जनावराच्या आजाराचे गांभीर्य ओळखावे - डॉ. हेमंत बि-हाडे


ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात पशूंचे पालन करतो. पशूधन संगोपनाचा त्याला जोडधंदासाठी उपयोग होतो. ग्रामीण भागातील शेतक-याला पशूंच्या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे तो पशु आजाराकडे दुर्लक्ष करतो. शेतक-यांची जनावरे आजारी असल्यास त्यांचा शेती कामावर सुध्दा परिणाम होतो. दुधाळ जनावरे आजारी असल्यास त्यांचा दुध उत्पादनावर परिणाम होवून दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागतो.  शेतक-यांनी जनावरांच्या आजारांचे गांभीर्य ओळखावे असे प्रतिपादन  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बि-हाडे यांनी  केले.
कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व स्नातकोत्तर पशुवैदयक व पशु विज्ञान संस्था अकोलाचे संयुक्त विद्यामाने आयोजीत भव्य मोफत पशु रोगनिदान व उपाचार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी शनिवार ता.१६ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बि-हाडे, डॉ.सी.एच.पावशे, डॉ.एम. जी. थोरात, डॉ.डे.एस. पजई, डॉ.एम व्ही. इंगवले, डॉ. एस.डी.चेपटे, वि.कृ.व्य.व्य.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे तथा आदि उपस्थित होते.
याशिबीरात डॉ.पी.डी. पाटील,डॉ. भास्कर वाघमारे,डॉ.नेहा भावे,डॉ.सुमीत वैद्य यांनी शिबीरातील जनावराची तपासणी करून गरजु जनावरावर शस्त्रक्रिया केली. या शिबीराचा लाभ परिसरातील शेतक-यांच्या जनावरांना झाला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्ञानेश्वर जाधव,प्रा.प्रतिक उगले,प्रा.हर्षल मगर,प्रा.निलेश देशमुख,प्रा.कु.अनिता अरूळकर,प्रा.निलेश शिंदे ,प्रा.दिपक निकम,डॉ.सुनिल देशमाने, दिपक मगर,शिवहारी हाडे,राज रौंदळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे,सूत्रसंचाल प्रा.जी.के.ठाकरे तर आभार प्रदर्शन प्रा.मिनाक्षी कडू यांनी मानले.

हिवरा आश्रम येथे पशू रोगनिदान शिबीर संपन्न
विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थावर आयोजित भव्य मोफत पशु रोगनिदान व उपचार शिबीरात यावेळी ६० ते ७० जनावरांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या शिबीरात जनावर माजावर न येणे,जनावरे गाभण न राहणे,जनावरांच्या वाताची शस्त्रक्रिया,शिंगाची शस्त्रक्रिया, शेपटीची शस्त्रक्रिया तसेच खरूज खाज येणे,जनावरांची केश गळणे इत्यादी वर शिबीरात उपचार करण्यात आला.

ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या  भव्य मोफत पशु रोगनिदान व उपाचार शिबीरात ६० ते ७० जनावरांची तपासणी करण्यात आली. शिबिरातील काही जनावरांवर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली.                                     डॉ.सुधाकर चांगाडे,प्राचार्य विवेकानंद कृषी व्य.व्य. महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

ग्रेट भेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेट दिली. यावेळी विवेकानंद आश्रम सेवाकार्य व शैक्षणिक परिसराला भेट दिली. यावेळी अनिवासी याचा निवास याठिकाणी असलेल्या कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजश्रींच्या समाधीचे पूजन व अभिवादन केले.

अध्यात्मदृष्टी, देशभक्ती, सेवा व समर्पण ही विवेकानंद आश्रमाची चतूःसूत्री- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

विवेकानंद आश्रम परिसराला आज भेट देतांना प.पू. शुकदास महाराजांची आठवण झाली. त्यांच्या सत्संगाची जी अल्प कृपा भाग्याने मिळाली ती आठवून  व त्यापेक्षाही त्यांच्या कार्याचा वसा पुढेही तितक्याच नेटाने, परिश्रमाने नेणारी कार्यकर्ता मंडळी सक्रीय आहे. हे पाहून समाधान वाटले. प.पू. शुकदास महाराजांच्या मानवसेवेच्या सर्व कार्याचा पाया आध्यात्मदृष्टी,देशभक्ती,सेवा व समर्पण या चतूःसूत्रीने घातला गेला आहे. असे उदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेट प्रसंगी कार्यकारी मंडळातील सदस्यांसोबत चर्चा करतांना काढले. दि. १८ सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता विवेकानंद आश्रमाच्या प्रवेशव्दारावर त्यांचे आगमन झाले. याप्रसंगी संस्थेच्या सर्व शैक्षणिक विभागांना त्यांनी भेट दिली. हरिहर तीर्थावरील भगवान बालाजी मंदिर,भगवान शिव मंदिर व गोशाळेला त्यांनी भेट दिली. आश्रमाच्या मुख्य परिसरातील प.पू.शुकदास महाराजांच्या समाधीचे त्यांनी पूजन केले. आश्रमातील सर्वांचा एकमेळ असाच राहून कार्याचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा ही माझी शुभकामना आहे. ग्रामविकासात कार्य करतांना शेतीला पोषक असलेल्या गायी, गुरांचा सांभाळ करतांना गायींच्या प्रादेशिक वाणांची निवड करावी व जोपासना करावी. गावातील जनतेमध्ये सामंजस्य आणि एकोपा निर्माण झाल्यास प्रगतीची वाट सुकर होते असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. शेतीची मशागत करतांना यंत्रसामुग्रीचा उपयोग होत असल्यामुळे पिकांना उपयोगी किटकांचा नायनाट होतो. याउलट बैलजोडीचा वापर केल्यास किटकांची जोपासना होते व जमिनीचा कस कायम राहतो. पुर्वीच्या काळी गायीचे  पालन केवळ शेण व मूत्र यांच्यापासून खत निर्मितीकरीता प्रामुख्याने होत होता. तसेच गायींच्या दुधाचा उपयोग केवळ घरगुती आहारासाठी होत असे. आज गायीच्या दुधाचे व्यापारीकरण झाल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गोधनाचा उपयोग शेतीला पूरक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग संघचालक चित्तरंजन राठी, प्रांत सहकार्यवाह राजेंद्र उमाळे, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर,प्रांत धर्मजागरण प्रमुख पुरूषोत्तम दिवटेविवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक पाध्येअशोक थोरहातेसचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंतआत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,नारायण भारस्करशशीकांत आप्पा बेंदाडे तथा आदि उपस्थित होते. 

शुकदास महाराजांच्या साधनेतून सेवाकार्य शक्य 
विवेकानंद आश्रमाचे सेवाकार्य प.पू. शुकदास महाराजांच्या सत्व व साधनेतून शक्य होवू शकले आहे. संस्थेतील ही सत्वशीलता व साधना टिकून राहणे आपली जबाबदारी असल्याचे सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी विश्वस्तांना बोलताना सांगीतले.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


विवेकानंद आश्रमाच्या वातावरणात स्पर्धा परिक्षेची गोडी लागली.- स्वाती भराड

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले कृषी महाविद्यालयामुळे कृषी शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकले. विवेकानंद आश्रम व कृषी महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा स्पर्धा परिक्षेसाठी खूप फायदा झाला. स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक पायाभूत तयारीची सुरूवात विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या फोरमपासून झाली. विवेकानंद आश्रमाच्या वातावरणात स्वप्नांचा अर्थ उमगल्याचे विचार स्वाती भराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना काढले. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी त्या बुधवार ता.१३ रोजी बोलत होत्या. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने पीएसआय पदी निवड झालेल्या व  विवेकानंद कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या देऊळगांव माळी येथील स्वाती सिताराम भराड यांचा शाल,श्रीफळ,महाराजश्रींचे गं्रथ व पुष्पगुच्छ देवून सचिव संतोष गोरे यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून पीएसआय म्हणून निवड झालेल्या स्वाती भराड तर पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,पत्रकार राजेश मगर तथा आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना भराड म्हणाल्या की, स्त्रीया आपल्यातील दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर कठीण वाटणारे यश सहज प्राप्त करता येते. कृषी शिक्षणाचा मला स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना खूप फायदा झाला. अनेक कृषी पदवीधर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विविध पदावर पोहचले आहेत. कृषी पदवीधरांनी स्पर्धा परिक्षेकडे वळल्यास हमखास यश मिळल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यासाठी येत असतात. येणा-या प्रत्येक संधी सोने करण्याची कसब अवगत केल्याशिवाय यश मिळत नाही. केवळ स्वप्त बघू नका तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा असेही त्यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले. यावेळी  वसंतराव विठोबा मगर,प्रभाकर भराड,राजेश वसंतराव मगर तथा आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रेरणा पवार तर आभार कु. जान्हवी डोसे हीने मानले

मुलींच्या वसतिगृहात सुरु होणार स्पर्धा परिक्षा कक्ष
कर्मयोगी संत प.पू.शुकदास  महाराजांनी ग्रामीण भागातील ५०० मुली निवासक्षमता असलेले वसतिगृह बांधले. विशेष बाब म्हणजे या मुलींच्या वसतिगृहाच्या भूमीपुजनांचा मान प.पू.शुकदास महाराजांनी शिक्षण घेणा-या मुलांना देवून त्यांच्या हस्ते भूमीपूजन करून घेतले. वसितगृहातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या मुलींसाठी लवकर विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्पर्धा परिक्षा कक्षाची सुरूवात करण्यात येणार असून यासाठी १ लाख किमतीची  स्पर्धा परिक्षा पुस्तकांची खरेदी विवेकानंद आश्रम करणार असल्याचे यावेळी आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना सांगीतले.


विद्यार्थिनीच्या समूहामध्ये  रमल्या स्वाती भराड
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित  विवेकानंद कृषी महाविद्यालयात विवेकानंद आश्रमाच्या वतीने सत्कार करणात आला हे माझे भाग्य आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयात कृषीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींनी महाविद्यालयीन काळापासून तयारीला सुरुवात करावी असे यावेळी पीएसआय स्वाती भराड यांनी विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना यावेळी बोलताना सांगितले. विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या समूहामध्ये स्वाती मगर रमून गेल्याचे यावेळी दिसून आले.

विवेकानंद आश्रमाच्या  वतीने स्वाती भराड यांचा सत्कार
यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने पीएसआय पदी निवड झालेल्या व  विवेकानंद कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या देऊळगांव माळी येथील स्वाती सिताराम भराड यांचा शाल,श्रीफळ,महाराजश्रींचे ग्रंथ व पुष्पगुच्छ देवून सचिव संतोष गोरे यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

महिला दिनी स्वाती भराड बनल्या पोलीस उपनिरक्षक !


हिंमत न हार कभी, हौसला रख अपनी मेहनत पर.... ये कामयाबी की शिखर भले ही थोडी ऊँची है, अगर जज्बा है पहुचने का तो मिलती है हर हिंमत पर... याचा प्रत्यय नुकताच मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील स्वाती सिताराम भराड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली यांच्या रूपाने दिसून येतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला (पी.एस.आय.) गवसणी घातली.
  स्वाती भराडा यांचे पती राम मगर हे राज्य राखीव पोलीस दलात पुणे येथे पोलीस कॉस्टेबल पदावर कार्यरत आहे. वडील सिताराम भराड व पती राम मगर यांच्या प्रेरणेमुळेच स्वाती भराड यांना स्पर्धा परिक्षा तयारीची पे्ररणा मिळाली.  कुठल्याही स्पर्धा परिक्षेच्या शिकवणी ग्रामीण भागातील महिला यशाची स्वप्ने साकार करून शकते हे स्वाती भराड यांनी ते स्वाती भराड इतर स्त्रीयांना प्रेरणा दिली आहे. महिलादिनी स्वाती भराड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. स्वाती सिताराम भराड यांनी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयातून बी.एस.सी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले. बी.एस.सी.अ‍ॅग्रीच्या व्दितीय  वर्षाला असतांनाचा त्यांचे देऊळगांव माळी गावातील राम वसंतराव मगर यांच्याशी लग्न झाले.
महिला दिनीच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याचा अत्यंत आनंद होत असून प्रत्येक स्त्रीयांना यशाची स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे. फक्त यशाचा पाठलाग करतांना मेहनतीची,जिद्दीची किंमत  मोजावी लागते. यशाची स्वप्नपूर्ण करतांना अनेक अडचणी आल्यातरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. स्पर्धा परिक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी व अपयशावर मात करण्याची जिद,मेहनत,चिकाटी आणि आत्मविश्वासाची गरज आहे.  चूल आणि मूल या ग्रामीण भागाच्या चाकोरीच्या बाहेर पडत स्वाती भराड यांनी मिळविलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
स्वाती भराड यांनी ओ.बी.सी.प्रवर्गातून  १९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. स्वाती भराड यांची महिला दिनी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. लहानपणापासूनच कुशाग्र बुध्दीमत्ता असलेल्या स्वाती भराड यांना अभ्यासाची गोडी असल्यामुळे इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळविले तर बारावीत विज्ञान शाखेत ७२ टक्के गुण मिळविले तर बीएससी अ‍ॅग्रीमध्ये ७५ टक्के गुण संपादित केले.

स्वप्नांचा पाठलाग करणे शिका !
निसर्गाने प्रत्येक स्त्रीयांना सामर्थ्यशाली बनविले आहे. आपली बुध्दीमत्ता व क्षमतांना ओळखल्यास महिला कुठल्याही क्षेत्रात सहज यशस्वी होतात. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता यशाची स्वप्ने बघा ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द,चिकाटी,मेहनत करण्याची तयारी ठेवा. आपल्या अभ्यासाचे नियोजन करा. यश तुची वाट बघतेय.                                                        स्वाती सिताराम भराड,पोलीस उपनिरीक्षक दे.माळी.


बनल्या गावातील पहिल्या पोलीस अधिकारी

देऊळगांव माळी सारख्या छोटयाशा व कुठल्याही प्रकारचे स्पर्धा परिक्षा संदर्भात मार्गदर्शन उपलब्ध नसलेल्या छोटया खेडयातून पहिल्या पोलीस अधिकारी बनण्याचा मान स्वाती भराड यांनी मिळविला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८