विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती संवर्धनासाठी शिबीराची गरज - आत्मानंद थोरहाते


बालसंस्कार शिबीरामुळे मुलांच्या सुप्तकलागुणांना चालना मिळून त्यांचा व्यक्तीमत्व विकास होतो. संस्कार शिबीर ही आजच्या काळाची गरज आहे. भावी पिढी सुसंस्कृत होण्यासाठी बालसंस्कार शिबीर महत्वाची भूमिका बजावतात. संस्कृती संवर्धनासाठी बालसंस्कार शिबीराची गरज असल्याचे विचार आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी सोमवारी (दि.४) रोजी  केले.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या सेमीनार हॉल मध्ये आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीराच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठचे प्राचार्य प्रा.मधुकर आढाव तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अशोक थोरहातेसचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,लव्हाळयाचे सरपंच दिनकर कंकाळ,हिवरा आश्रमच्या सरपंच सौ.निर्मला डाखोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली.
कुसंस्कारापासून मुलांच्या मनाचे आणि बुध्दीचे रक्षण व्हावे यासाठी सभोवतालचा परिसर संस्कारक्षम असावा लागतो. ज्या परिसरात पुण्यवंतांचा सहवास मुलांना लाभतो. तशी मुली जीवनात सद्गुणी बनतात. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज नावाचे सत्पुरूषाचा सहवास लाभलेली ही मुले निश्चित यशस्वी होतील. असे विचार पालक प्रतिनिधी म्हणून शे.ना.दळवी यांनी व्यक्त केले. या प्रकारच्या शिबीरांची सुरूवात १९६५ पासून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी  केली असून त्या काळात तरूणांकडून श्रमदानाने ग्रामविकास साध्य करता येतो हे आश्रमाने दाखवून दिले असे विचार जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष भिमराव शेळके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य अणाजी सिरसाट,कर्णबधिर विद्यालयाचे पी.वाय.शेळके,जेष्ठ शिक्षक भिमराव शेळके,मोनिका खत्री,डी.भास्कर,सज्जनसिंग राजपूत इत्यादी उपस्थित होते. यावेळी आनंद साधना या बालसंस्कार शिबीरात उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन रवि लोखंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांचे पालक,संस्थेचे कर्मचारी,गावातील प्रतिष्ठीत नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप प्रार्थनेने करण्यात आला. 

समारोप प्रसंगी शिबीरार्थी भावुक
दि.४ मे ते दि.४ जून असा ३० दिवसाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे रंजन करणा-यात्यांच्या कलागुणांना वाव देणा-यात्यांना निखळ आनंदी करून देणा-या उपक्रमांनीयुक्त अशा या आनंद साधना बालसंस्कार शिबीराचा समारोप होत असतांना विद्यार्थ्यांना भावना प्रधान करून गेले.


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

अकोल्याच्या अपूर्वा पाध्येचे एमएचसीईटी परिक्षेतील अपूर्व यश!




जीत की खातिर बस जुनून चाहिऐ...जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए...यह आसमान भी आएगा जमीन पर...बस इरोदा में जीत की गूँज चाहिए...आयुष्यात कुणालाच सहजासहजी यश मिळत नाही. यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम व ध्येयपूर्वीसाठी एकनिष्ठता तितकीच महत्वाची गोष्ट  आहे. आपल्या स्वप्नांना पत्यक्षात उतरविण्यासाठी परिश्रमाशिवाय अन्य मार्ग नाही. आयुष्याचे हेच गमक फारच थोडेजण ओळखतात आणि मग यशाच्या दिशेने त्यांची अथक वाटचाल सुरु होते. यशाच्या वाटेत येणा-या अनेक अडचणीची कुठलीही तमा न बाळगता अशा ध्येयवेड्या लोकांचा प्रवास सुरू होतो. यशाचे हेच गमक ओळखून अकोल्यातील अपूर्वा अशोक पाध्ये हिने लहानपणापासून अभियंता होण्याचे स्वप्न बघून  मनाचा निर्धार केला व त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत अपुर्वा अशोक पाध्ये हिने अभियांत्रिकी,औषध निर्माणशास्त्र व कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत २०० पैकी १८८ गुण संपादन करून मुलींमधून राज्यात दुसरे तर विदर्भातून प्रथम येण्याचा मान पटकावला. अपुर्वाच्या एमएचसीईटी परिक्षेतील यशामुळे तीचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे. अपुर्वाने एमएचसीईटी परिक्षेतील यशाचे स्वप्न सत्यात उतविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन,सातत्य,कठोर परिश्रमाची केल्यामुळेच तिला हे यश संपादन करता आले.
बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढची दिशा ठरविणारी परीक्षा म्हणून पाहिल्या जाणा-या एमएचटी सीईटी या महत्वपूर्ण पात्रता परीक्षेत विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये यांची कन्या अपुर्वा पाध्ये हिने २०० पैकी १८८ गुण मिळवत राज्यात मुलींमधून दुसरी तर विदर्भात प्रथम येण्याचा येणाचा मान पटकावला आहे.
अपुर्वाला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले तर फिजीक्स विषयात ४७ गुण तर केमिस्ट्र विषयात ४१ असे गुण मिळवून उत्तुंग भरारी मारली आहे. अपुर्वाला अन्य परिक्षांमध्ये JEE main AIR 2979, JEE paper 2 AIR 374, VITEEE AIR 340, BITSAT 300 असा स्कोअर असल्यामुळे देशातील नामवंत महाविद्यालयात तीचा प्रवेश निचित होणार आहे. अपुर्वाला अकोल्यातील आकाश एज्युकेशचे प्रा.मुकूंद पाध्ये व प्रा.आकाश पाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या यशाचे श्रेय या दोघांना व आपल्या आईवडीलांना देते. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींवर अपार श्रध्दा असलेले व विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यात सदैव तत्पर असलेल्या अशोक पाध्ये साहेबांच्या कन्येच्या एमएच सीईटी परिक्षेतील यशामुळे विवेकानंद आश्रम परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुर्वाच्या यशाने पुन्हा मुली मुलांपेक्षा कुठल्याच क्षेत्रात मागे नसल्याचे सिध्द केले आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


चिमुकल्यांनी स्केटिंग व्दारे दिला सामाजिक संदेश!

प्रतिकूल पस्थितीतून सौरभने शोधला यशाचा मार्ग !


जीतूगा मै यह खुद से वादा करो...जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो.., तकदीर भी रूठे पर हिम्मत न टुटे... मजबूत इतना अपना इरादा करो... या कवीतेप्रमाणे लहापणापासून अभियंता होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हिवरा आश्रम येथील सौरभ देव भारती याने इयत्ता बारावीच्या परिक्षेमध्ये ८४ टक्के गुण संपादन करून उत्तुंग भरारी घेत आई वडीलांचे स्वप्न साकार केले आहे.
शिक्षण ही व्यक्तीमत्व विकासातील महत्वाची पायरी आहे. शिक्षणाने वैचारिक व मानसिक विचारात आमुलाग्र बदल होतात. सौरभ भारती या विद्यार्थ्याने बाराबीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौरभ हा कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिराचा विद्यार्थी आहे. सौरभचे वडिल देव शिवराम भारती यांच्या घरची परिस्थिती अगदी जेमतेम असून ते अल्पभूधारक व सोबत दुध विक्री करून कुटुंबाची उपजीविका चालवितात. मुलाच्या उज्जव भविष्यासाठी आई वडीलांनी शेतीत कबाडकष्टात कुठलाच कसूर ठेवला नाही. आपल्या मुलाच्या शैक्षणिक जीवनात आपली परिस्थिती कुठेही आड येउ नाही म्हणून शेतात काम करून सौरभच्या वद्या,पुस्तके,कपडयांसाठी पैसे उभे केले. सौरभने सुध्दा आई वडिलांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी कुठही कसर ठेवली नाही. रात्रंदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेवून बारावीत त्याला ८४ टक्के गुण मिळाले. सौरभने कुठल्याही खाजगी शिकवणी वर्गाशिवाय हे घवघवीत यश मिळाल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे. सौरभला गणित विषयात ९३ गुण तर  मराठी विषयात ८७ गुण मिळाले आहे. अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम,चिकाटी व ध्येयप्रती एकनिष्ठता हे आपल्या यशाचे गमक असलयाचे दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. नियमित शाळेत शिकविलेला अभ्यास,लेखन,वाचनावर भर देवून सौरभने बारावीच्या परिक्षेत ८४ टक्के गुण प्राप्त केले आहे. मुळात लहानपणापसून सौरभला अभ्यासात आवड होती. सुटीचा दिवस आला की शेतात आईवडीलांना सौरभ मदत करीत असे. सौरभच्या बारावीच्या यशा बद्दल त्याच्यावरती अभिनंदना सोबतच कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम व ध्येयपूर्ती  एकनिष्ठता अत्यंत महत्वाची आहे. स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी जिद्दीने अभ्यास केला.यशाला कुठलाही शॉर्टकट नसल्याचे माहित असल्यानेच सुरूवातीपासून अभ्यासवर लक्ष केंद्रित केले.
                                सौरभ भारती हिवरा आश्रम 



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा                                                                                                                                                                

शुभ सकाळ