विवेकानंद आश्रमात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
थोर समाज सुधारक तसचे वर्णभेद,जातीभेद या विषमतावादी विचारांना मानवी जीवनातून हद्दपार करण्यासाठी चळवळ उभी करणारे महात्मा बसवेश्वर. त्यांची जयंती विवेकानंद आश्रमात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुप्रसिध्द गायक सज्जनसिंह राजपूत, वादक निलेश थोरहाते यांच्या भक्तीगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्राचार्य आर डी पवार आपल्या भाषणात म्हणाले, महात्मा बसवेश्वरांच्या विचारात लोकशाही मूल्यांची तत्वे होती. त्यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीयांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग, जातीप्रथा निर्मूलन, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन या समाजाला एकसंघ ठेवणाऱ्या मानवतावादी विचारांचा प्रसार केला. बसवेश्वरांनी अनुभव मंडप या संकल्पनेतून आधुनिक राज्य व्यवस्थेचे प्रारूप निर्माण केले. कर्मप्रधान जीवनशैली स्वीकारून परमेश्वर प्राप्तीचा संदेश दिला. त्यानंतर सौ.वनिता सांबपूरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावरील दीर्घ काव्य सादर केले. सत्पुरूषांचे विचार कालातीत असतात. एक हजार वर्षापूर्वी बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक क्रांतीची गरज आजच्या नवसमाज रचनेला आवश्यक भासत आहे. महात्मा बसवेश्वर ते स्वामी विवेकानंद आणि प.पू.शुकदास महाराज हा विचारांचा त्रिकोण कर्नाटक,बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत प्रवाहीत झाला. प.पू.शुकदास महाराजांनी स्वीकारलेला कर्मयोग बसवेश्वरांच्या शिकवणूकीतून त्यांना प्राप्त झाल्याचे संतोष गोरे यांनी सांगितले. कृषि सहाय्यक यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अशोक थोरहाते, वसंतआप्पा सांबपूरे, बेलाप्पा धाडकर, डॉ.जगदीश सांबपूरे, शिवदास सांबपूरे, सागर उर्किडे, अनिल बोरकर, विलास तामस्कर, संजय तोडकर, सातरकर आप्पाजी, मनोज डोंगरे,डॉ.सुनिल देशमाने, सतिष धाडकर, डॉ. तुपकरी, नागेश तोडकर, योगेश तोडकर, डॉ.तेजस सांबपूरे, श्याम तामस्कर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा