संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
अष्टावधानी निवेदक : शिक्षक अरविंद शिंगाडे
आपल्या निसर्गदत्त निवेदन शैलीच्या जोरावर, कल्पक शब्दफुलांच्या मोगऱ्याच्या दरवळाने अनेक राज्यस्तरीय समारंभमध्ये श्रवण सौख्यच्या हिरवळी फुलवत, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून मान्यवरणसह रसिकाना वैचारिक मेजवानीची दिव्य भेट प्रदान करून,, काळजात भरजारी वस्त्र विणणारे महाराष्ट्रातील खायत्नाम अष्टावधानी निवेदक, एक संवेदनशील बहुआयामी साहित्यिक, अभ्यासू व व्यासंगी वक्ते तथा महापुरुष्याच्या जीवनाचे भाष्यकार,वऱ्हाडी भाषेतील लोकमान्य कथा कथनकार,स्तंभलेखक, हजारो विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन करणारे बुलढाणा डायटचे कौनशिलर, मुक्त पत्रकार, उत्तुंग प्रतिभासम्पन्न कवी, प्रभावी समुपदेशक, सामाजिक तीव्र भान व तळागाळातील समाजातील शोषितांच्या जगण्याचा वैशाख आपल्या लेखणीतून प्रकट करणारे द्रष्टे समाजाभिमुख लेखक, उदंड लोकप्रियता लाभलेले अग्रगण्य सूत्रसंचालक, ब्रिटिश कौन्सिल या जागतिक संस्थेचे राज्य स्तरीय तजमार्गदर्शक, आपल्या अंगी असलेल्या उपजत नेतृत्व, कर्तृत्व, व वक्तृत्व गुणाने विविधांगी क्षेत्रातील अनेक कार्यक्रमातील उत्तम व यशस्वी संयोजक म्हणून साहित्य, शिक्षण, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वाना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक मानवनिष्ठ चळवळीचे पुरस्कर्ते, विदयार्थी प्रेमात आकंठ बुडालेले उपक्रमशील उत्तुंग व दैदीप्यमान कल्पकतेचे धनी, बुलढाणा जिल्ह्यासाह अनेक सामाजिक व पर्यावरण प्रकलपांचे आधारवड, अशी कित्येक सार्थ विशेषणे ज्यांची आभूषणे आहेत, असे महाराष्टातील ख्यातानाम अष्टपैलू साहित्यिक, आदरणीय अरविंदजी शिंगाडे सर यांचा आज वाढदिवस.
आदरणीय सरांना सर्व प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
"वेडे हवे जगाला
तारून न्यावयाला
घे एक वेडं कुठले
माणूस व्हावायला "'
या ओळीचे सारथी बनत, जिद्द चिकाटी, अभ्यासू वृत्ती, व्यासंगी वृत्ती, व जिज्ञासा या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यवर्तुळत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कुठल्याही कार्यक्रमातील त्यांचे बहारदार संचलन अनेकांना भावून जाते. कोणताही कार्यक्रम म्हटला की सूत्रसंचलन महत्वाचे असते. अरविंद शिंगाडे यांचे विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमातील संचलनासोबत विविध काव्य मैफीलींचे निवेदन रसिकांची दाद मिळविणारे असते . संचलन कसे करावे ? त्यातील बारकावे समजतील अशा अत्यंत सोप्या शब्दात अरविंद शिंगाडे सर यांनी 'सुत्रसंचालनाची सुत्रे ' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांच्या या पुस्तकाला भरघोस असा प्रतिसाद सुध्दा मिळाला.
विशेष म्हणजे हे पुस्तकरूपी अनमोल धन अनेक चाहत्यांच्या घरापर्यंत मोफत घर पोहोच करत, आगळी वेगळी कृतिशील साहित्य निष्ठा त्यांनी अधोरेखित केली आहे.सोबतच त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे 'क करिअरचा ' हे ई - बुक सुद्धा प्रकाशित झाले आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी करिअर कौन्सिलिंग, मानसशास्त्रीय समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन तसेच वक्तृत्व व निवेदनाच्या कार्यशाळा घेण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो."
"बुडते हे जन, न देखवे डोळा!
म्हणोनी कळवळा येत असे!"
ह्या संत वचनाचे सारथ्य पत्करून ते मार्गस्थ होतं, अनेक विदयार्थ्यांना उत्तम करिअर ची संजीवनी बहाल करत आहेत. मोबाईल द्वारा त्यांनी घेतलेल्या अनेक करिअर ऑनलाईन कार्यशाळा प्रेरणादायी ठरल्या आहेत.
त्यांनी आकाशवाणी जळगाववरुन भाषण सुध्दा दिले आहे. त्यांनी एका शैक्षणिक लघुचित्रपटात शिक्षकाची भूमिकाही केलेली आहे . त्यांचे वऱ्हाडी बोलीतील ' ऑफ पिरियड ' हे शैक्षणिक स्तंभलेखन सर्वदूर परिचित आहे. कथाकथन, कथालेखनही ते करतात .मराठी भाषेतील विविध बोलींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्यातील उपक्रमशील शिक्षक यांनी स्थापन केलेल्या मायबोली प्रतिष्ठानअंतर्गत अनेक कवितांचा 'वऱ्हाडी ' बोलीतून अनुवाद ते करीत असतात.
महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन नेहमीच करत असतात. कानातून मनात आणि मनातून हृदयात उतरविण्याचं प्राबल्य
यांच्या दमदार प्रबोधनात जाणवते. याच कारण त्यांचं प्रबोधन फक्त स्टेज पुरतं मर्यादित नाही, करणी आणि कथनी यामध्ये एकवाक्यता आणण्याची त्यांची प्रामाणिक धडपड अनेकांना भावते.
"पुढे स्नेह पाझरे,,
मागे चलती अक्षरे,
शब्द पाठी अवतरे,
कृपा माझी """
ही दिव्य अनुभूती त्त्यांच्या लेखणी आणि वाणीमधून प्रकर्षाने जाणवते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अभिजात मराठी शिक्षक साहित्य संघ अशा साहित्यिक व विवेकी चळवळीमध्ये अरविंद शिंगाडे यांचा नेहमीच प्रामुख्याने सहभाग राहला आहे. त्यांना दोन्हीही मुली आहेत. मोठी मुलगी MBBS मध्ये शिकत असून दोघींनाही उच्चशिक्षित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसावे, तसे कर्तृत्व त्यांच्या अवन्ति मुलीने सिद्ध केले आहे.स्कॉलर शिपच्या परीक्षेत अव्व्ल स्थान पटकवात आपल्या गुणवत्तेची चुनुख सिद्ध केली आहे, तिच्या दर्जेदार कविता आणि उत्कृष्ट संवाद कौशल्याची प्रचिती, सरांचा वकृत्वाचा वारसा तिच्यात संक्रमित झाल्याची दिव्य प्रचिती येते.
समाजाच्या सर्वच स्तरात समरस होण्याची निसर्ग दत्त संवेदना लाभल्याने खूप मोठा चाहता वर्ग महाराष्ट्र भर विस्तारित आहेत. मैत्रीच्या बाबतीत सर तर कुबेर आहेत. अफाट लोकसंसंग्रह आणि प्रचंड व्यस्त अशी जीवन शैली असतांना देखील,, मित्रासाठी काहीपण,,,, हा त्याचा मूळ स्वभाव. "आपण आहोत "हे त्यांचे शब्द अनेक मित्रांना भक्कम बळ देतात.
शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रमच्या वतीने राज्यस्तरीय सेवासमर्पण पुरस्कार २०१५ सुध्दा त्यांना मिळाला आहे. अशा या अल्पावधीत सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिक्षक अरविंद शिंगाडे सर यांचा प्रेरणादायी प्रवास खरच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या विविधांगी पैलूवर प्रकाश टाकताना शब्दांच दारिद्र्य वेळोवेळी जाणवते.
आपल्या अमोघ वाणीच्या जोरावर त्यांनी गझल नवाब भीमराव दादा पंचांळे यांच्या स्वर मैफिलीचे उत्कृष्ट निवेदन करत.
"जैसे साच आणि मवाळ!
मितले आणि रसाळ!
शब्द जैसे कल्लोळ!
अमृताचे "
ही दिव्य अशी अमृतानुभूती घडवून दिली.
विद्वता प्रखर, जळजळीत, तेजस्वी असते असं आपण नेहमीच म्हणतो, परंतु विद्वता शारदेच्या चांदण्यासारखी शीतल असते, याचा अनुभव सरांच्या सहवासात तुम्हास नक्कीच मिळेल.
त्यांचं अभिष्टचिंतन करतांना त्यांचं व्यक्तिमत्व शब्दबद्ध करतांना एवढंच म्हणावं लागेल,
"पायाखाली घ्यावी दुनिया
नितीने कमवावी भाकरं.
जीवच व्हावा असा गोड की
अश्रूतूनही यावी साखर..
श्री.अनंत शेळके
शिक्षक
हिवरा आश्रम
मो.9373836853
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा