विवेकानंद आश्रमाची आपुलकी, स्वच्छता व लीनता मनाला भारावणारी- मोडक महाराज

 

वेकानंद  आश्रमात आल्यानंतर मनाला फार आनंद व समाधान झाले. येथे निस्वार्थ बुध्दीने कर्मयोगाचे आचरण सुरू आहे. प. पू. शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या या कर्मभूमीत आढळलेली व्यक्तींमधील लीनता, परिसराची स्वच्छता व आपुलकी मनाला भारावून टाकणारी आहे  असे उदगार स्वामी समर्थ सेवा स्ट कल्याणचे मोडक महाराज यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेट प्रसंगी शनिवारी (ता. 13) रोजी काढले. आश्रमासारख्या मानवसेवा करणाऱ्या संस्थांची देशाला गरज आहे. मानवाच्या भौतिक व आध्यात्मिक कल्याणासाठी स्वामी विवेकानंदांनी केलेल्या उपदेशाचे अनुसरण या ठिकाणी पाहायला मिळाले. कर्मयोग हा सर्वश्रेष्ठ योग असून जीवसेवेसाठी केलेल्या कर्मयोगानेच परमेश्‍वराची प्राप्ती होते व कर्मयोगीच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ उपासक असतो. संस्थेच्या सहकार्यानेच परिसरातील वातावरणात पवित्रतेचा सुगंध दरवळतो आहे. ज्या ठिकाणी सेवा त्याठिकाणी परमेश्‍वराचा वास असतो म्हणून कर्मयोग आचरणात आणल्यानेच वातावरण भक्तीमय होते. आश्रमात बालकांवर होणारे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण असून सदाचारी, स्वावलंबी व संस्कारी बालकच उद्याच्या देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारा ठरणारा आहे. देव, देश आणि धर्मासाठी हवी असलेली चारित्र्यसंपन्न पिढी पुरविण्याचे महत्वाचे कार्य विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून घडत असल्याचे समाधान आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. हरीहरतीर्थावरील नयनरम्य गार्डन, गोशाळा व भव्य मंदिरे यांना त्यांनी भेट दिली. कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारक व संस्थेच्या इतर सेवा उपक्रमांनाही त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्या आगमन प्रसंगी प्रवेशव्दारावर पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, आश्रमाचे विश्‍वस्त शशिकांत बेंदाडे, सुभाष गणगणे,पत्रकार सुनील मिसर तसेच स्वामी समर्थ सेवा स्टचे पदाधिकारी हे उपस्थित होते.

मत्सासन

सर्वांगासन

ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा ! - संतोष गोरे

शिक्षण हा एक आनंददायी सुखकारक प्रवास आहे. विद्यार्थ्यांनो केवळ स्वप्न पाहू नका,स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जिद्द,चिकाटी,परिश्रमासोबत आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ रहा. शिक्षणासोबत आपल्या आचार-विचारातून समाजासमोर आदर्श उभा करा. विद्यार्थ्यांनो ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
येथील विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित प्रथम पदवीदान सोहळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी  गुरूवारी ता.२० रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.डी.पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथील जे. बी. विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. एस. एस. झाडे तर डॉ. पी. एन. मूलकलवार,डॉ. . व्ही. देशमुख, डॉ. यु. एस. थूल, डॉ. सी. एस. खोदरे, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत तथा आदि उपस्थित होते.
 कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातून तीन वर्षाचा विज्ञान स्नातकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल या महाविद्यालयातील पदवीधारकांचा पदवीदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळयामध्ये विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातून ३५ पदवीधारक विद्यार्थी विद्यार्थीनींना पदवी प्रमाणपत्राने सन्मानीत करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थी,विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहळयाचे संयोजक प्रा. जयप्रकाश सोळंकी यांनी तर सूत्रसंचालन हे प्रा. कु. मनीषा कुडके तर आभार प्रदर्शन प्रा.कु.समता कस्तुरे यांनी केले. या पदवीदान सोहळाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज मु-हेकर, प्रा.अमोल शेळके,प्रा.सौरभ आंबेकर,प्रा. कु. मधुरा सातपुते, प्रा. योगेश काळे, प्रा. किशोर गवई, प्रा. गजानन गायकवाड, डॉ. रामेश्वर धमक, डॉ. गौतम जयगावकर प्रा.अरुण फाजगे शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी तथा आदींनी यांनी परिश्रम घेतले

संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी- प्राचार्य के.डी.पाटील

आजच्या प्रगत भारतात ब-याच आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समाजाने आरोग्याच्या बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. आरोग्य बाबतच्या माहितीच्या अभावामुळे अनेक आजारात वाढ होते. अनुवांशिकतेवर माहिती देण्यासाठी व प्राथमिक स्थळावर काळजी घेणे व जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी पडत  असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित अनुवांशिक अभियांत्रिकी विषयावर प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु. समता कस्तुरेप्रा.कु.मधुरा सातपुते यांच्या एक दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी बुधवारी ता.५ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  के.डी.पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ येथील प्रा.जी.के.मुंढे उपस्थित होते.
उदघाटन समारंभा नंतर तांत्रिक सत्रामध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी यावर बीएससी च्या विद्याथी विद्यार्थीनींना प्रा.जी.के.मुंढे यांनी माहिती व प्रात्यक्षिक केले.या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.यावेळी प्रा.डॉ.राम धमकप्रा.डॉ.गौतम जयगावकर,प्रा.गजानन गायकवाडप्रा.किशोर गवईप्रा.योगेश काळेप्रा.सौरभ आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कु.मनिषा कुडके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. कु.समता कस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कु.मधुरा सातपुते यांनी मानले.