वीज ग्राहकांचा ऑनलाईन बिल भरण्याकडे कल


आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानसाच्या जीवनात आमुलाग्र बदल झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळची बचत होते. मेहकर तालुक्यातील  ग्रामीण तसेच शहरी विज ग्राहकांची ऑनलाईन विज बील भरणा करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील ५ ते ६ हजार विज ग्राहक नेट बँकिंग  किंवा  ऑनलाईन अ‍ॅप व्दारे आपल्या वीज बिलाचा भरणा करीत आहे. ग्रामीण भागातून ऑनलाईल विज बील भरणा करण्याकडे  सकारात्मक  प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणाचे तालुका उपविभागीय अधिकारी राजेश नाईक यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. जास्तीत जास्त विज बील ग्राहकांनी ऑनलाईन बील भरणा करावा. जणेकरून वेळेची बचत होईल. डिजीटल विज ग्राहकांना विज बीलाचा भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले. ऑनलाईन विज बील भरण्यासाठी महावितरण कंपनीने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांला विज बिल जनरेट झाल्याबरोबर त्याच्या नोंदनीकृत मोबाईल क्रमांवर विज बिलाची रक्कम व भरणा दिनांकाची माहिती मिळते.

विज ग्राहकांसाठी एमएमएस सुविधा
विज ग्राहक १८००२००३४३५ या क्रमांकावर मोबाईल नोंदणीकृत करून  आपल्या मोबाईल वर मॅसेजव्दारे बिल रिडींग,बिल जनरेट,डय्यु डेट, लोडशेडींगची इत्यादीची माहिती मिळते.ग्राहकांचा मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल तर माहिती मिळणार नाही.

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मी एक वर्षापासून माझ्या विज बीलाचा ऑनलाईन भरणा करीत आहे. यामुळे वेळची बचत होते. विज बिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभी राहण्याची गरज भासत नाही. आपण घरबसल्या गुगल पे,भीम अ‍ॅप,पेटीएम व्दारे आपल्या विज बीलाचा भरणा करू शकता.
                                              राजेश रौंदळकर हिवरा आश्रम,

महावितरण विभागाकडून विज ग्राहकांना मॅसेजव्दारे बिल रिडींग,बिल जनरेट,बिल रिडींग घेण्याची दिनांक,डय्यु डेट इत्यादी माहिती क्षणार्धात मिळते. या सर्व प्रणालीमुळे कुणालाही विचारपूस करण्याची गरज भासत नाही.
राजेश नाईक, उपविभागीय अधिकारी महावितरण उपविभाग मेहकर


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

यजुर्व राईतकर तबला परीक्षेत उत्तीर्ण


कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात कार्यरत असलेले शिक्षक भगवान राईतकर यांचा मुलगा यजुर्व भगवान राईतकर तबला प्रवेशिका प्रथम या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला आहे.
आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई व्दारा घेण्यात येणाèया तबला प्रवेशिका प्रथम या परीक्षेत यजुर्व भगवान राईतकर हा विशेष योग्यतेत उतीर्ण झाला आहे.डिसेंबर २०१८ मध्ये उषा संगीत विद्यालय, लोणार या केंद्रातून यजुर्व ने तबला परीक्षा दिली होती. त्या मध्ये तो विशेष योग्यतेत उतीर्ण झाला. यजुर्व भगवान राईतकर हा तबला विषयाचे शास्त्रीय शिक्षण आपले वडील भगवान राईतकर यांच्या घेत आहे. यजुर्व याच्या यशाबद्दल उषाताई फड, प्रवीण पडघान, रमेश धायडे ,संजय गवांदे, गणेश राऊत आदिनी अभिनंदन केले.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


रासेयो शिबीरात समाजप्रबोधचा जागर !


जवान मर्द तू असा कसा रे वागतो,दारू पितो धिंगाना करतो...सोडा आता ही व्यसनाधीनता...मरी माय आली आता मरी माय आली...शिक बाबू शिक शाळा तू शिक... अशी एकापेक्षा एक अधिक सरस समाजप्रबोधनात्मक गीते सादर करून शाहिर ईश्वर मगर यांच्या लोककला जागर मंच हिवरा आश्रम यांनी  रासेयो शिबीरात मंगळवारी ता. १९ रोजी समाजप्रबोधन केले.
 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे  राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे दि. १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत मेहकर तालुक्यातील दत्तक ग्राम लव्हाळा येथे आयोजन केले आहे. या रासेयो शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर समाजसेवेचे संस्कार रूजण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी राष्ट्र जागवा जागृत व्हा तरूणांनो...ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी मला जीजाऊ,सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी...जर्द सुपारी चुना लावून घोळून केला घुटका... जय जय महाराष्ट माझा जय जय महाराष्ट्र माझा... यासारखी गीते सादर करून तरूणांईची मने जिंकली. शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी आपल्या गीतांतून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, साक्षरता यावर प्रकाश टाकणारी गीते सादर करून उपस्थितांचे समाजप्रबोधन केले.   
लोककला ही मनोरंजनाचे प्रमुख माध्यम असून त्या कलेतून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिल्यास त्याचा जनमाणसाच्या मनावर कायम ठसा उमटतो हे शाहिर ईश्वर मगर, शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी आपल्या कार्यक्रमातून दाखविले. यावेळी शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी तरूण कसा असा,तरूणाचे ध्येय काय असावे या विषयी गीत सादर करून तरूणांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला हार्मोनियम जीवन केंदळे,तबला निलेश थोरहाते,अनिल बोरकर यांनी साथसंगत  केली. यावेळी सरपंच दिनकर कंकाळ,उपसरपंच अमोल गारोळे,तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश लहाने,ग्रा.पं.सदस्य  विजय कंकाळ,भागवत गारोळे,प्रदीप लहाने,चंद्रभान लहाने,गणेश हिवाळे,मधुकर तायडे,अशोक गारोळे,रवींद्र लहाने,गणेश गारोळे,शाळा समिती अध्यक्ष संतोष गारोळे, रासेयो अधिकारी प्रा.आकाश इरतकर, प्रा.प्रतिक उगले, प्रा.रवींद्र काकड,विशाल काकड, प्रा.ज्ञानेश्वर जाधव, प्रा.जाधव मॅडम, पत्रकार संतोष थोरहाते,ज्ञानेश्वर म्हस्के,विद्यार्थी,विद्यार्थीनी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

जनजागृतीसाठी तरुणाईचा पुढाकार  
या रासेयो शिबिरात विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे  राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबिरार्थी ग्रामस्थांना ग्रामस्वच्छता,झाडे लावा झाडे जगवा, अंधश्रद्धा, हुंडाबळी, साक्षरता, स्त्रीभ्रूणहत्या याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. 


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


किडनीस्टोन आजार,लक्षणे व उपचार kidney disease


भारतात दिवसेंदिवस किडनीस्टोनच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. किडनी स्टोन अर्थात मुतखडा या आजाराची समस्या आज दिवसेंदिवस सामान्य होत चालली आहे. किडनीस्टोन या आजारामध्ये रूग्णाला खूप वेदना होतात.

काय आहे किडनी स्टोन
कॅल्शियम कॉस्फेट,कॅल्शियम ऑक्सोलेट,यूरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया फॉस्फेट यासारख्या रसायनापासून स्टोन निर्माण होतो.शारयुक्त पाण्यापासून तयार झालेले पदार्थाचे सेवन केल्यानंतर किडनीस्टोन होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. हे स्टोन किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीव्दारे मुत्राशयात येतात. हा मुतखडा लहान आकाराचा असल्यास सहज लघवीवाटे शरीराच्या बाहेर फेकला जातो. मात्र मोठया आकाराचा किडनीस्टोन मूत्रवाहिनीमध्ये अडकल्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे खूप वेदना होतात.

अशी आहे किडनीस्टोनची लक्षणे
ज्या व्यक्तीला किडनीस्टोन झाला आहे त्या व्यक्तीला लघवी करतांना जळजळ होती.वारंवार लघीवीस जाण्याची इच्छा होते.कधी कधी लघवी करतांना लघवीत रक्त येते.याशिवाय मळमळ वाटणे,ताप येणे,अंगदुःखी यासारखी लक्षणे किडनीस्टोन झालेल्या व्यक्तीला जाणवतात.
माणसाच्या शरीरातील मीठ आणि मुत्रातील खजिन पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे किडनीस्टोनचा धोका निर्माण होतो. जर आपण किडनीस्टोनच्या आजाराने ग्रस्त आहात तर मुळीच घाबरून जाऊ नका. आपल्या घरी असलेल्या घरघुती उपयांनी सुध्दा किडनीस्टोन आजारावर मात करता येते.

ओवा वापर करा
ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.

आहारात केळीचा वापर करा
जर आपण किडनीस्टोन आजाराने ग्रस्त आहात तर आपण आपल्या आहारात केळी चा वापर करा. केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. बी- ६ या जीवनसत्वामुळे किडनीस्टोनच्या  निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.
तुळस
किडनीस्टोन झालेल्या व्यक्तीसाठी तुळस रामबाण औषध आहे. तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

आहारा  द्राक्षांचा वापर करा.
ज्या व्यक्तीला किडनीस्टोन आहे त्यांनी किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी आपल्या आहारात द्राक्षांचे सेवन करावे. द्राक्षा अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.
वरील नैसर्गिक पदार्थांमुळे किडनी स्टोनच्या आजारावर आराम मिळतो.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

शिवतांडव स्तोत्र (सार्थ मराठी) shivtandav stotra marathi



जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्यलम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकारचंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌

जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो
डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा
करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा

जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम

जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा
तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा
ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे
किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे

धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर-
स्फुरद्दिगंत संतति प्रमोद मानमानसे
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि

नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे
दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे
कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति मावळे
कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे

जटा भुजंगपिंगलस्फुरत्फणामणिप्रभा-
कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे
मदांध सिंधुरस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि

जटाभुजंग तद्मणी-प्रदीप्त कांति ह्या दिशा
कदंब-पुष्प-पीत-दीप्त, शोभती झळाळत्या
दिशाधरांग-चीर ज्या विभूषवी दिगंबरा
प्रती जडो मती, घडो मनोविनोद, तारका

सहस्र लोचन प्रभृत्य शेषलेखशेखर-
प्रसून धूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः
भुजंगराज मालया निबद्धजाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोरबंधुशेखरः

सहस्रलोचनादि देव, पादस्पर्शता सदा
तयांस भूषवित त्या, फुलांनि भूषती पदे
भुजंगराज हार हो, नि बांधतो जटाहि तो
प्रसन्न भालचंद्र तो, चिरायु संपदा करो


ललाटचत्वरज्वलद्धनंजयस्फुलिंगभा-
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्‌
सुधामयुखलेखया विराजमानशेखरं
महा कपालि संपदे शिरोजटालमस्तु नः

कपाल-नेत्र-पावका क्षणात मोकलूनिया
वधी अनंग, हारवी सुरेंद्र आदि देवता
शिरास भूषवीतसे सुधांशुचंद्र ज्याचिया
कपालिना, जटाधरा, दिगंत संपदा करा

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल-
द्धनंजयाहुतीकृत प्रचंडपंचसायके
धराधरेंद्र नंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचनेरतिर्मम

अनंग ध्वंसिला जिने, त्रिनेत्रज्योत तीच ती
नगाधिराज-नंदिनी-स्तनाग्र भाग वेधती,
चित्र रेखते तिथे जयाचि दृष्टी योजुनी
त्रिलोचनाप्रती मना, जिवास वाढु दे रती


नवीन मेघ मंडली निरुद्धदुर्धरस्फुर-
त्कुहु निशीथिनीतमः प्रबंधबद्धकंधरः
निलिम्पनिर्झरि धरस्तनोतु कृत्ति सिंधुरः
कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः

नव्या घनांनि दाटली, निशावसेपरी जशी
जटानिबद्धजान्हवीधरास कंठ भूषवी
गजेंद्र-चीर-शोभिता शशीकला विभूषवी
जगास धारका कृपा करून ’श्री’स वाढवी

प्रफुल्ल नील पंकज प्रपंचकालिमप्रभा-
वलंबि कंठकंधरारुचि प्रबंधकंधरम्‌
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे

प्रफुल्ल नील पंकजापरी प्रदिप्त कंठ ज्या
जये त्रिपूर ध्वंसिला, तसाच कामदेव वा
भवास तारणार आणि याग ध्वंसत्या हरा
भजेन शंकरास मी, गजांतका यमांतका


अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-
रसप्रवाहमाधुरी विजृंभणा मधुव्रतम्‌
स्मरांतकं पुरातकं भवांतकं मखांतकं
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे

कलाबहारमाधुरीस भृंग जो असे शिवा
अनंगहंत आणखी त्रिपूर, याग ध्वंसका
भवास तारका हरा, सदा शुभंकरी शिवा,
भजेन शंकरास मी, गजांतका यमांतका


जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमस्फुर-
द्धगद्धगद्वि निर्गमत्कराल भाल हव्यवाट्-
धिमिद्धिमिद्धिमिनन्मृदंगतुंगमंगल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः

गतीस्थ सर्पहार जे, विषाग्नि सोडती असे
फणा उभा करून ते, कपालि ओतती विषे
मृदंगनाद गाजतो, ध्वनी मनास मोहतो
पवित्र तांडवी शिवा, विराजतो नि शोभतो

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो-
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समप्रवृत्तीकः कदा सदाशिवं भजाम्यम्‌

शिळा नि शेज, मोतियांचि माळ, सर्प वा असो
जवाहिरे नि मृत्तिका, तृणे नि कोमलाक्षि वा
असोत दोस्त वा न वा, करून भेद नाहिसे
कधी भजेन मी मना, सदाशिवा सदा सुखे


कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌
विलोललोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌

कधी शिरी धरून हात, शंकरा स्तवेन मी
वसेन जान्हवीतिरी विमुक्त होउनी गती
सुनेत्रचंचलेचिया कपालिचा ’शिवाय’ तो
कधी चिरायु सौख्य पावण्या सदा स्मरेन मी


निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्मधूष्णिकामनोहरः
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं
परिश्रय परं पदं तदंगजत्विषांचयः

पदांस देवता जशा विनम्र होत त्यामुळे
विभूषित्या, तयांशिरी समर्पिता फुलांमुळे
मनोज्ञ भासती पदे, मनोहराकृतींमुळे
प्रसन्न ती करो अम्हा, सदाच सौरभामुळे

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना
विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌

विशाल सागरातल्या शुभेच्छु पावकापरी
महाष्टसिद्धिकामना करीत सर्व सुंदरी
विवाहकालि शंकरा व पार्वतीस चिंतिती
जगास जिंकता ठरो, ’शिवाय’ मंत्र संगरी


इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं
पठन्स्मरन्‌ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम्‌
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिना तु शंकरस्य चिंतनम्‌

सदा करून मोकळ्या स्वरात श्लोक पाठ हे
म्हणून वा श्रवून हे, विशुद्धता सदा मिळे
हरीप्रती, गुरूप्रती, रती, न वेगळी गती
अशा जिवास मोहत्या, शिवाप्रती सदा रुची

पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं
यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः

पूजासमाप्तीस संध्येस जो हे
म्हणेल लंकेश-रचित स्तोत्र
तयास रथ-हत्ती-अश्वासहित
शंभू प्रसन्नलक्ष्मी देई खचित

॥ इति श्री. रावणकृतं शिव-तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥