देशातील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार !
० वाराणसीमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ० मोदींच्या हस्ते ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे उद्घाटन वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वाराणसीमध्ये बोलत असताना, देशातील एक लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. तरुणांचे कुटुंबवादामुळे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठीच आम्ही राजकारणात अशा एक लाख तरुणांना आणण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काल दि.२० ऑक्टोंबर २०२४ रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. देशामधील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं ते म्हणाले. ज्या कटुंबामधील राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवलं जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा वाराणसी दौरा होता. आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे या भेटीदरम्यान त्यांनी उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्र...