महिलांनी स्व सामर्थ्याची जाणिव ठेवावी - डॉ.प्रज्ञा चांगाडे



मार्च हा जातिक महिला दिन विवेकानंद आश्रमात साजरा करण्यात आला. महिलांचा सन्मान,सुरक्षा, गौरव व संधी याबाबतीत समानता असावी. महिलांना त्यांच्या हक्काची जाणिव व्हावी यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमात केले जाते. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रज्ञा चांगाडे तसेच प्रसिध्द लेखिका खडसे मॅडम ,आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते हे होते. कार्यक्रमाची सुरूवातीला सावित्रीबाई फुले,जीजामाता,शारदादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता समतोल आहार घ्यावा. विद्यार्थीनींनी बुध्दीसोबतच शारीरीक व मानसीक आरोग्या बाबत जागरूक असावे. स्त्रीला निसर्गाने निर्मितीचा मान दिला असून महिलांनी स्व सामर्थ्याची जाणिव ठेवावी असे विचार डॉ. प्रज्ञा चांगाडे  यांनी व्यक्त केले. शिक्षणाशिवाय महिलांंची प्रगती नाही. कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांसारख्या संतांनी या परिसरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी संधी उपलब्ध करून दिली असून त्यादृष्टीने या परिसरात पोषक वातावरण निर्माण केले आहे. या संस्थेतून शिक्षण घेवून दरवर्षी हजारो विद्यार्थीनी बाहेर पडत आहे. विवेकानंद आश्रम ज्ञान प्रसाराचे केंद्र बनले आहे. या परिसरात मुलींना प्रवेश दिल्यावर मुलींची सुरक्षा,गुणवत्ता व तीच्या व्यक्तीमत्वास आवश्यक असलेले सर्व घटक याठिकाणी उपलब्ध आहेत असे विचार उषा खडसे यांनी व्यक्त केले. दुर्बलतेचा भाव काढून टाकल्याशिवाय सबलतेकडे व सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू होत नाही. महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही क्षेत्र आता  बाकी राहिले नसून मुलींनी स्वतःला सिध्द करून दाखविले आहे. आज हिवरा आश्रम येथे शिकलेल्या विद्यार्थींनी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात आहे. तसेच नोकरीच्या क्षेत्रातही अग्रेसर होत आहेत. आपला विकास, प्रगती व सक्षमीकरण हीच शुकदास महाराजांना खरी आदरांजली ठरणार आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन गि-हे,सुनिल ठेंग,पत्रकार संतोष थोरहाते आदि उपस्थित होते. दिनानिमित्त भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवानी रडार तर आभार प्रदार्शन जान्हवी डोसे हिने केले.


महिला दिनी विद्यार्थिनींची भाषणे
स्त्रीशक्तीची महत्व काय आहे. आजच्या काळातील महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी यावर प्रकाश टाकणारी ओजस्वी भाषणे यावेळी विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेत शिकणा-या कु. जान्हवी डोसे, कु. मनिषा भगत, कु. दिपाली शिंदे या विद्यार्थीनींनी महिला

महिलांना मोफत औषधींचे वाटप
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रमात दरवर्षी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. महिला दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. यावेळी ५० ते ६० महिलांची तपासणी करून महिलांना यावेळी औषधींचे वाटप करण्यात आले.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

विवेकानंद आश्रम जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध - संतोष गोरे



रामकृष्ण परमहंसाच्या दिव्य सहवासाने स्वामी विवेकानंदांचे जीवन मानवतेच्या कल्याणसाठी तयार झाले. प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांना आपला गुरू मानून त्यांची शिकवण कृतीरूपाने आमलात आणली व विवेकानंद आश्रमाचे महानसेवा कार्य जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी कटीबध्द झाले. माणसातच देव पाहणा-या व त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटीबध्द असलेली धर्मादाय संस्था विवेकानंद आश्रमाच्या रूपाने सामाजिक सेवेत अग्रेसीत झाली.विवेकानंद आश्रम जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केले.
विवेकानंद आश्रमात रामकृष्ण जयंती प्रसंगी ते शुक्रवार ता.८ रोजी बोलत होते. याप्रसंगी विवेकानंद जयंती महोत्सवाचा लेखाजोखा सादर करण्यात आला. उत्सवासाठी देणगी गोळा करणाया व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ संचालक दादासाहेब मानघाले, अध्यक्ष आर.बी.मालपाणी सर, उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते तथा पदाधिकारी यांनी ठाकूर रामकृष्ण परमहंस,मॉ शारदादेवी,स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दि.२५,२६ व २७ जानेवारी २०१९ ला भव्य प्रमाणात संपन्न झालेल्या विवेकानंद जन्मोत्सवाची माहिती दिली. 

यावेळी  विवेकानंद जन्मोत्सवामध्ये संपन्न झालेल्या भव्य महाप्रदासाठी परिसरातील बांधव आपले ट्रॅक्टर्स महाप्रसाद वितरणासाठी निशुल्क घेवून येत असतात. छान सजलेल्या आकर्षक ट्रॅक्टर मालकांचा यासभेमध्ये शाल, श्रीफळ व ग्रंथ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सचिव गोरे यांनी दि.१०, ११, १२ व १३ एप्रिल २०१९ रोजी विवेकानंद आश्रमात संपन्न होणा-या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या संजीवन समाधी सोहळयाची माहिती दिली.  सभेनंतर उपस्थित सर्व विवेकानंद आश्रम परिवारातील मंडळींनी स्नेहभोजन घेतले. यावेळी विवेकानंद आश्रम संस्थेतील सर्व शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी बंधू-भगिनी व कार्यकर्ते मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

युवकांनी सामाजिक परिवर्तनात पुढाकार घ्यावा - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे


युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांच्या शिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. युवकांनी सामाजिक भानसामाजिक बांधिलकी, कर्तव्याची जाण यातुनच सामाजिकदृष्टया परिवर्तन होत असते. युवकांनी समाजामध्ये सकारात्मक योगदान देवून करावे. युवकांनी सामाजिक परिवर्तनात पुढाकार घ्यावा असे विचार जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिध्दी  येथे दि. ६ मार्च रोजी बोलतांना काढले.
येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयीन प्राध्यापकप्राध्यापिका व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहली दरम्यान राळेगण सिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून उभे केलेले मानवसेवेचे कार्य समाजोन्नतीचे आहे. विवेकानंद आश्रम हा भावी पिढीसाठी दिपस्तंभ आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या आठवणींनी ते यावेळी भावूक झाले होते. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राळेगण सिध्दी गावाचा इतिहासपूर्वीची स्थितीत्यानंतर अण्णांच्या मागदर्शनात झालेला गावाचा विकास तथा विविध विषयांवर यावेळी विद्यार्थ्यांशी दिलखुल्लास चर्चा केली.  यावेळी प्रा. मनोज मु-हेकरप्रा.जयप्रकाश सोळंकीप्रा. कु.समता कस्तुरेप्रा.पल्लवी मिटकरीप्रा.मनिषा कुडकेप्रा.गजानन गायकवाडप्रा. अमोल शेळकेप्रा. किशोर गवईप्रा. गजानन ठाकरेप्रा. योगेश काळे तथा आदि हजर होते.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहली दरम्यान राळेगण सिद्धी या गावाला भेट दिली. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

महाराजांच्या आठवणींनी भावूक
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून उभे केलेले मानवसेवेचे कार्य समाजोन्नतीचे आहे. विवेकानंद आश्रम हा भावी पिढीसाठी दिपस्तंभ आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या आठवणींनी ते यावेळी भावूक झाले होते.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



विवेकानंद विद्या मंदिरात सायकलचे वाटप


येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात मानव विकास कल्याण मिशन अंतर्गत विवेकानंद विद्या मंदिरातील इयत्ता ८  वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या २५  विद्यार्थींनींना २५ सायकलचे खा प्रतापराव जाधव व आमदार डाॅ.संजय रायमूलकर यांच्याहस्ते मंगळवार ता. ५  रोजी मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. विवेकानंद विद्या मंदिरात इयत्ता 8 वी मध्ये शिकणा-या  ब्रम्हपूरी,दुधा,रायपूर व हिवरा बु या गावातील विद्यार्थीनींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य कैलास भिसडे तर प्रमुख अतिथी म्हणून खा.प्रतापराव जाधव,आ.डाॅ.संजय रायमूलकर,माजी जि.प.सदस्य मनिष शेळके,शिवसेना तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळुकर,विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके,उपसरपंच मधुकर शेळके,माजी उपसरपंच सौ.मालता वडतकर,उपप्राचार्य अशोक गिहे,पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम जामकर,अंगणवाडीच्या पर्यवेक्षक सौ.अंजली देशमुख यांच्यासह पालक मंडळी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुचित दिवटे यांनी तर आभार प्राचार्य कैलास भिसडे यांनी केले.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद


 पैनगंगेच्या निर्मल,पवित्र व संथ  नदीपात्रात वसलेले दुधा ब्रम्हपूरी येथे श्रीक्षेत्र ओलांडेश्वराचे मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या राज्यभरातून हजारो भाविकांच्या गर्दीने श्रीक्षेत्र ओलांडेश्वर फुलून गेले होेते. हर हर महादेव... ओम नमः शिवाय... च्या भक्तीमय मंत्रोच्चार कानी पडता क्षणीच मन प्रसन्न झाल्याची अनुभूती भाविकांना घेतली. श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे मंगळवार ता.५ रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त सकाळपासूनच हजारो भाविकांनी दर्शन व पूजनासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वर फुलून गेले. भाविकांनी शिस्तबध्द पध्दतीने हजारो भाविकांनी हजेरी लावत दर्शन घेवून बारी पध्दतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.महादेवाच्या आरतीनंतर विदेही संत गजानन महाराज, श्रीश्री १००८ प. पू. अमोलानंद महाराज यांच्या हस्ते आणि खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमूलकर,जि.प.सदस्य संजय वडतकर, प्राचार्य नामदेव सास्ते, हभप ज्ञानेश्वर महाराज तायडे, ओलांडेश्वर संस्थानचे अध्यक्ष मंचकराव देशमुख,गंगाधर निकस,दुधा चे तंटामुक्ती अध्यक्ष अनंथा जवंजाळ,माजी सरपंच एकनाथ सास्ते,प्रा.विजय राठी  महाशिवरात्रीच्या भक्तीमय वातावरणात हजारो भक्तांनी यावेळी विधिवत मंत्रोच्चारात शिवाचे पूजन,दर्शन यावेळी घेतले. महाशिवरात्रीचे दिवशी सकाळ पासून भाविकांनी ओलांडेश्वर येथे दर्शनासाठी रीघ लागल्याचे दिसून येते होते. येथे भाविकांना एकाच मंदिरात बारा ज्योर्तिqलगाच्या qपडीच्या दर्शनाचा सहज लाभ घेता येतो. मंदिराच्या चहूबाजुंनी हिरवाईने नटलेला निसर्ग मनाला अधिकच आनंददायी करून जातो. पैनगंगा नदीच्या पात्रात वसलेल्यास या संस्थामध्ये भाविकांची महाशिवरात्रीला दरवर्षी प्रचंड गर्दी उसळते. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याने या तीर्थक्षेत्रावरती भाविकांची अतूट श्रध्दा आहे. श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानला अतिप्राचीन असा शिवकालीन इतिहास लाभला आहे. श्रावण मास, महाशिवरात्री, आषाढी,एकादशी, कोजागरी पौर्णिमा, अमावस्या या तिqथना येथे धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. महाशिवरात्री उत्सानिमित्ताने यावर्षी सुदा विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीने केले होते. सात दिवस संपन्न होणा-या या ज्ञानयज्ञात नामवंत किर्तनकारांची कीर्तने, व्याख्याने, प्रवचनांचा लाभ भाविकांनी यावेळी घेतला.



बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचा योग 
भाविकांना एकाच ठिकाणी बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थानने मंदिरात प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये सोमनाथ, मल्लिकार्जुन, महांकालेश्वर, ओंकारेश्वर,वैद्यनाथ,भिमाशंकर,रामेश्वर,नागेश्वर,काशी, विश्वेश्वर,त्र्यंबकेश्वर,केदाननाथ,घृष्णेश्वर येथे याप्रमाणे ज्योर्तिलिंग आहेत.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८