भगवान महावीरांची करूणा जगाच्या कल्याणासाठी - आर. बी. मालपाणी

विवेकानंद आश्रमात भगवान महावीरांचे पूजन 
 भगवान महावीरांचे जीवन त्‍याग, सेवा, संयम आणि करूणा प्रधान आहे. ते जितेंद्रीय होते. भोगासाठी तडफडणारे इंद्रिय नियंत्रणात ठेवून त्‍यांच्यार विजय मिळविल्यामुळेच ते महावीर ठरले. त्‍यांच्या जीवनात त्‍याग आणि संयम व मानव प्राण्याबद्दलची करूणा व त्‍यासाठी त्‍यांनी स्वीकारलेला अहिंसेचा मार्ग ही काळाची गरज आहे. भगवान महावीरांची क्षमाशीलता व करूणा जगाच्या कल्याणासाठी  व जीवाच्या अस्तित्‍वासाठी महत्‍वाचे साधन बनले आहे असे उदगार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी संस्थेत संपन्न झालेल्या महावीर जयंती निमित्‍त बोलतांना व्यक्त केले. करूणा व क्षमा हे साधुच्या जीवनाचे मुख्य अंग आहे. आज जगात वर्णवर्चस्ववाद, साम्राज्यवाद व विनाशकारी युध्दाचे ढग जमा झालेले असतांना भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा मंत्र मानवाच्या भल्यासाठी तसेच त्‍यांचा जीवो और जीने दो हा संदेश मानव जातीसाठी आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले. चंगळवादी जीवनशैली व विस्तारवादी मानसीकता अन्यायवृत्‍तीला जन्म घालते. प्रेषीतांनी व संतांनी मानवाचा जन्म सत्‍कर्मासाठी, त्‍याग व संयमाच्या कसोटीचे पालन करण्यासाठी असल्याचा उपदेश केला आहे. भगवान महावीरांचे असंख्य अनुयायी त्‍यांच्या या तत्‍वांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. सुरूवातीला आश्रमात असलेल्या भगवान महावीरांच्या प्रतिमेचा परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रतिमेचे विधियुक्त पूजन करण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते व इतरांनी प्रतिमेचे पूजन केले. दिवसभर आलेल्या भाविकांना त्‍यानिमित्‍त अन्नदान करण्यात आले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा