हिवरा आश्रम येथे गोवर रूबेला लसीकरण मोहिम संपन्न




मिझेल रूबेला मोहिमे अंतर्गत येथील विवेकानंद विद्या मंदिर येथे आयोजित गोवर रूबेला लसीकरण मोहिम संपन्न झाली असून या गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला उत्स्फुुर्त प्रतिसाद मिळाला. विवेकानंद विद्या मंदिरातील १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी  गोवर रूबेला लस
 देण्यात आली. कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरातील १६४४ विद्यार्थी विद्यार्थीनी या गोवर रूबेला लसीकरणाचा लाभ घेतला. गोवर आणि रूबेलापासून बालकांचे रक्षण करणाèया एम आर लसीकरण १० बुध, अद्यावत ॅब्युलन्स, वैद्यकिय अधिकारी, पर्यवेक्षक,१० आरोग्य सेवक,सेविका,१५ अंगणवाडी पर्यवेक्षिका,आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने विवेकानंद विद्या मंदिरात गोवर रूबेला लसीकरण मोहिम पार पडली. विवेकानंद विद्या मंदिरात गोवर रूबेला लसीकरण मोहिमेसाठी प्राचार्य अणाजी सिरसाट,उपप्राचार्य प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक आत्माराम जामकर,अशोक गि-हे शिक्षकवृंदानी सहकार्य केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र सरपाते,नोडल अधिकारी डॉ.आकाश काठोळे,वैद्यकिय अधिकारी देवानंद होणे,डॉ.विशाल मगर,डॉ.भागवत येऊल,गोवर रूबेला मोहिमेचे संनियंत्रण कर्मचारी नायबराव लाकडे,देविदास जगताप,संजय जाधव,माया नरवाडे,शिवशंकर बळी,बबन चव्हाण,शेषराव -हाड ,आरोग्य सेविका सुचिता पांडव,सविता फलके,राजकन्या मारके,रूपाली तांबेकर,शीतल चव्हाण,सारीका निकम,स्वाती शिंदे ,प्रज्ञा गवई,बंगळे,घाडगे यांनी गोवर रूबेला लसीकरण मोहिम यशस्वी पार पाडली.

काय आहे रूबेला आजार
रूबेला हा संसर्गजन्य आजार आहे.रूबेलाचा प्रसार विषाणूमुळे होतो.त्याचा संसर्ग मुले आणि मुली दोघांना होतो. रूबेला रोगाची लक्षणे गोवरसारखीच असतात.गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळात रूबेलाचा संसर्ग होतो.

महिने ते  १५ वर्ष या वयोगटातील मुला मुलींना गोवर रूबेला आजाराची लाग जास्त प्रमाण होवू शकते. या वयोगटातील मुलांना लस टोचून घेण्यासाठी लसीकरण मोहिमेच्या ठिकाणी घेऊन यावे.

 डॉ.महेंद्र सरपाते तालुका आरोग्य अधिकारी मेहकर

रासेयो सामाजिक कार्याचा स्त्रोत - संतोष गोरे




रासेयो शिबीरातून  विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्काराचे बीज रूजतात. सामाजिक एकोप्याच्या भावनेचा विकास होतो. एकजूटीने एकोप्याच्या भावनेतून व्यक्ती मोठे काम सहज करू  शकतो हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये  निर्माण होतो. रासेयो शिबीराच्या माध्यमातून समाजसेवेची भावना वृध्दींगत होते. रासेयो सामाजिक कार्याचा स्त्रोत असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या श्रमसंस्कार शिबीरात  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना  शनिवारी ता. रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अणाजी सिरसाट तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, उपप्राचार्य प्रा.कैलास भिसडे, प्रा.गणेश चिंचोले तथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संतोष गोरे म्हणाले कीविद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्कार,राष्ट्रप्रेम,ग्रामस्वच्छता सोबतच समाजप्रबोधनाची भावना वृध्दींगत होते.रासेयो शिबीरात शिबीरार्थी विद्यार्थी विद्यार्थीनींना समाजसेवेची आवड निर्माण होते असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश्वर गाडे यांनी तर सूत्रसंचालन कु.पुनम अवचार,कु.अन्नपूर्णा थोरहाते यांनी तर आभार प्रदर्शन राहूल वरूडकर यांने मानले.

तरूणांनी सामाजिक कार्यात आनंद शोधावा
तरूण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. तरूणांच्या मनगटातील ताकदीनेच अनेक सामाजिक कार्याला गती मिळते. तरूणांनी सोशल मिडीयात अधिक वेळ घालवता सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. तरुणांनी सामाजिक कार्यातून आनंद शोधावा असे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मांनद थोरहाते यांनी रासेयोच्या शिबीरातील विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


कर्मयोगी प.पू. शुकदास महाराज हिरक महोत्सव जयंतीचे आयोजन




विवेकानंद आश्रमाचे संस्थापक लाखो दीन दुःखीतांना आरोग्य प्रदान करणारे कुशल धन्वंतरी आपले संपूर्ण जीवन मानवसेवेसाठी अर्पण केलेले कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या हिरक महोत्सव जयंती सोहळयाचे आयोजन कार्तिकवद्य त्रयोदशी बुधवार ता. ५ डिसेंबर रोजी विवेकानंद आश्रमात करण्यात आले आहे. त्यानिमित्त विवेकानंद आश्रमात विविध धार्मिक,सामाजिक व शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५ ते ६ मंगलधून व मंत्रघोष ,सकाळी ६ ते ७ ग्राम सफाई,दिंडी परिक्रमा,सकाळी ७.१५ ते ८.३० सामुदायिक प्रार्थना,अनुभूति,हभप विष्णु थुट्टे शास्त्री यांचे प्रवचन, सकाळी ८.३० पासून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या समाधि दर्शन व पूजन सोहळा, विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय वक्र्तृत्व स्पर्धेला सुरूवात होणार असून यावर्षी महात्मा गांधी विचार काळाची गरज या विषयावर वक्ते आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम,सन्मानपत्र व चषक या स्वरूपाचे बक्षिसे दिले जातील. दिवसभर आश्रमाच्या विविध शैक्षणिक संस्थानी आयोजीत विज्ञान प्रदर्शनी, क्रीडास्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्तकला प्रदर्शनी तसेच जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या स्पर्धा होणार आहेत. सकाळी ११ वाजता विवेकानंद ज्ञानपीठ येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराला सुरूवात होईल. या शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.निरूपमा डांगे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ६ ते ७ विवेकानंद आश्रमाचा गायक वृंदांचा भक्तीगीत गायन कार्यक्रम,रात्री ७ ते ७.३० सामूदायीक प्रार्थना,हभप निवृत्तीनाथ शास्त्री येवले महाराज यांचे प्रवचन,रात्री ७.३० ते ९ कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रींच्या प्रतिमेचे पूजन, उद्योजक शैलेश बाहेती यांचेकडून निराधार वृध्दांना कपडे वाटप,बक्षिस वितरण समारंभ व रात्री ९ ते १० विवेकानंद जयंती महोत्सवासाठीच्या उत्सव समितीची सभा संपन्न होईल. कार्यक्रमासाठी राज्याभरातून हजारो भाविक आश्रमात दाखल होतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाल्याचे आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगीतले.


भव्य रोगनिदान शिबीर
प.पू.शुकदास महाराजश्रींच्या जयंती निमित्त भव्य रोगनिदान शिबराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीरातील गरजूंना उपलब्धते नुसार मोफत औषधी व चष्म्याचे वितरण करण्यात येईल. सोबतच हाडातील कॅल्शियम, युरीक अॅसीड, हिमोग्लोबीन, रक्तातील शुगर इत्यादी तपासणी केल्या जातील.
प.पू. शुकदास महाराज हिरक महोत्सव जयंतीचे आयोजन
भव्य नेत्रतपासणी शिबीर आयोजन, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

 जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी
विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय वक्र्तृत्व स्पर्धेला सुरूवात होणार असून यावर्षी महात्मा गांधी विचार काळाची गरज या विषयावर वक्ते आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम,सन्मानपत्र व चषक या स्वरूपाचे बक्षिसे दिले जातील.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८