कृषीचे विद्यार्थी म्हणजे यश हमखास- ठाणेदार संग्राम पाटील

जीवनात यश मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. यशस्वी होण्यासाठी ज्ञान,साधना कष्ट करावे लागतात. शेती विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाचे अवलोकन करतात. त्यांचा संबंध शेती मातीशी येतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी झटण्याची त्याला प्रेरणा मिळते तसेच शेती विषयाच्या पदवीपर्यंतच्या अभ्यासात अनेक विषयांचे ज्ञान सामावलेले आहे त्यामुळे कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमधून हमखास यशस्वी होतात असे विचार साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा शिबीराच्या उदघाटन प्रसंगी लव्हाळा येथे सोमवारी ता.१० रोजी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे होते. प्रमुख पाहूणे म्हणून लव्हाळा ग्रामपंचायतचे सरपंच दिनकर कंकाळ,पोलीस पाटील इंगळे,प्रगतशील शेतकरी विलास लहाने तसेच विवेकानंद आश्रमाचे अशोक थोरहाते,संतोष गोरे,आत्मानंद थोरहाते व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन दिप प्रज्वलन करून झाली. पुढे बोलतांना ठाणेदार पाटील म्हणाले की, प्रयत्न सतत प्रयत्न हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे त्यासाठी विद्याथ्र्यांनी अपयशाने डगमगता प्रयत्नशील राहायला हवे. आज राज्यात प्रशासकीय व्यवस्थेत कृषी विषयाचे विद्यार्थी अधिकारी पदावर आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जान्हवी डोसे,अभिजीत चव्हाण यांनी  तर प्रास्ताविक कु.वर्षा कापूरे हिने केलेशेळके याने आभार प्रदर्शन करून झाला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.चैतन्य देशमुख, प्रा.प्रतिक उगले, प्रा.आकाश इरतकर, प्रा.मिनाक्षी कडू, प्रा.राहूल साळवे, प्रा.दळवी, जीवन केंदळे, पत्रकार संतोष थोरहाते, दिलीप मिसाळ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध करावे - सहसचिव आत्मानंद थोरहाते
स्वामी विवेकानंद अभिप्रेत असलेला तरुण हा ऊत्साही,विवेकी चारित्र्यसंपन्न होय. महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेऊन जीवन जगा. जीवनात यश हवे असेल तर जिद्द,चिकाटी आत्मविश्वास ठेवा. विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध करावे असे यावेळी बोलतांना सांगितले. 


कथक नृत्याने मंत्रमुग्ध
यावेळी कृषि महाविद्यालयाच्या कु.नुतन घुगे, कु.कोमल बोरकर या विद्यार्थिनींनी  गणेशवंदना वर कथक नृत्य सादर केले. त्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना नृत्याने उपस्थित श्रोत्यांना  मंत्रमुग्ध केले.


संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा


मो.९९२३२०९६५८

किमया बुधवाणीचा इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर विज्ञान प्रकल्प राज्यस्तरावर !


 येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिराची विद्यार्थीनी कु.किमया कमलेश बुधवाणी हिचा इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रथम येवून राज्यस्तरावर निवड झाली. आळी,किटकांमुळे दरवर्षी शेती मालाचे ३० ते ४० टक्के नुकसान होवून उत्पादन वाढीवर परिणाम होतोकिटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी मोठ्या रासायनिक किटनाशकांचा फवारणी करतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीमुळे प्रदुषणा सोबत मानवी आरोग्यावर दुष्परीणाम दिसून येतात. वाशिम जिल्हयातील कारंजा येथे दि. ३० जानेवारी ते फेबु्रवारी पर्यत ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट हायस्कुल कारंजा येथे संपन्न झालेल्या  इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत अवॉर्डी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये कु.किमया कमलेश बुधवाणी हिच्या इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर चा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक येवून तिची राज्यस्तरावर निवड झाली. या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीमध्ये बुलडाणा जिल्हयातून ४४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी विद्यार्थ्यांचा राज्यस्तरासाठी निवड झाली. कु.किमया कमलेश बुधवाणी हि विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता वीची विद्यार्थीनी  आहे. किमयाला वडील कमेश बुधवाणी आई मधुमती बुधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रोजेक्ट बनविला होता. कु.किमया बुधवाणीच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, प्राचार्य कैलास भिसडे, उपप्राचार्य आत्मानंद थोरहाते, पर्यवेक्षक देवेंद्र मोरे, रमेश पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


बाल वैज्ञानिकाचे सर्वस्तरावर कौतुक
कु.किमया कमलेश बुधवाणी हि विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता वीची विद्यार्थीनी  आहे. किमयाला वडील कमेश बुधवाणी आई मधुमती बुधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रोजेक्ट बनविला होता. कु.किमया बुधवाणीच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वस्तरावर कौतुक होत आहे.

काय आहे इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर
शेतकरी बांधवांना अत्यंत कमी खर्चामध्ये इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर बनविता येते. यासाठी लाकडी फ्रेम,चाके,वेगळया आकाराची लोखंडी जाळी,मच्छरदाणी,बॅटरीसेल चार्चिंगसाठी चार्चर,एसी वायर इत्यादीची आवश्यकता असते. इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर किटकांपासून पिकांचे संरक्षण करता येते.

इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर मुळे शेतकरी बांधवांच्या फवारणीच्या खर्चात बचत होते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावून प्रदुषणाला आळा बसतो. इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलरचा विविध पिकांवरील कीटकांपासून बचावासाठी उपयोग करता येतो.
कु. किमया कमलेश बुधवाणी हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८







उज्वला जुनागडे सेट नेट उत्तीर्ण

जीतूगा मै यह खुद से वादा करो...जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो...तकदीर भी रूठे पर हिंमत न टुटे...मजबूत इतना अपना इरादा करो... या कवीतेतील ओळीचा प्रत्यय बुलडाणा येथील उज्वला भारतलाल जुनागडे यांच्या रूपाने येतो. लहानपणापासून हुशार व अभ्यासू असलेल्या उज्वला जुनागडे यांनी ग्रंथालय शास्त्र या विषयात सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण करीत आपले कर्तृत्व सिद्ध केले. या परीक्षांची तयारी करतांना त्यांनी कुठलीच कुचराई केली नाही. उज्वला जुनागडे यांनी दुर्दम्य इच्छा शक्ती,जिद्द  व प्रयत्नाची पराकाष्ठा करीत
ग्रंथालय शास्त्र या विषयात सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण केली.  युजीसी अंतर्गत घेणात आलेल्या नेट,सेट या परिक्षेत यश  त्यांनी यश संपादित केले. उज्वला जुनागडे या सध्या पुणे येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठात  कनिष्ठ ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. उज्वला जुनागडे यांनी संपादन केलेले यश खरोखर कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. त्यांच्या यशाचे श्रेय पती आनंद जाधव,आई वडील,सासू व सासरे यांना देतात.

संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८