Responsive Ads Here

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

आश्रम जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य - संतोष गोरे

पर्यावरण सुरक्षा ही जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मानवाला जीवन देणारी व संगोपन करणारी वसुंधरा क्षतीग्रस्त होत आहे. तीला निरोगी ठेवणे आवश्यक झाले आहे. वाढती औद्योगीक प्रगती व विकासाच्या नावाने वाढलेला चंगळवाद, भोगवादी संस्कृती, नैसर्गिक साधनचा अतिरेकी वापर व त्‍यातून मानव प्राप्त करीत असलेला आनंद या समस्येवर आश्रमाची जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाचे मूल्य दडलेले आहे असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी बोलतांना व्यक्त केले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिनानिमित्‍त्त आयाजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना सचिव संतोष गोरे म्हणाले की, आश्रम जीवनशैली ही ज्ञान प्रदान, श्रम प्रधान व कर्मप्रधान आहे. नैसर्गिक संसाधनाचा मर्यादीत वापर व धर्माचरण हे या जीवनशैलीचे प्राण घटक आहेत. आपल्या नंतरही या पृथ्वीवर इतर जीवांना जगता यावे. त्‍यांच्यासाठी शुध्द हवा, शुध्द पाणी, शुध्द अन्न मिळावे व निसर्गचक्र शाश्वत पध्दतीने चिरकाल टिकावे ही भावना विदयार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हवी असलेली वातावरण निर्मिती या जीवनपध्दतीत सापडते. वाढते तापमान व आर्दता तसेच प्लास्टिकचा अतिरेकी वापर व पॅकिंग फूड यामुळे मानवाचे आयुष्यमान कमी होत असून जगणेही असह्य होत आहे. विद्युत, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट यांचा वाढता वापर पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आणत आहे. जैव विविधता धोक्यात आली आहे. समृध्द पर्यावरण माणसाला शाश्वत जीवन देत असते. समाज आणि पर्यावरण ही विकासाची दोन चाके आहेत त्‍यांना चालना देण्यासाठी जैव रसायनांचा व जैव स्त्रोतांचा वापर होणे गरजेचे असल्याचेही त्‍यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे होते. त्‍यांनी पृथ्वी दिनाचे घोषवाक्य पृथ्वीवर गुंतवणूक करा असे आहे. आपण मात्र विकासाच्या नावाखाली अनेक प्रकारची गुंतवणूक केली. पण या सगळयात दुर्दैवाने पृथ्वीच्या आरोग्याकडे लक्ष दिल्या गेले नाही. वसुंधरेच्या बाबतीत सगळया देशांनी व जगातील सर्व नागरीकांनी गंभीर होणे गरजेचे आहे. तरच भविष्यात मानव सुखाने पृथ्वीवर जगू शकतो असे त्‍यांनी सांगितले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके यांनी केले.व्यासपीठावर महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मधूरा सातपूते,प्रा.जयपक्राश सोळंकी होते. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा