ध्येयाप्राप्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवा- निवृत्ती शिंदे


केवळ स्वप्न बघू नका तर स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कठोर मेहनत करा. विद्याथ्र्यांनी अभ्यासाचे नियोजन करून प्रयत्नांची पराकाष्टा करावी. यशाचा मार्ग नेहमीच खडतर असतो परंतु जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर आपले ध्येय सहज प्राप्त करता येते. ध्येयप्राप्तीसाठी अभ्यासात सातत्य ठेवावी असे विचार विवेकानंद ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी  बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठात आयोजित नॅशनल ऑलिम्पियाड २०१८ परिक्षेतील गुणवंतांच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते मंगळवारी ता.२६ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे तर प्रमुख पाहूणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,पालक प्रतिनिधी सुधीर गोटे,डॉ.सुनिल देशमाने,भगवान अंभोरे तथा आदि उपस्थित होते.
नॅशनल ऑलिम्पियाड परिक्षा २०१८ मध्ये विवेकानंद ज्ञानपीठातील १९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . नॅशनल ऑलिम्पियाड परिक्षेमध्ये कु.स्वरा सुनिल देशमाने, कु.यशश्री अतुल गि-हे, कु.शिवानी प्रदीप मवाळ, कु.ॠतुजा दिपक कानफाडे, संघर्ष भगवान अंभोरे, कु.मंजीरी शंकर इंदोरिया, कु.भाग्यलक्ष्मी भागवत, कु.खुशी प्रमोद गाडेकर, प्रशांत गजानन पाचपुते यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले तर हरि आत्मानंद थोरहाते, कु. वृषाली लक्ष्मण देशमुख, कु.आदिती सुधीर गोटे, कु.वैष्णवी विठ्ठल qशगरे,कु.ॠतुजा रवि लोखंडे यांना सिल्हर मेडल तर कु.रोहिनी संदीप बो-हाडे, कु.गायत्री गजानन जाधव, कु.आरती सुखदेव हाडे, कु.उज्वला विनोद हिवाळे, सौरव कार्तिक कुरूडे यांना ब्रांझ मेडल प्राप्त केले. नॅशल ऑलिम्पियाड परिक्षेतील गुणवंत विद्याथ्र्यांचा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर तथा पदाधिका-यांनी अभिनंदन करून कौतुक केले.  या विद्यार्थ्यांची तयारी कु.वनिता पाथरकर, कु.पुजा राठी, कु.लिना खंडागळे, कु.गीतांजली शिंदे, मंगेश लांडे यांनी करून घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रिता सावरकर यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक विक्रांत राजपूत तर आभार सौ.राजश्री गाडेकर यांनी मानले.




ज्ञानपीठात डिजीटल क्लासरूमची सुविधा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हसत खेळत मनोरंजनासोबत शिक्षण घेता यावे यासाठी विवेकानंद ज्ञानपीठामध्ये डिजीटल क्लासरूम सुरू करण्यात आली. या डिजीटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण घेणे शक्य झाले आहे.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८



भाजीपाल्याच्या भाव वाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले


                
गेल्या दोन ते तीन वर्षापासून पावसाची सरासरी कमी झाली आहे. त्यामुळे विहीरीच्या ची जलपातळीत कमालीची घट झाली आहे. तसेच उन्हाच्या कडाक्यामुळे  बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे गृहीणींचे आर्थीक बजेट कोलमडले असून भाजीपाला खरेदीसाठी आर्थिक वजेटामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी मेहकर तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे विहीरींनी तळ गाठल्यामुळे भाजीपाला  पिकाला पाणी देतांना शेतक-याला  कमालीची कसरत करावी लागत आहे. विहीरींनी तळ गाठल्यामुळे त्याचा भाजीपाला उत्पादनावर सुध्दा परिणाम होत असून शेती उत्पादनात सुध्दा घट झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सद्या कडक उन्हाळा सुरू झाला असून त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांचे दरात सुध्दा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याचे दरात वाढ  
भेंडी ८० रूपये,मिरची ७० रूपये,गोबी ६० रूपये,टमाटे ५० रूपये,कांदे  २० रूपये,बटाटे २५ रूपये,वांगी ३० रूपये,कोथींबीर १०० रूपये,मेथी १५ रूपये,पालक १० रूपये,दोडका ५० रूपये,गवार ४० रूपये प्रति किलो,काकडी १५ रूपये,कारले ४० रूपये प्रति किलो

सद्या बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या भावात वाढ झाली आहे. भाजीपाल्यांचे दर वाढीमुळे भाजीपाला खरेदी करताना अधिक किंमत मोजावी लागत आहे. भाव वाढल्यामुळे खरेदीसाठी  गृहिनींच्या आर्थिक बजेटमध्ये वाढ झाली आहे. 
सौ. कविता कोंडेकर, गृहिणी हिवरा आश्रम

भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे जास्त किंमतीमध्ये  भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. अनेकदा भाजीपाला कमी किंमतीमध्ये सुद्धा विक्री करावी लागते. दुष्काळी परिस्थीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे त्याचा बाजार विक्रीवर थेट परिणाम होत आहे. 
विवेक नायगांवकर भाजीपाला विक्रेता हिवरा आश्रम 


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



वृक्ष संवर्धनाने होळी साजरी करावी - संतोष गोरे


निसर्ग आपल्या सतत शिकवित असतो. माणसे आपआपसात भेद निर्माण करतात. माणसे माणसात दरी निर्माण करतात. नदीचे पाणि सर्व जाती धर्मासाठी उपलब्ध असते तेथे भेद नसतो. तो संस्कार आपल्या निर्माण व्हावा. विकास करतांना निसर्गाचा -हास होतो. निसर्गाचा -हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेच आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाने होळी साजरी करावी असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना काढले.
विवेकानंद आश्रमात दरवर्षी होळी सण वृक्ष पूजन करून साजरा करण्याची परंपरा गत अनेक वर्षापासून  कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी घालून दिली आहे. वृक्षांचे संवर्धन व्हावे, निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे. वृक्ष पूजन करून त्यांना आपलेसे करावे ही  भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी दरवर्षी प्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या सणानिमित्त  बुधवारी ता.२० रोजी वृक्ष पूजनाचा कार्यक्रम विवेकानंद आश्रमात आयोजित करण्यात आला होता.
सकाळी दहा वाजता कर्मयोगी संत .पू. शुकदास महाराजश्रींच्या निवासस्थानाजवळ लागून असलेल्या बकुळ वृक्षाचे विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पूजन करण्यात आले. विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, पत्रकार समाधान म्हस्के, संतोष थोरहाते, श्रीराम मानघाले आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संतोष गोरे म्हणाले की, होळीच्या दिवशी होळी करायची असल्यास दुर्गूणांची होळी करा. कुविचारांची होळी करून सुविचारी बनावे. रंग पंचमी साजरी करतांना कृत्रिम रंगाचा वापर करता पर्यावरण पूरक सभ्यतेने रंगपंचमी साजरी करावी असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्की तिरके तर आभार प्रा.प्रतिक उगले यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राध्यापक,प्राध्यपकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प

आम्ही होळी उत्सावात कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी करणार नाही. वृक्ष संगोपन संवर्धनासाठी कटीबध्द राहू.पर्यावरण रक्षणाच्या प्रचार,प्रसारासाठी प्रयत्नशील राहू.रंगपंचमीच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या घातक रसायनयुक्त रंगांचा वापर करणार नाही. नैसर्गीक रंगांचा वापर करू असा संकल्प विद्याथ्र्यांनी केला.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८