्या होणा-या असहय वेदनांनी वृध्दापकाळ नकोसा वाटू लागतो. वृध्दापकाळात शरीरात नवीन पेशी तयार होण्याची प्रकिया थंडावते. जुन्या पेशी सतत नष्ट होण्याची प्रक्रिया सुद्धा शरीरात कायम सुरूच राहते, त्यामुळे वृध्दापकाळात हाडे ठिसूळ होण्याच प्रमाण वाढत जाते . ऑस्टियोपोरोसिस होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा किवां शारीरीक हालचालीचा अभाव होय. धुम्रपान करण्या-या व्यक्तींमध्ये हाडे पोकळ होण्याची क्रिया अधिक वेगाने होते. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी आहाराची सुध्दा महत्वपूर्ण भूमिका आहे. ज्यांच्या हांडाची झीज झाली आहे त्यांनी व्हिटॅमीन डी युक्त आहाराचे सेवन करावे. त्यासोबत दुध, पनीर, हिरव्या पालेभाज्या,प्रोटीन,मिनरल्स,कॅ ल्शियम आणि व्हिटॅमिन्सचं आहारात योग्य प्रमाणात घेतल्या हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होईल.जेष्ठांनी नियमीत योगा, शारीरीक व्यायाम, हातपायांच्या हालचालींचा थोडाफार व्यायाम केल्यास सुध्दा फायदा होतो. वृध्दापकाळात जेष्ठांच्या आवडीनिवडीत होणारा बदल व त्यातून होणारा शरीरातील काही हार्मोन्स कमी, शारीरीक हालचालींची कमतरता यामुळे वृध्दापकाळात हाडांचा ठिसूळपणा अधिक जाणवू लागतो. भारतात ३ कोटीपेक्षा अधिक नागरीक ऑस्टियोपोरोसिस या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे हाडांना ठिसूळ करणे होय. स्त्रीयांमध्ये चाळीसी नंतर ऑस्टियोपोरोसिसमुळे हात-पाय दुखण्याचे प्रमाण वाढते.
हाडांच्या ठिसूळतेची लक्षणे
सतत हाय, पाय दुखणे कधीकधी हाडावर सुज येणे. हाडे ठिसूळ झाल्यामुळे हात किंवा पायाला व्यंग येणे, हाडांची झिज झाल्यामुळे वेदना होणे, सूज आल्यामुळे वजन सहन न होणे ही जरी हाडांची ठिसूळपणाची लक्षणे असली तरी काही व्यक्तींमध्ये हाडांचे फ्रक्चर होईपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत.
उतारवयात शरीरात कॅल्शियम तयार होत नाही. वर्षातून एकदा डॉक्टरांची भेट घ्यावी घेवून बी.एम.डी व कॅल्शियमची तपासणी करावी. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आहे त्यांनी शक्यतो मांडी घालू खाली बसू नये. जास्त पाय-या चढणे किंवा उतरणे टाळावे. जास्त वेळ वाकून काम करू नये. वजन कमी करावे. वजनामुळे गुढघा आणि मणक्याचे आजार वाढतात.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
जीवनातील निर्भेळ आनंदासाठी करा व्यसनांचा त्याग !
वृध्दापकाळात जेष्ठांनी आपल्या सवयीत वेळीच बदल केला नाही तर आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात. जेष्ठांनी वेळीच दृढ इच्छा शक्तीव्दारे आपल्या मनावर नियंत्रण मिळून व्यसनाचा त्याग करावा. जेष्ठांनी वृध्दापकाळात व्यसनांचा त्याग केल्यास शरीराची होणारी हानी तर टळतेच परंतु जीवनातील निर्भेळ आनंद सुध्दा घेता येतो. व्यसनापासून परावृत्त होणे कठीण आहे ही मानसीकतेत बदल केल्यास जेष्ठांनासुध्दा सहज व्यसनाचा त्याग करता येतो. बीडी, सिगारेट व दारू वृध्दापकाळात त्याग करावा. सतत बीडी, सीगारेट ओढल्याने माणसाच्या जेष्ठांच्या फुप्फुसांना मोठी हानी पोहचून एकंदरीत संपूर्ण श्वसन संस्थेच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. व्यक्तीला हलका श्वास घेण्यास सुध्दा त्रास होवू लागतो. सारखा कोरडा खोकला, ठसका लागणे, छातीत चमका निघणे, दुखणे, दमा यासारखे त्रास उदभवतात. व्यसनमुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून राज्यात विविध उपक्रम चालविले जातात परंतु जोपर्यंत मानसीकतेत बदल होत नाही तोपर्यंत व्यसनमुक्त समाज निर्मित होवू शकत नाही. आपल्या घरातील कुणी व्यसनाधीन असेल तर त्याचे समुपदेशन करणे गरजेचे ठरते. व्यसनी व्यक्तीला भावनीक आधाराची गरज असल्यामुळे त्याच्या भावनांची अवेहना होणारा नाही याची काळजी घेतल्यास सुधारणा होवू शकते.
व्यसनांचा शरीरावर होणारा परिणाम
तंबाखुजन्य पदार्थांच्या व्यसनाने कर्करोग सुध्दा होतो. तर काही व्यसनामुळे हात, पाय किंवा चेह-यावर सुज येणे, दृष्टीदोष निर्माण होवून नजर कमी होणे. ह्रदय छातीची दुखणे वाढणे, खोकला वाढणे, यकृताची आकारात वृध्दी होणे, रक्तदाब अधिक वाढणे हातपाय थरथरणे, स्मरणशक्तीचा -हास होतो.
व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची गरज
कुठली गोष्ट चांगली किंवा कुठली गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक हे मनावर बिंबविण्याचे काम समुपदेशकच चांगल्या प्रकारे करू शकतो. समुपदेशक हाव्यसनी व्यक्तीचा विश्वास संपादन करून व्यसनमुक्तीच्या प्रवासात मोलाची भूमीका पार पडतो. समुपदेशच्या योग्य मार्गदर्शनाखाली व्यक्ती व्यसनमुक्त होतो.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
अल्झायमर्स रूग्णांना गरज सहानुभूतीपूर्वक संगोपनाची !
आजारामुळे व्यक्ती जगापासून एकाकी पडतो. आप्तेष्ठांसाठी संगोपन करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेष्ठांनी भविष्यात अल्झायमर्सचा धोका टाळण्यासाठी संतुलीत आहार, नियमीत व्यायाम व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतल्यास अल्झायमर्स आजारावर जेष्ठांना सहज मात करता येते.
अल्झायमर्समुळे जेष्ठांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अल्झायमर्स
आपल्या भावविश्वाला आनंदी व समृध्द करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विचार होय. मनुष्याला जीवन जगतांना विचारांची वेळोवेळी मोलाची मदत होते. निराश, हताश झालेल्या माणसाच्या हृदयामध्ये स्फुर्तीचे, उत्साहाचे व उर्जेचे स्पुलींग प्रज्वलित करण्याचे काम विचार करीत असतात. सकारात्मक विचार माणसाला ध्येयाच्या दिशेने झेप घेतांना त्यांच्या पखांना बळ देतात. सकारात्मक विचारांनी माणूस जेव्हा काम करतो तेंव्हा अशक्य वाटणा-या गोष्ट शक्य करून दाखवितो. या विचारांच्या भरवशावर तो जग सुध्दा जिंकू शकतो. क्षणभर कल्पना करा!.. जर माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट झाली तर... आयुष्य किती निरस व व्यर्थ होईल. जगण्यात काही अर्थ राहील का? मग उरेल फक्त नाममात्र शरीराची आकृती. अल्झायमर्स आजार काही जेष्ठांना वयाच्या ६० वर्षानंतर नंतर होतो तर काहींना हा वयाच्या ८० नंतर होतो. मेंदूमध्ये बीटा अमायलॉइट पेप्टाइड नावाचा पदार्थ जमा होतो आणि अॅसिटीलकोलीन कमी झाल्यामुळे पेशींना हानी होते. अल्झायमर्स आजारात मेंदूचा हिप्पोकॅम्पस नावाचा भाग किंवा संपूर्ण मेंदू आकुंचन पावल्याने जेष्ठांच्या विचार व क्रिया विस्कळीत होतात. भारतामध्ये ६० वर्षे असणा-या २० व्यक्तीमागे १ व्यक्तीला अल्झायमर्स असतो. भारतामध्ये २०१० मध्ये ४ दशलक्ष लोक अल्झायमर्स आजाराने पीडित होते. अमेरीकेत कॅन्सर, हार्टअटॅक नंतर अल्झायमर्स ने मृत्यू पावणा-यांची संख्या अधिक आहे.
अल्झायमर्सची लक्षणे
अल्झायमर्स मुळे वृध्दापकाळात स्मरणशक्ती कमकुवत होत जाते. विचार करण्याची क्षमता दिसेंदिवस कमी झाल्यामुळे व्यक्ती गोंधळून जातो. कुटूंबातील सदस्य व मित्रांना न ओळखणे, आजारी व्यक्तीला वेळ आणि स्थळाबाबत संभ्रम निर्माण होतो. झोप कमी लागणे, वजन कमी होणे अशी अल्झायमर्स आजाराची लक्षणे आहेत.
अशी घ्यावी काळजी
अल्झायमर्स सारखा आजारापासून दूर राहण्यासाठी संतुलीत पौष्टीक आहार घ्यावा. ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे जास्त सेवन करावे. वयोमानानुसार धावणे, सायकलींग, योगा,प्राणायाम करावा. शरीरात व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले होवून मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा व प्राणवायु मिळतो. तणावमुक्त राहिल्याने मेंदूचे आरोग्य उत्तम राहाते.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



