सुलेखनाच्या जागरासाठी ध्येयवेडया अक्षरयात्रीची धडपड !

श्री.प्रल्हाद कायंदे व श्री.कायंदे यांना आलेली मान्यवरांची पत्रे 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शुद्धलेखन व हस्ताक्षर लेखनाचे महत्व कमी होत आहे. अशा परिस्थिती सुलेखनाचे अस्तित्व टिकविण्याचे ध्येय उराशी बाळगून देऊळगाव राजा येथील प्रल्हाद कायंदे यांनी सकारात्मक प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सुलेखनाची गोडी लावून पाचशेहून अधिक व्यक्तींना पत्रव्यवहार केला आहे .
मनातील तरल भावना शब्दाव्दारे पत्रातून व्यक्त करण्याची मज्जा काही औरच आहे. पत्रलेखनातून भावोत्कट विचार  सहज व्यक्त करता येतात. पत्रलेखनातून विचार करण्याला चालना मिळते, शब्दकोषात भर पडते. पत्रलेखनातून वैचारिक विचारांची देवाणघेव होते. मात्र सोशल मिडीयाच्या काळात पत्रलेखनाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. मेल,व्हॉटसअ‍ॅप्स,इंस्टग्रामच्या काळात मॅसेजव्दारे थोडक्यात संदेश पाठविला जातो. यामुळे भावी पिढीचे शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर लिखाणाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या काळात सुध्दा देऊळगांव राजा येथील प्रल्हाद गणपराव कांयदे यांनी  सुंदर हस्ताक्षर व शुध्द लेखनाची चळवळ सुरू  ठेवली आहे. त्यांनी सुंदर हस्ताक्षराचा प्रसार आणि प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. प्रल्हाद कायंदे यांनी विद्यार्थ्यांच्या  मनावर सुंदर हस्ताक्षराचे महत्व बिंबविले आहे. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी तंत्र समजून ते विद्यार्थ्यांकडून हस्ताक्षर सुधारण्यासाठी सराव करून घेतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेखकांना पत्रलेखन चळवळीला गती देण्यासाठी अभिनंदन पत्र,वाढदिवस पत्र,नियुक्ती बददल अभिनंदन पत्र,कार्यगौरव पत्र आपल्या सुंदर हस्ताक्षरांनी  पत्रे पाठवितात. प्रल्हाद कायंदे यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक व्यक्तींना आपल्या सुंदर हस्ताक्षरांची पत्रे पाठवून अनेकांची मने जिंकली आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपत्री प्रतिभाताई पाटीलशरद पवार, प.पू . शुकदास महाराजप्रतापराव पवारसचिन तेंडूलकरसुनिल गावस्करभालचंद्र नेमाडेवीणा गव्हाणकरकवी प्रविण दवणेसमाजसेवक अभय बंगप्रकाश आमटे यांच्यासारख्या अनेक प्रसिध्द व्यक्तींना त्यांनी पत्र पाठविली आहेत. प्रल्हाद कायंदे हे देऊळगांव राजा तालुक्यातील आसोला जहागीर येथील राजे संभाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. प्रल्हाद कायंदे यांना लहानपणापासून सुंदर हस्ताक्षराचे वेड लागले. प्रल्हाद कायंदे यांनी सुलेखनाव्दारे व पत्र व्यवहाराच्या माध्यमातून हस्ताक्षराची मोहिम यशस्वी केली आहे. सुलेखनकार अच्युत पालवराम कस्तुरेआत्मानंद थोरहातेविनोद ठाकरेज्ञानेश्वर कवडेशिरीष चव्हाण,नीलेश बागवेप्रा.राजेंद्र हंकारे, कृष्णकांत ठाकुर यांचे त्यांना नेहमी मार्गदर्शन लाभत मिळत आहे.

सोशल मिडीयाच्या काळात पत्रलेखनाची महत्व कमी होत आहे. पत्रलेखनामुळे विचारशक्तीला मिळते त्यासोबत शब्दकोषात सुध्दा भर पडते.  भावी पिढीच्या मनावर सुंदर हस्ताक्षराचे बीज रूजविण्यासाठी सुलेखनाचे विविध उपक्रम राबवित आहे.
                      प्रल्हाद गणपत कायंदे,सुलेखनकार देऊळगांव राजा

सुलेखनाच्या प्रचारासाठी अक्षरयात्री ग्रुप
शुध्द लेखनाचा व सुंदर हस्ताक्षराचा प्रसार आणि  प्रचार मोठया प्रमाणात होण्यासाठी त्यांनी अक्षरयात्री या नावाने व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप बनविला आहे. या ग्रुपवर नियमीत सुलेखन कसे करावे यासंबधी मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांना लावली सुलेखनाची गोडी
विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी तंत्र समजून ते विद्यार्थ्यांकडून हस्ताक्षर सुधारण्यासाठी सराव करून घेतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेखकांना पत्रलेखन चळवळीला गती देण्यासाठी अभिनंदन पत्र,वाढदिवस पत्र,नियुक्ती बददल अभिनंदन पत्र,कार्यगौरव पत्र आपल्या सुंदर हस्ताक्षरांनी  पत्रे पाठवितात.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेची ज्योत पेटविली- प्राचार्य शेळके


डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भ्रष्टाचार,अनीती,अत्याचार,अन्यायाचा प्रखर विरोध केला. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असे ते मानत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अज्ञानी लोकांना बौध्दिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेची ज्योत पेटविली असे प्रतिपादन विवेकानंद कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी बोलतांना केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरूवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य प्रा.कैलास भिसडे तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,उपमुख्याध्यापक अशोक गि-हे,पर्यवेक्षक आत्माराम जामकर,देवेंद्र मोरे  तथा आदि उपस्थित   
पुढे बोलतांना प्राचार्य शेळके म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नुसते पुस्तकी पंडीत नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली. डॉ.बाबासाहेबांनी आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. मनुष्याच्या जीवनातील दुःख,दारिद्रय आणि कष्ट दूर करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला. रंजल्या गांजल्या जनतेच्या उध्दासाठी आपले आयुष्य वेचले. मानवतेची दिव्य ज्योत पेटविली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरक,उध्दारक आणि तारक शक्ती होती असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुजित दिवटे तर आभार भगवान आत्माराम जामकर यांनी मानले.  

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

महावीरांच्या अहिंसेत विश्वकल्याण- आर.बी.मालपाणी


भगवान महावीरांच्या अहिंसेच्या मार्गानेच समाजात  देशात एकता निर्माण होईल. भगवान महावीरांनी सर्वसामान्यांना जीवनाचे तत्वज्ञान शिकविले. जगा आणि जगू द्या हा विचार संपूर्ण विश्वाच्याकल्याणसाठी मोलाचा आहे. महावीरांच्या विचारात विज्ञान होते. महावीरांच्या तत्वज्ञानाची  विचाराची आज समाजाला गरज आहे. भगवान महावीरांचे तत्वज्ञान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादीत नाही तर महावीरांच्या अहिंसेतविश्वकल्याण असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचेअध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात भगवान महावीर जयंती प्रसंगी  बुधवार ता.१७ रोजी ते बोलत होते.
पुढे बोलतांना आर. बी. मालपाणी म्हणाले कीभगवान महावीरांचा उपदेशही सत्याच्या मार्गाचा पुरस्कार करतो. सत्याचे पालन करा. अहिंसेचा पुरस्कार करा. भगवान महावीरांच्या विचारांचे  तत्वज्ञानाचे अनुकरण केल्यासमानवी जीवन धन्य होईल. संपूर्ण जगाला प्रकाशीत करण्याची किमया महावीरांच्या तत्वज्ञानात आहेअहिंसा  शांती  हे महावीरांचे विचारच जगाला तारू शकतात असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,शाहिर ईश्वर मगर,पत्रकार संतोष थोरहाते,सुभाष सवडतकर आदि उपस्थित होते.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात महिला पोलिसांची आश्रमात मोफत सोय


कडाक्या-चा उष्मा सोसत लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात चोवीस तांस खडा पहारा देणा-या पोलिस कर्मचा-यांच्या निवास व भोजनाचा मोठा प्रश्न राज्यभर निर्माण झाला असताना, या कर्मचा-यांना कामाचा अतिरिक्त ताण, वेळेवर जेवण नाही, झोप नाही, राहण्याची सोय नाही ही बाब पाहाता, विशेष करून महिला पोलिसांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, विवेकानंद आश्रमाच्या वतीने सर्व सोयींनी युक्त अशा मुलींच्या वसतीगृहाच्या खोल्यांत तब्बल ५३ महिला पोलिसांची सोय करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस ५३ महिला पोलिस भागीनींची सोय विवेकानंद आश्रम अगदी मोफत करणार  आहेत  तसेच या नंतरही निवडणूक पार पडेपर्यंत प्रशासनास वेळोवेळी लागणारे सहकार्य आश्रम करणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी दिली आहे. 
बुलडाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यासाठी पोलिस रात्रंदिवस सुरक्षेसाठी तैनात आहेत. नुकतीच नागपूर व इतर भागातील तैनात पोलिसांची दैनावस्था प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणली होती. या पोलिसांना जेवण, राहण्याची सोय नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. खास करून महिला पोलिसांचे अतोनात हाल होतात. ही बाब लक्षात घेता, मेहकर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे व पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी मेहकर तालुक्यात तैनात पोलिस कर्मचाèयांची विवेकानंद आश्रमात राहण्याची सोय होईल का, अशी विचारणा विवेकानंद आश्रमाकडे केली होती. त्याला आश्रमाच्या विश्वस्त मंडळाने लगेच होकार देत केवळ राहण्याचीच नाही तर भोजनाचीही अगदी मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ५३ महिला पोलिसांची लगेचच आश्रमाच्या मुलींच्या वसतीगृहात भोजन व निवासाची सोय करण्यात आली.  
५३ महिला पोलीसांची केली निवास भोजनाची सुविधा
मेहकर तालुक्यातील मतदान केद्रावर बंदोबस्त साठी तैनात असलेल्या ५३ महिला पोलीस भगिनींची निवास भोजनाची सुविधा विवेकानंद आश्रमाने केली आहे. 
विवेकानंद आश्रमाने उचलाला मोलाचा वाटा
विवेकानंद आश्रमात आलेल्या महिला पोलीस भगिनींना वेळेवर भोजन, निवासाची सर्वसोयींनीयुक्त आरामदायक व्यवस्था व पिण्यासाठी आरओचे शुद्ध  पाणी हे अगदी मोफत पुरविण्यात आले आहे. यानिमित्ताने विवेकानंद आश्रमाने राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तोपर्यंत किमान दिडशे कर्मचारी बंदोबस्तासाठी येण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस आश्रम या कर्मचा-यांना सोयीसुविधा पुरविणार आहे. बंदोबस्ता दरम्यान एखाद्या पोलिस कर्मर्चायाचे आरोग्य बिघडल्यास त्यांना वैद्यकीय सुविधाही पुरविली जाणार आहे. 
                                                                    संतोष गोरे सचिव विवेकानंद आश्रम 


रामकथेत संकटात धैर्याने सामोरे जाण्याची ताकद - रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक


मनुष्याला नरदेह हा महत्व भाग्याने मिळालेला आहे. वाणीतील मृदता आणि आचारणातील शुध्दताने माणसाचा आध्यात्मीक विकास होतो. सदाचार हा जीवनाचा खरा अलंकार आहे. जीवनाची खरी सार्थकता ही परोपकारवृत्ती सामावली आहे. मनुष्याने धर्माचरणासोबत सदाचाराचे आचरण करावे. सदाचार जीवनाचा खरा राजमार्ग आहे. रामकथेत संकटात धैर्याने सामोरे जाण्याची ताकद असल्याचे  प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी शनिवार ता. १३ रोजी भाविकांना बोलतांना केले. जीवंत देवाचे उपासक,सव्वा कोटीहून अधिक रूग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे कर्मयोगीसंत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधी सोळया निमित्त आयोजित संगीत श्रीराम कथेच्या तृतीय पुष्पाच्याप्रसंगी ते भाविकांशी बोलत होते.

कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाची सांगता हजारो भाविकांना  महाप्रसाद वितरण करून शनिवारी ता. १३ रोजी करण्यात आली. प.पू.शुकदास महाराज यांच्या समाधी सोहळयानिमित्त तब्बल २० हजारोपक्षा जास्त भाविकांनी २५ क्विंटल गहू पुरी व वांगे भाजीचा महाप्रसादाचा लाभ घेतला. मुंबई येथील उद्योगपती तथा आश्रमाचे माजी विश्वस्त एकनाथराव दुधे,विश्वस्त तथा उदयोग प्रशांत हजारी या मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, हभप आसाराम महाराज भारती, हभप गजाननदादाशास्त्री यांनी महाप्रसादाचे पूजन केले. तीन दिवस कार्यक्रमाचे सूत्र ह.भ.प. गजाननदादा शास्त्री  महाराज यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आश्रमाचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकर्ते, हितचिंतक, सर्व  शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य , शिक्षक व कर्मचारी  तथा परिसरातील गावक-यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते.



राज्याच्या कानकोप-यातून हजारो भाविकांची उपस्थिती
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराच्या प्रसार प्रचाराचे कार्य ग्रामीण भागात केले. जीवंत देवाची पूजा हीच ईश्वर सेवा होय. आपल्या रुग्णसेवेतून सव्वा कोटीहून अधिक रुग्णांना  व्याधी मुक्त केले. कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक भक्त विवेकानंद आश्रमात गेल्या तीन दिवसापासून हजर होते.

भाविकांनी घेतला महाप्रसाद
कर्मयोगी संत . पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण करून शनिवारी ता.१३ रोजी करण्यात आली. प.पू.शुकदास महाराज यांच्या समाधी सोहळयानिमित्त तब्बल २० हजारोपक्षा जास्त भाविकांनी २५ क्विंटल गहू पुरी व वांगे भाजीचा महाप्रसादाचा लाभ घेतला.

समाधी सोहळा ठरतोय प्रमुख उत्सव
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांचा तीन दिवशीय जन्मोत्सव सोहळा संर्पूण भारतात केवळ हिवरा आश्रम येथेच साजरा केला जातो. तसा पायंडा सोडसहा दशकापूर्वी .पू.शुकदास महाराज यांनी या परिसरात पाडला आहे.  हा जन्मोत्सव सातासमुद्रापार पोहोचला असतांना आता .पू.शुकदास महाराजांचा समाधी सोहळाही व्यापक रूप धारण करीत असून यानिमित्त राज्यभरातून भाविकांची पावले विवेकानंदनगरीकडे वळू लागली आहे. त्यामुळे विवेकानंद जन्मोत्सवानंतर .पू.शुकदास महाराजांचा समाधी सोहळा विवेकानंद नगरीतील प्रमुख उत्सव ठरत आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८