वेकानंद आश्रमात आल्यानंतर मनाला फार आनंद व समाधान झाले. येथे निस्वार्थ बुध्दीने कर्मयोगाचे आचरण सुरू आहे. प. पू. शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या या कर्मभूमीत आढळलेली व्यक्तींमधील लीनता, परिसराची स्वच्छता व आपुलकी मनाला भारावून टाकणारी आहे असे उदगार स्वामी समर्थ सेवा स्ट कल्याणचे मोडक महाराज यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेट प्रसंगी शनिवारी (ता. 13) रोजी काढले. आश्रमासारख्या मानवसेवा करणाऱ्या संस्थांची देशाला गरज आहे. मानवाच्या भौतिक व आध्यात्मिक कल्याणासाठी स्वामी विवेकानंदांनी केलेल्या उपदेशाचे अनुसरण या ठिकाणी पाहायला मिळाले. कर्मयोग हा सर्वश्रेष्ठ योग असून जीवसेवेसाठी केलेल्या कर्मयोगानेच परमेश्वराची प्राप्ती होते व कर्मयोगीच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ उपासक असतो. संस्थेच्या सहकार्यानेच परिसरातील वातावरणात पवित्रतेचा सुगंध दरवळतो आहे. ज्या ठिकाणी सेवा त्याठिकाणी परमेश्वराचा वास असतो म्हणून कर्मयोग आचरणात आणल्यानेच वातावरण भक्तीमय होते. आश्रमात बालकांवर होणारे संस्कार अत्यंत महत्वपूर्ण असून सदाचारी, स्वावलंबी व संस्कारी बालकच उद्याच्या देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारा ठरणारा आहे. देव, देश आणि धर्मासाठी हवी असलेली चारित्र्यसंपन्न पिढी पुरविण्याचे महत्वाचे कार्य विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून घडत असल्याचे समाधान आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. हरीहरतीर्थावरील नयनरम्य गार्डन, गोशाळा व भव्य मंदिरे यांना त्यांनी भेट दिली. कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारक व संस्थेच्या इतर सेवा उपक्रमांनाही त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्या आगमन प्रसंगी प्रवेशव्दारावर पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, आश्रमाचे विश्वस्त शशिकांत बेंदाडे, सुभाष गणगणे,पत्रकार सुनील मिसर तसेच स्वामी समर्थ सेवा स्टचे पदाधिकारी हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा