चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी !

मेहकर तालुक्यात शाळापूर्व तयारी अभियान जोरात
दहा दिवसांनी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष संपणार आहे. महाराष्ट्र दिनी शाळांचे निकाल जाहिर करण्यात येतात. दुसरीकडे नवीन शैक्षणिक वर्षाची नांदी सुरू झाली आहे त्‍यामुळे चिमुकल्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची नांदी लागल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील झेडपीच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राखविण्यात येत आहे. पाहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येत आहे हे विशेष. दोन वर्षांपासून शैक्षणिक नियोजन कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे विस्कळीत झाले होते. पुढील शैक्षणिक वर्षात नियोजन सुव्यवस्थीत व्हावे यासह शिक्षण विभाग सूचना देत आहे. यातचे शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शाळापूर्व तयारी अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांचा मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेहकर तालुक्यातील अनेक शाळांमधून पूर्वतयारी अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सहा वर्षपूर्ण झालेलया बालकास इयत्‍ता पहिली वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षातील मुलांची यादी शाळांकडून जमा केली जात आहे. सदर यादीतील वयानुसार पहिली वर्गात प्रवेशपात्र विद्यार्थी व पालकांसाठी उपक्रम घेतले जात आहेत. पालक भेटीतून विद्यार्थ्यां प्रवेशबाबतची परिपूर्ण माहिती घेतली जात आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार सात विविध टप्प्यांवर निरिक्षण केले जात आहे. हिवरा आश्रम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १४ रोजी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी फेरी काढून गावात इयत्‍ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची वजन, उंची, दोरीवरच्या उडया घेवून अभ्यासाविषयाची शैक्षणिक साहित्‍य देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, सरीता पवार, दत्‍तात्रय दशरथे, मिनाक्षी बंगाळे, संदीप पुरी, आशा साखरे यांनी अथक प्रयत्‍न केले. सध्या शाळापूर्व तयारी अभियान घेण्यात आले. प्रवेशसाठी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी पुढील शैक्षणिक वर्षात पहिली वर्गतील प्रवेशपात्र विद्यार्थी आणि पालक मेळाव्यात जनजागृती करण्यात आली. प्रकाश दुनगू, मुख्याध्यापक जि.प.के.म.प्रा.शाळा हिवरा आश्रम असे आहे शाळापूर्व तयारीची टप्पे विद्यार्थ्यांची नोंदणी, विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास, बौध्दिक विकास, विद्यार्थ्यांचे सामाजिक व भावनिक विकास,विदयार्थ्यांचा भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकाचा सहभाग असे शाळा पर्व तयारीचे टप्पे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा