हिवरा आश्रम येथे मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचा जागर!


विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांच्यात निवडणूकीचे महत्व बिंबवावे,मतदानाच्या अधिकाराबाबत त्यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणा-या विवेकानंद विद्या मंदिर,विवेकानंद कृषी महाविद्यालय,विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील  विद्यार्थी विद्यार्थीनींनी मतदान जागृतीसाठी हिवरा आश्रम  गावामध्ये मतदान जागृती रॅलीचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना मतदानाचे महत्व घोषवाक्य देवून मतदानाचे आवाहन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने प्रत्येक गावातील पालक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी  यांच्या सहभागातून विविध दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यानुसार मंगळवार ता. रोजी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,मुख्याप्राचार्य कैलास भिसडे,उपमुख्याध्यापक अशोक गि-हे, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.मंगेश जकाते, प्रा.रवींद्र काकड, प्रा.पवन थोरहाते, प्रा.समाधान जाधव, प्रा.मनोज खोडके, प्रा.जयप्रकाश सोळंकी, प्रा.ज्ञानेश्वर गाडे, प्रा. विठल ताठर, गोविंद अवचार, श्याम खरात,पत्रकार संतोष थोरहाते  तथा शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने  उपस्थित होते.

मतदान जागृतीसाठी घोषवाक्य
छोडकर सारे काम! चलो करो मतदान!, लोकशाही आहे आधार कोणतेही मत घालू नका बेकार,सर्वांची आहे जबाबदारी मत देणार सर्वनर नारी,निर्भय होऊन मतदान करा देशाचा सन्मान करा,सोडा सारे काम धाम,मतदान करणे पहिले काम, चला मतदान कररू या देशाची प्रग घडवू या,मतदान करा,साक्षर जनता मतदान टाळत नाही,बोटावरील शाई लोकशाहीला पुढे नेई,मतदान कशासाठी उज्वल भविष्यासाठी,जागृत मतदार लोकशाहीचा आधार अशा विविध मतदान जागृतीसाठी घोषवाक्य विद्यार्थ्यांनी दिले.



विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेसाठी चारा दान करा - आर.बी.मालपाणी


विवेकानंद आश्रम मानव कल्याणाच्या विविध उपक्रमांव्दारे मानवाच्या उत्कर्षासाठी झटणारी संस्था आहे. या उपक्रमांसोबतच  मुक्या जीवांच्या रक्षणासाठी त्यांच्या संगोपनासाठी सुध्दा संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेव्दारा गोशाळा चालविली जात आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चारा उपलब्ध नाही. सोयाबीनचा पेरा कमी झाल्यामुळे कुटार उपलब्ध नाही. त्यामुळे गाई वासरांच्या चा-यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 
विवेकानंद आश्रमाच्या गोशाळेसाठी कळंबेश्वर येथील दानशूर शेतकरी गजानन आनंदा अवचार यांनी स्वतःच्या शेतातील एक ट्राली कुटार दान दिले. त्यांचा सत्कार करतांना विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष यांनी समाजातील दानशूरांनी गायींसाठी चारा दान करण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल व मे महिना गुरांच्या संगोपनासाठी अत्यंत जोखमीचा असून चारा व पाणी टंचाई सोबत वाढते तापमान यामुळे पशूपालकांमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहे. म्हणून अनेक शेतकरी आपल्या गायी,गुरांना विवेकानंद आश्रमाच्या गोशाळेत पाठवित आहेत. असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. विवेकानंद आश्रमात गेल्या आठवडयातच गुरांच्या तपासणीसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
पशू व मस्त्य विद्यापीठ नागपूर व  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्था अकोला यांच्या वतीने गुरांची तपासणी करण्यात आली होती. परीसरातील व गोशाळेतील असंख्य गायी, गुरांची तपासणी करण्यात आली होती. समाजातील संवेदनशील,दानशूर दात्यांनी गायी,गुरांच्या चा-यासाठी मदत केल्यास ही गोसेवा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी पुढे आर.बी. मालपाणी यांनी बोलतांना सांगीतले. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते तथा पदाधिकारी उपस्थित होते. 

अनुदानाशिवाय गोपालन   
कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांनी मुक्या जनावरांच्या संगोपनासाठी सुरू केलेल्या या गोशाळेत जवळपास १५० गाई गुरांचा संभाळ केल्या जात आहे. शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय तसेच कोणत्याही मदतीविना एवढया जनावरांचा संभाळ करणे अतिशय कठिण काम आहे.   

जन्माष्टमीला गोपालकांचा मेळावा
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांनी १९८८ मध्ये विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेची स्थापना केली. परिसरातील नागरिकांनी गो संगोपन करावे व मुलांना शुद्ध दूध  मिळावे  यासाठी भव्य प्रमाणात गो व गोपालकांचा मेळावा दरवर्षी विवेकानंद आश्रमात जन्माष्टमीला संपन्न होत असतो. 

समाजातील दानशूरांनी पुढाकार घेण्याची गरज
यावर्षी पावसाची कमी झाल्यामुळे गो संगोपन करतांना अनेक अडचणी येत आहे. गाई,गुरांसाठी चारा व्यवस्था करतांना कमालीची कसरत करावी लागत आहे. विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेत विविध प्रजातीच्या गाईंचे संगोपन केल्या जाते. विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेतील गाई,गुरांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८