पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेती मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. सद्या हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतात नांगरीणी, वखरणी, पंची, रोटाव्हेटर इत्यादी कामे करण्यात येत आहे. दिवसें दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी बळीराजाचे शेतमशागतीची गणित चांगले महागले आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राच्या साह्याने शेती मशागतीचे कामे करण्यास प्राधान्य देतात. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे यावर्षी नांगरणी,वखरणी या शेती मशागतीच्या कामासाठी अधिक दर मोजावे लागत आहे. पूर्वी शेतकरी शेती मशागतीची कामे पशूधनाच्या मदतीने करत होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती मशागतीचे कामे करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी नांगरणी,वखरणी,पेरणी इत्यादी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करण्याला पसंती दर्शवितो. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसला तरी भाडयाच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची कामे केल्या जातात. मात्र पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फटका शेती क्षेत्राला बसला. इंधनाचे दर गगनाला भिडले. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत पडून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित डबघार्इला आले. आहे. आता मशागतीचे दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे.
शेती मशागतीच्या दरात वाढ
यापूर्वी नांगरणीसाठी एका घंटयासाठी 500 रूपये होते त्यासाठी आता 700 रुपये मोजावे लागतात. रोटाव्हेटरला यापूर्वी ८00 रूपये लागत होत मात्र इंधन दरवाढीमुळे रोटाव्हेटरसाठी १००० मोजावे लागतात तर पंजीसाठी मागच्या वर्षी 500 रूपये लागत होत त्यासाठी आता ७00 रूपये लागत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा