संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
संकटनाशन गणपती स्तोत्र
Tags:
undate news 2019
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
रेशनकार्ड धारकांसमोर थम व्हेरिफीकेशनचे कोडे
संपूर्ण भारतात १ करोड रेशनकार्ड लाभार्थ्यांचे थम व्हेरिफिकेशनचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. बुलडाणा जिल्हयात ३ लाख ४५ हजार ७८२ रेशनकार्ड धारक आहेत त्यापैकी ९लाख ३४ हजार ८५० सदस्यांचे थम व्हेरिफिकेशन झाले आहे.
येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत रेशनकार्ड धारक व सदस्यांचे थम व्हेरिफिकेशनचे काम होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लिंक ओपन होत नसल्यामुळे रेशनकार्ड थंब व्हेरिफिकेशनचे काम ठप्प झाले आहे. याचा फटका जिल्हाभरातील गरीब जनतेला बसत असल्याचे दिसून येत आहे.
रेशनकार्ड थंब व्हेरीफिकेशनचे काम सद्यस्थितीत जोमात सुरू असून लहान मुले,मोलमजूरी करणारे,वृध्द यांचे थंम व्हेरिफिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी येवून त्यांचे आधार लिंक होत नाही. आधार लिंकसाठी आधार केंद्रावर वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. तर आधार लिंक साठी वेळ व पैश्यांचा अपव्यय होत असल्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे.
जिल्हयातील ज्या रेशनकार्डधारक व सदस्यांचे थंब व्हेरीफिकेशन होवू शकले नाही अशा व्यक्तींनी आपली यादी स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावी. स्वस्त धान्य दुकानदाराने ही यादी तहसील कार्यालयात जमा करावी. रेशनकार्ड थंब व्हेरीफिकेशनसाठी अजून अधिक दिवस मिळतील असा आशावाद जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे यांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.
आधार लिंकसाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागत असल्यामुळे मोलमजूरी करणा-या व्यक्तींना आधार लिंक संबंधी अधिक माहिती नसल्यामुळे वेळ व पैसे दोन्हीचा अपव्यय होत आहे. ऐकऐकीकडे २८ फेब्रुवारी ही रेशन कार्ड आधार लिंकसाठी शेवटची तारीख असल्यामुळे आधारलिंक होत नसल्यामुळे रेशन कार्ड धारकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तालुका रेशनकार्ड धारक सदस्य
बुलडाणा ३९९७१ १११४३३
चिखली ४१७५५ ११६५६४
दे.राजा १६८३० ४४११०
जळगांव जामोद २३४७२ ६४१७०
खामगांव २७५४५ ७२४६५
लोणार २०२३५ ४९७८७
मलकापूर २१६१९ ५८११२
मेहकर ३५०५६ १०१५३३
मोताळा १९५१५ ५००७०
नांदुरा २००९३ ७२९०९
संग्रामपूर २१२३७ ५४५०५
शेगांव २०६३० ५५७८२
सिंदखेड राजा २८८२४ ८३४१०
ज्या रेशनकार्डधारक व सदस्यांचे थंब व्हेरीफिकेशन होवू शकले नाही अशा व्यक्तींनी आपली यादी स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावी. स्वस्त धान्य दुकानदाराने ही यादी तहसील कार्यालयात जमा करावी.
बी.यु. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी
आधार लिंकसाठी वेळ व पैश्यांचा अपव्यय
लहान मुले,मोलमजूरी करणारे,वृध्द यांचे थंम व्हेरिफिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी येवून त्यांचे आधार लिंक होत नाही. आधार लिंकसाठी आधार केंद्रावर वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. तर आधार लिंक साठी वेळ व पैश्यांचा अपव्यय होत असल्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे.
रेशनकार्ड लाभार्थी वंचित राहण्याची भीती
रेशनकार्ड आधार लिंकसाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक आहे. असे असतांनातांत्रिक अडचणीमुळे लहान मुले, मोलमजुरी करणारे, वृद्ध यांचे थम व्हेरिफिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी येऊन त्यांचे आधार लिंक होण्यास अडचणी येत आहेत.यामुळे जिल्ह्यातील हजारो लाभार्थी थम व्हेरिफिकेशनपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे .
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
Tags:
undate news
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे आजपासून महाशिवरात्री उत्सव
हजारो
भाविकांचे अतूट श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधा
ब्रम्हपूरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने विविध
धार्मिक,आध्यात्मीक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. दि .२५ फेब्रुवारी पासून महाशिवरात्री
उत्सवास सुरूवात होत आहे. महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मांदियाळी राहणार
आहे.
यावर्षीच्या
सोहळयात विविध धार्मिक कार्यक्रम राहणार असून महाशिवरात्री निमित्त संगीत भागवत
कथेचे आयोजन दि. २५ फेब्रवारी ते ४ मार्च
या दरम्यान कथाकार भागवत उपासक प.पू.१००८ स्वामी अमोलानंद महाराज
यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत भागवत कथा संपन्न होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६
काकडा आरत हभप भाऊसाहेब महाराज वैद्य,हभप आश्रुबा महाराज
गायकवाड, हभप कुंडलिकराव महाराज ठोकरे तर ७ ते ८ शिवाचे
विधीवत मंत्रोच्चारात अभिषेक व पूजन,संध्याकाळी ६ ते ७
हरिपाठ हभप सुधाकर महाराज शिंगणे व महिला मंडळ हिवरा आश्रम तर २५ फेब्रुवारी ते ४
मार्च पर्यंत दररोज रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे .यामध्ये हभप
प पू १००८ स्वामी अमोलानंद महाराज सावत्रा, हभप गोविंद
महाराज गवळी हभप गजानन महाराज गारडे,हभप गणेश महाराज सुरुंग,हभप अनिल महाराज चेके,हभप रामायणाचार्य सतीष महाराज
डोईफोडे,हभप संजय महाराज देशमुख यांचे कीर्तन संपन्न होणार
असून ४ मार्च रोजी रात्री ८ ते १० जिजाऊ शाहीर रामदास कुरंग यांचा शाहिरी कार्यक्रम
तर १० ते १२ हभप भागवताचार्य दशरथ महाराज अंभोरे चारणकर यांचे कीर्तन होणार तर ५
मार्च रोजी सकाळी १० ते १२ हभप ज्ञानेश्वर महाराज तायडे यांचे काल्याचे कीर्तन व
दुपारी १२ ते १ आकाशवाणी कलावंत सुभाष सवडतकर ,निलेश थोरहाते,यांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम तर १ ते २ राम कोठेकर आकाशवाणी कलावंत
यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम तर शाहीर ईश्वर मगर व
संच लोकजागर यांचा कार्यक्रम तर दुपारी ३ ते ४ महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने
दररोज रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनरूपी सेवेचा लाभ
सुध्दा भाविकांना घेता येणार आहे. ५ मार्च रोजी विदेही संत गजानन महाराज यांचे
हस्ते तर खा.प्रतापराव जाधव ,आ.डॉ. संजय रायमुलकर ,जि.प. सदस्य संजय वडतकर यांच्या प्रमुख उपस्थित लाखो भाविकांना बारी पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात
येणार आहे.श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणा-या
विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहण्याचे आवाहन श्रीक्षेत्र ओलांडे श्वर संस्थान दुधा ब्रह्मपुरी च्या वतीने
करण्यात आले आहे .
संगीत
भागवत कथेचा होणार लाभ
महाशिवरात्री निमित्त संगीत भागवत कथेचे आयोजन दि. २५ फेब्रवारी ते
४ मार्च या
दरम्यान कथाकार भागवत उपासक प.पू.१००८ स्वामी अमोलानंद महाराज यांच्या सुश्राव्य
वाणीतून संगीत भागवत कथा संपन्न होणार आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती संपन्न
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज
संस्थापित विवेकानन विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत
गाडगेबाबा यांची जयंती शनिवारी ता.२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराज व संत गाडगेबाबा
यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.
डॉ. चित्रा मोरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. ज्ञानेश्वर गाडे हे उपस्थित होते.
यावेळी प्रा. ज्ञानेश्वर गाडे यांनी बोलताना सांगितले
की , संत गाडगे बाबांनी समाजाला खरी गरज असलेल्या परिवर्तनाचा
कर्मसिंद्धान्त आपल्या जगण्यातून महाराष्ट्रातील जनसामान्यापुढे अगदी सोप्या भाषेत
मांडला. दिवस भर झाडू हातात घेऊन स्वच्छतेचे कार्य करणें आणि रात्री कीर्तनाच्या
माध्यमातून लोकांच्या मनाची स्वच्छता करणें, हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग
बनला होताअसेही पुढे बोलतांना सांगितले.
यावेळी प्रा. समता कस्तुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन ठाकरे, प्रा.मनीषा कुडके,प्रा.योगेश काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी कु. अश्विनी काळे, परशुराम देशमुख, शालीकराम निकस, माधुरी गिरी यांनी संत गाडगे बाबा आणि त्यांच्या कार्य विषयी मनोगते व्यक्त केली. शेवटी मान्यवरांच्या
हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती लहाने व कु. सायली सपकाळ तर मान्यवरांचे आभार कु. मनाली सपकाळ हिने मानले.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
कांदा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव
मेहकर
तालुक्यातील अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहे. कांदा हे व्यापारी दृष्टया
सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास
केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र
अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रमध्ये अंदाजे १.०० लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली
जाते. कांदा हे पीक भाजी वर्गीय असून
व्यापारी दृष्टया या पिकाला चांगले महत्व आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या
धुक्यामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या कांदा पिकाला इजा होवून उत्पादनात घट होवू
शकते. सध्या मेहकर तालुक्यात कांदा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी
वर्ग चिंताग्रस्त झाला असून योग्य कीड
नियंत्रण केल्यास फुलकिडीपासून कांदा पिकाचे होणारे नुकसान टाळून कांदा उत्पादनात
चांगल्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
कांदा पिकावर फुलकिडीचा मोठया प्रमाणात
प्रादुर्भाव झाला आहे. कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ किटक पानातील रस
शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने
वाकडी होऊन वाळतात.
असे करा नियंत्रण
शेतकरी विशिष्ट प्रकारच्या किटक नाशकांची फवारणी
करून यशस्वी बंदोबस्त करू शकतात. फुलकिडयांनी कांद्याच्या पानामधील रस शोषण
केल्यामुळे क्लोरीफील चे प्रमाण कमी होऊन पाने पिवळट रंगाची होऊन कांदा उत्पादनात
घट दिसून येते. शेतक-यांनी फेप्रोनिल १० मिली प्रती पंप, प्रोपॅकोनोझोल
२० मिली प्रति पंप व ०-५२-३४ यांची खत पाणी मिश्र खताची फवारणी केल्यास फुलकिडीचे
नियंत्रण शक्य होते.
असा आहे जीवनक्रम
फुलकिडे हे आकाराने लहान असून पूर्ण वाढलेली कीड
सुमारे १ मिलीमिटर लांबीची असतात. हे कीड रंगाने पिवळसर तपकीर असून शरीरावर
फुलीच्या आकाराचे गडछ चट्टे असतात. मांदी पानावर पांढ-या रंगाचे ५० ते ६० अंडी
घालते. या किडीची जास्तीत जास्त संख्या फेबु्रवारी ते मार्च महिन्यात असते.
तालुका कृषी अधिकारी अनभिज्ञ
कांदा पिकावरील या आजाराबाबत तालुका कृषी अधिका-यांची प्रतिक्रिया
जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तालुक्यातील कांदा पिकावरील फुलकीडीविषयी
कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना देता आली नाही. कांदा पिकावरील असा आजार आपल्या
निदर्शनास आला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून किडीवरील नियंत्रण तर सोडा मात्र
साधी याविषयी तालुका कृषी अधिका-यांना माहितीही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



