श्रीशिवस्तुति shivstuti marathi


कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥
जटा विभूति उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥
उदार मेरु पति शैलजेचा । श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधीचा गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥
कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हळाहळें कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥
स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देव चूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥
नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥
भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥
इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ ।
उमापति भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥
भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदी वाहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥
कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥
सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥
कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहीत सुवना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥
विरामकाळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥
सुखावसाने सकळ सुखाची । दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसाने धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥
अनुहात शब्द गगनी न माय । त्याने निनादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥
शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळी असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥
पीतांबरे मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥ 
जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंची तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥
निधानकुंभ भरला अभंग । पाहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥   
मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥
जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।
प्रताप सूर्यशरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकसे ।
नेई सुपंथे भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥ 
नागेशनामा सकळा जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्षरी घ्यान गुहाविहारीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥
एकांति ये रे गुरुराज स्वामीं । चैतन्यरुपीं शिवसौख्य नामीं ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥
शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको ।
योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।
काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥

॥ इति  श्रीशिवस्तुति ॥

रघुपति राघव राजा राम Raghupati Raghava Raja Ram


                                                                        रघुपति राघव राजा राम
                                              पतित पावन सीता राम
                                              सीता राम सीता राम
                                              भज प्यारे तू सीता राम
                                              रघुपति ...

                                              ईश्वर अल्लाह तेरे नाम
                                              सबको सन्मति दे भगवान
                                              रघुपति ...

                                              रात को निंदिया दिन तो काम
                                              कभी भजोगे प्रभु का नाम
                                              करते रहिये अपने काम
                                              लेते रहिये हरि का नाम
                                              रघुपति ...  




रासेयो सामाजिक उपक्रमांची प्रेरणा - प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे


रासेयो शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  मनावर सामाजिक सेवेचे संस्कार केले जातात. रासेयो शिबीरातून शिबिरार्थी विध्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, श्रमसंस्कार, मूल्याधिष्ठीत जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते. रासेयो सामाजिक उपक्रमांची प्रेरणा असल्याचे विचार विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे यांनी रासेयो शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उदघाटन प्रसंगी सोमवारी ता. १८ रोजी दत्तक ग्राम लव्हाळा येथे ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,संत गाडगे बाबा,डॉ.पंजाबराव देशमुख,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी  पुलवामा येथील आतंकवादी भ्याड हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच चोरपांग्रा येथील शहिद नितीन राठोड व मलकापूर येथील शहिद संजय राठोड यांना देखील  श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,विश्वस्त प्रा.गजानन ठाकरे,ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय काळे,तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश लहाने,शुभम लहाने,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संतोष लध्दड तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकी तिडके,अनिकेत कड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.गजानन ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश इरतकर,प्रा.प्रतिक उगले,प्रा.रवींद्र काकड,प्रा.मीनाक्षी कडू  व विवेकानंद कृषी महाविद्यालय,विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


हिवरा आश्रम येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न


विज्ञानाचा प्रसार, प्रसारासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. आरोग्य विज्ञानातून रूग्णांची सेवा करून त्यांचे जीवन समृध्द केले. ज्ञान माणसाला कसे जगायचे शिकविते. तर विज्ञान माणासाला हे जगणे  सुलभ करते. निसर्गात दडलेली सत्य, मानवाला न सापडलेली उत्तरे शोधण्याचे काम विज्ञान करते. विज्ञान सत्य शोधण्याचे काम करत असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना काढले. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस व समारोपीय कार्यक्रम प्रसंगी रविवार ता.१७ रोजी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य निवृत्ती शिंदे  हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले,उपाध्यक्ष अशोक थोरहाते, मुख्याध्यापक कैलास भिसडे,जिल्हा विज्ञान संघटनेचे अध्यक्ष पी.आर. पवार,उपाध्यक्ष पी.आर.भोयर,गजानन पाटील,जिल्हा शिक्षण पर्यवेक्षक निलेश चिंचोले, संघटनेचे सचिव रामदास गुरव,सहसचिव दिपक नागरे तथा आदि उपस्थित होते. 
यावेळी उपकरण निर्मिती प्राथमिक गटातून प्रथम किमया कमलेश बुधवाणी सेंट्रल पब्लीक स्कुल मेहकर, प्रथमेश कापसे आदर्श विद्यालय चिखली, ओम कोलते  स्कुल ऑफ स्कॉलर्स मलकापूर तर माध्यमिक गटातून निरज नाफडे सेंटअ‍ॅस इंग्लिश स्कुल खामगांव, सोम भोले एमएसएम इंग्लीश स्कुल मलकापूर तर शंतनू बुंधे शिवाजी हायस्कुल साखरखेर्डा तर शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती शिक्षक प्राथमिक गटातून प्रथम ए.ए.नालेगांवकर तर माध्यमिक गटातून प्रथम सुरेश दाते राजे छत्रपती माध्यमिक जयपूर तर लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटातून प्रथम भागवत पाटील जि.प.शाळा धोत्रा नाईक तर माध्यमिक गटातून प्रथम हेमंत खंडाळे जि.प. हायस्कुल रोहडा तर प्रयोगशाळा कर्मचारी प्रथम असलमखान फक्रद्दिन अली उर्दू हायस्कुल डोणगांव या स्पर्धेकांची राज्यस्तरासाठी निवड झाली. तर निबंध स्पर्धा प्राथमिक गटातून प्रथम कु.पुनम लंबे शिवाजी हायस्कुल लोणी, व्दितीय  कु. प्राजक्ता आखरे शिवाजी हायस्कुल नांदुरा तर तृतीय क्रमांक कार्तिक कुमठे सहकार विद्या मंदिर साखरखेर्डा,माध्यमिक गटातून प्रथम विवेक डुकरे आदर्श विद्यालय चिखली,व्दितीय क्रमांक कु.कल्याणी कांटे तर तृतीय कु.सोनिया म्हस्के देऊळगाव राजा हायस्कुल  तर प्रश्न मंजूषा  व समयस्फुर्त भाषय स्पर्धेमध्ये प्रथम गटातून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश चिंचोले  तर सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर गाडे यांनी केले. 

स्पर्धेकांची राज्यस्तरासाठी निवड
प्राथमिक गटातून प्रथम किमया कमलेश बुधवाणी सेंट्रल पब्लीक स्कुल मेहकर, प्रथमेश कापसे आदर्श विद्यालय चिखली, ओम कोलते  स्कुल ऑफ स्कॉलर्स मलकापूर तर माध्यमिक गटातून निरज नाफडे सेंटअ‍ॅस इंग्लिश स्कुल खामगांव, सोम भोले एमएसएम इंग्लीश स्कुल मलकापूर तर शंतनू बुंधे शिवाजी हायस्कुल साखरखेर्डा तर शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती शिक्षक प्राथमिक गटातून प्रथम ए.ए.नालेगांवकर तर माध्यमिक गटातून प्रथम सुरेश दाते राजे छत्रपती माध्यमिक जयपूर तर लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटातून प्रथम भागवत पाटील जि.प.शाळा धोत्रा नाईक तर माध्यमिक गटातून प्रथम हेमंत खंडाळे जि.प. हायस्कुल रोहडा तर प्रयोगशाळा कर्मचारी प्रथम असलमखान फक्रद्दिन अली उर्दू हायस्कुल डोणगांव या स्पर्धेकांची राज्यस्तरासाठी निवड झाली.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

’तुम्ही तानाजी ! मी शिवाजी !

‘तुम्ही तानाजी! मी शिवाजी!’ हे उद्गार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष प.पू.शुकदास महाराजश्रींनी दि.13/12/1988 साली तोरणवाडा, ता.चिखली येथील कार्यक्रम प्रसंगी काढले होते. म्हणजे तब्बल 30 वर्षापूर्वी! 

तोरणवाडा या गावाला संत संगतीचा इतिहास आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे गाव. या गावामध्ये राष्ट्रसंत 1954 साली आले होते. त्यावेळी त्यांनी ‘गुरूदेव सेवा मंडळाची’ स्थापना केली. 1959 साली तुकडोजी महाराजांचे शुभहस्ते मंडळाचे शीलापूजन करण्यात आले होते. या गावामध्ये गुरूदेव सेवा मंडळाचे कार्य खुप छान पध्दतीने सुरू होते. कर्मयोगी शुकदास महाराजश्रींना विवेकानंद आश्रमाची स्थापना करावयाची होती. गुरूदेव सेवा मंडळाचं कार्य कसे चालते हे पाहण्यासाठी पू. महाराजश्रींनी तोरणवाड्याला जायचे ठरवले. उंद्री पर्यंत एस.टी. बसने प्रवास केला. तेथून 3 किमी महाराजश्री पायी गेले. गावात गेल्यानंतर पहिली भेट गरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष स्व.श्रीराम पाटलांशी झाली. पाटील महाराजश्रींशी परिचित होतेच. त्यावेळी निसर्गाचा व भौगोलीक परिस्थितीचा यथार्थ अभ्यास करून जमीनीच्या आत कुठे जलस्रोत आहे हे महाराजश्री तंतोतंत सांगत असत. म्हणून महाराजश्रींची ‘पाणी सांगणारे महाराज’ अशी प्रसिध्दी होती. श्रीराम पाटलांनी मंडळाची सर्व माहिती महाराजश्रींना दिली. त्यांतर तोरणवाडा गावाशी महाराजश्रींचा ऋणानुबंध कायम घट्ट झाला. श्रीराम पाटलांच्या शेतात विहीर कोठे खोदावी हेही महाराजश्रींनी सांगीतले होते. व त्या विहीरीला आजही बऱ्यापैकी पाणी आहे!

पुढे गावातील नरेश पाटील, संजय पाटील, ह.भ.प.मुरलीधर महाराज लांडे, कै.त्र्यंबक पाटील, हरीभाऊ लांडे, विष्णु पाटील ही सर्व मंडळी महाराजश्रींच्या व्यक्तिमत्वाने व सेवा कार्याने प्रभावित होऊन आश्रमाशी जोडल्या गेले. त्यांनी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या विधायक कार्याला पुरूषोत्तम पाटीलांनी सहकार्य करून त्यांचा उत्साह वाढविला.
 छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण सेवाव्रतींच्याच शुभहस्ते व्हावं असा आग्रह सर्व ग्रमस्थांचा व या सेवाभावी मंडळींचा होता. त्यासाठी पू. महाराजश्रींना निमंत्रित करावं असं ठरलं. आठवडाभर महाराजश्रींचा रूग्णसेवेचा कार्यक्रम व्यस्त असायचा. म्हणून महाराजश्री कुठेही बाहेरगावी कार्यक्रमासाठी जात नव्हते. परंतू प्रथमच महाराजश्रींनी होकार दिला. महाराजश्रींच्या सोबत स्व. आबासाहेब थोरहाते, पंढरीनाथ शेळके, नारायणराव भारस्कर, अशोकभाऊ थोरहाते ही मंडळी तोरणवाड्यासाठी रवाना झाली. पू. महाराजश्रींचा शुभहस्ते व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरन मोठ्या थाटात व मराठमोळ्या दिमाखात करण्यात आले. 
आजूबाजूच्या सर्व खेडेगावातून आलेल्या भाविकांनी महाराजश्रींना ऐकण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी प्रास्ताविक रा.ना.पवार उपाख्य भाऊसाहेब पवार यांनी केले. व्यासपीठावर त्यावेळचे सरपंच दयासागरजी महाले, नारायणराव आव्हाळे उपस्थित होते. 
त्यांतर पू .महाराजश्रींचे खुपच मार्मिक आशिर्वचन झाले. पू. महाराजश्री म्हणाले, *“तुम्ही ‘तानाजी’! मी शिवाजी!”* सर्व उपस्थितांना आश्चर्य वाटले. उत्सुकतेने सर्व ऐकत होते. महाराजश्री पुढे म्हणाले, *“तुम्ही ताणत जा, मी शिवत जातो! समाज सध्या ताणन्याच्या भूमिकेत वावरत आहे. परंतू मी मात्र शिवण्याचं काम करत राहील. समाजातील जातीयवाद, उच्च नीचतेच्या मनोवृत्तीमुळे ताणतणाव निर्माण होतात. मतभेद होतात. हे समाजाने बंद करावं. तसेच समाजातील सज्ञान प्रतिष्ठित मंडळींनी शिवाजींच्या भूमिकेत वावरावं. तणातणाव, जातीभेद निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. गावातील तंटे गावातच मिटवावे. 
आपल्या लोकांना कोर्टकचेऱ्या परवडणाऱ्या नाहीत. भांडणे मिटली तर डोके शांत राहतील. घराकडे आणि शेतीकडे लक्ष देता येईल. कोर्टकचेऱ्यात लागणारा पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. युवकांना व्यसनांपासून दूर ठेवा. गावागावात बंधुभाव निर्माण होऊन गावं आदर्श बनावीत यासाठी प्रयत्न करा. येवढं जरी केलं तरी आपण शिवाजी महाराजांच्या संस्कारांचे व विचारांचे खरे वारसदार आहोत असे आपल्याला स्वाभिमानाने सांगता येईल.”*
किती सोप्या शब्दांमध्ये प्रबोधन! आज ह्याच विचारांना कृतीत आणण्याची गरज आहे. आजही तोरणवाडा गावातील गावकरी पू.महाराजश्रींच्या आठवणी मोठ्या उत्साहाने भरभरून सांगतांना दिसतात.


आत्मानंद थोरहाते
विवेकानंद आश्रम
मो. 9767897309
(लेखक हे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आहे.)